Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kabaddi Tournament : बारामतीतील कबड्डी स्पर्धेचे संयोजन लय भारी; खेळाडूंसह कबड्डीशौकिनांकडून आयोजकांचे कौतुक

आंतरराष्ट्रीय दर्जेला साजेसे असे 23 व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल खेळाडूंसह बारामतीमधील कबड्डीशौकिनांनी आयोजकांचे कौतुक केले आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Jan 20, 2025 | 03:29 PM
बारामतीतील कबड्डी स्पर्धेचे संयोजन लय भारी; खेळाडूंसह कबड्डीशौकिनांकडून आयोजकांचे कौतुक

बारामतीतील कबड्डी स्पर्धेचे संयोजन लय भारी; खेळाडूंसह कबड्डीशौकिनांकडून आयोजकांचे कौतुक

Follow Us
Close
Follow Us:

बारामती : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 23 व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा दुसर्‍यांदा बारामतीत संपन्न झाली. रेल्वेच्या मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेचे भव्य उद्घाटनपासून आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत असल्याची अनुभव येत राहिला. कमी कालावधीत यशस्वी संयोजनाचे शिवधनुष्य पेलल्याबद्दल एसजीए कंपनीचे गौतम छेड्डा यांचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बक्षिस वितरण समारंभात जाहिर कौतुक आले आहे.

अजित पवारांकडून गौरव
स्वःत गौतम छेड्डा यांना व्यासपीठावर बोलवून त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याचा गौरव करीत आयोजनाचे कौतुक केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक सुधीर मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव, शकुंतला खटावकर व माया आक्रे तालुका उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे उपस्थित होते.

भोजन व्यवस्थेसह इतर सुविधा
सलग पाच दिवस चाललेल्या स्पर्धेत खेळाडूंची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था उत्तम करण्यात आली होती. मॅटवरील कबड्डीची 4 मैदाने, तीन व्यासपीठ, तीन दिशांना असलेली प्रेक्षक गॅलरीसह समारंभासाठी असलेले व्यासपीठ अशी भव्य रचना एसजीए कंपनीने निर्माण केली होती. शिवकालीन तटबंदीचे व्यासपीठासह मुख्य प्रवेशव्दारावरील कबड्डीची चित्रे लक्ष वेधी ठरली.

तमाम कबड्डी रसिक मंत्रमुग्ध

स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून आयोजकांनी केलेल्या अतिशय देखण्या आणि नेटक्या आयोजनाने तमाम कबड्डी रसिक मंत्रमुग्ध झाले. विम्बल्डन स्पर्धेची आठवण व्हावी, अशी मैदानाची आसन व्यवस्था असल्याचे उपस्थित प्रेक्षक सांगत होते. उदघाटन सोहळ्याला महाराष्ट्रातील प्रादेशिक नृत्ये व संगीताच्या मेजवानीने चार चांद लावले. मंत्रमुग्ध करणारी फटाक्यांची आतषबाजी व नेत्रदिपक लेझर शोमुळे सपर्धेच्या उद्घाटनाला नवी झळाळी मिळाली. पारितोषिक सोहळ्यातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तव्यगाथेचा कार्यक्रमाला प्रेक्षकांनी दाद दिली.कबड्डीच्या लीगप्रमाणे बक्षिस सोहळा रंगला.

बारामतीमधील स्पर्धा यशस्वी

एसजीए कंपनीनी यापूर्वी नाशिकमील राष्ट्रीय युवा महोत्सव, उदगीरमधील खाशाबा जाधव स्पर्धा, गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, पुण्यातील महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व हरियाणाव पुण्यातील तील झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेच्या संयोजनात मोलाची भूमिका बजावली होती. आता बारामतीमधील स्पर्धा यशस्वी करून एसजीए कंपनीच्या क्रीडा शौकिनांची मने जिंकली आहेत.

Web Title: Kabaddi tournament in baramati organized with great success players and kabaddi enthusiasts praise the organizers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2025 | 03:29 PM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati
  • Kabaddi Tournament
  • Maharashtra Sports

संबंधित बातम्या

पंजाबमध्ये ‘खेळ’ रक्तरंजित! लुधियानामध्ये कबड्डी खेळाडूची गोळ्या घालून हत्या; ‘या’ टोळीने स्वीकारली जबाबदारी 
1

पंजाबमध्ये ‘खेळ’ रक्तरंजित! लुधियानामध्ये कबड्डी खेळाडूची गोळ्या घालून हत्या; ‘या’ टोळीने स्वीकारली जबाबदारी 

Leopard News: ‘या’ तालुक्यांत मानव-बिबट्या संघर्षाची परिस्थिती गंभीर; अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय
2

Leopard News: ‘या’ तालुक्यांत मानव-बिबट्या संघर्षाची परिस्थिती गंभीर; अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

Baramati Politics: बारामतीत पडद्यामागे घडामोडींना वेग; पवार घराण्याचा नवा खेळाडू निवडणुकीच्या रिंगणात
3

Baramati Politics: बारामतीत पडद्यामागे घडामोडींना वेग; पवार घराण्याचा नवा खेळाडू निवडणुकीच्या रिंगणात

Local Body Elections : स्वबळावर की एकत्र लढायचं? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भूमिका जाहीर
4

Local Body Elections : स्वबळावर की एकत्र लढायचं? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भूमिका जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.