कल्याण : वडिलांसोबत मोबाईलवर बोलत असताना एका बाईकस्वाराने मोबाईल हिसकावून पळ काढला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या साहाय्याने या चोरट्याला इराणी वस्तीतून अटक केली आहे. हसन सय्यद असे या चोरट्याचे नाव आहे. हा चोरटा नेहमी ड्रग्जच्या नशेत तर्र असतो. या चोरट्याने नशेत गाडी चोरली आहे आणि त्याच गाडीवरुन बसून लोकांना लूटतो. त्यानंतर गाडी निर्जनस्थळी ठेवून पसार होतो. त्याने अनेक गुन्हे या पूर्वी केले असून पोलीस त्याच्या शोध घेत होते.
कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वेलकम रेस्टारंट आहे. या रेस्टारंटच्या समोर एक तरुण मोबाईलवर वडिलांशी बोलत होता. बोलता बोलता तो फूटपाथवरुन रस्त्यावर आला. त्याच वेळी एक बाईक स्वार त्याठिकाणी आला. त्याने तरुणाच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. या प्रकरणात कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याचा तपास सुरु केला. वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीनिवास देशमुख यांच्या पथकाने तपास सुरु केला. पोलिस कर्मचारी तानाजी वाघ यांनी महत्वाची भूमीका बजावली.
अखेर या चोरट्याला आंबिवलीतील इराणी वस्तीतून अटक करण्यात आली. याआधी सुद्धा हसन सय्यद असे त्याचे नाव आहे हसनच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. हसन हा ड्रग्जच्या नशेत तर्र असतो. या नशेत तो आधी दुचाकी चोरतो. चोरलेली दुचाकी घेऊन तो लोकांना लुटतो. त्यानंतर दुचाकी दुसऱ्याच ठिकाणी सोडून पळून जातो. आत्ता हसनच्या अटकेनंतर अनेक गुन्हे उघड येण्याची शक्यता आहे. हसनने या घटनेच्या चोरीकरीता बाईक कुठून चोरली आहे हे त्याला आठवत नाही. पोलिस त्याच्याकडून चाैकशी दरम्यान बाईक कुठून चोरली याची माहिती उघड करण्याच्या प्रयत्न करत आहेत.