Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan News : कृषी उत्पन्न बाजार समिती वादाच्या भोवऱ्यात ; परिसरात अनधिकृत बांधकाम असल्याचा आरोप

शेतकऱ्यांसाठी असलेल्या राखीव इमारतींमध्ये अनधिकृत बांधकाम सुरु असल्याचा आरोप सामाजिक संघटनेने केला आहे. त्यामुळे कृषी बाजार समिती सध्या वादाच्या भोवऱ्यात दिसून येत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 22, 2025 | 02:29 PM
Kalyan News :  कृषी उत्पन्न बाजार समिती वादाच्या भोवऱ्यात ; परिसरात अनधिकृत बांधकाम असल्याचा आरोप
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण पश्चिम येथील कृषी उत्पन्न बाजार समिती वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं दिसून येत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील इमारतींमध्ये अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. गोविंदवाडी बायपास रोडवर असलेल्या इमारतीवर महापालिकेची कोणतेही परवानगी न घेता लग्नाचा हॉल उभारण्यात आला.

या अनधिकृत बांधकामाबाबत अनेकदा तक्रारी केल्या मात्र साधी चौकशी करायची तसदी केडीएमसीने घेतली नाही. असं म्हणत सामाजिक कार्यकर्ते रवी गायकवाड यांनी पालिकेवर ताशेरे ओढले आहेत. याबाबत केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करु असं सांगितलं आहे. या चौकशीदरम्यान अनधिकृत बांधकाम आढळल्यास कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देखील गोडसे यांनी दिलं आहे.

Thane News : गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांसाठी खुशखबर ! मंडप शुल्काबाबत पालिका प्रशासनाचा मोठा निर्णय

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी इमारती उभारण्यात आल्या आहेत. या इमारती शेतकऱ्यांसाठी राखीव आहेत. मात्र याचा गैरवापर होत असल्याचं सामाजिक संघटनेने आरोप केला आहे. इमारतींवर नियमबाह्य पद्धतीने बांधकाम केलं आहे. या इमारतींच्या टेरेसवर महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता मंगल कार्यालय हॉटेल सुरू करण्यात आले .याबाबत केडीएमसी उपायुक्त्यांकडे अनेकदा तक्रारी केल्या मात्र कोणतेही कारवाई केली नसल्याचा आरोप तक्रारदार गायकवाड यांनी केली.

गोविंदवाडी बायपास रोडवर असलेल्या एका इमारतीच्या टेरेसवर थेट भला मोठा मंगल कार्यालय थाटण्यात आले .यासाठी महापालिकेकडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेले नाही. हा सगळा गैरप्रकार होत सुरु असून एखादी दुर्घटना घडल्यास या ठिकाणी जीवित हानी होऊ शकते. त्यामुळे केडीएमसीने तत्काळ या बांधकामांवर कारवाई करावी. अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास विलंब केलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता रवी गायकवाड यांनी केली आहे. दरम्यान या सगळ्य़ा गैरप्रकारावर पालिका काय ठोस भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

तब्बल 259 धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवले; उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ आदेशाचे केलं गेलं पालन

Web Title: Kalyan news agricultural produce market committee in the midst of controversy allegations of unauthorized construction in the area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 02:29 PM

Topics:  

  • kalyan news
  • Marathi News
  • Thane news

संबंधित बातम्या

Thane News: अडीच वर्षांची ‘वियाना’ घरातून बेपत्ता! दिवाळीच्या तोंडावर कुटुंब हादरले; पोलीस धावले अन्…
1

Thane News: अडीच वर्षांची ‘वियाना’ घरातून बेपत्ता! दिवाळीच्या तोंडावर कुटुंब हादरले; पोलीस धावले अन्…

Diwali Pahat : ‘ मी दिल्लीकर ‘ च्या माध्यमातून होणाऱ्या दिवाळी पहाट ची दशकपूर्ती उत्साहात संपन्न
2

Diwali Pahat : ‘ मी दिल्लीकर ‘ च्या माध्यमातून होणाऱ्या दिवाळी पहाट ची दशकपूर्ती उत्साहात संपन्न

Raju Shetti HND Hostel : मोहोळांचा हात नसेल तर त्यांनी पुढाकार घेवून व्यवहार रद्द करा
3

Raju Shetti HND Hostel : मोहोळांचा हात नसेल तर त्यांनी पुढाकार घेवून व्यवहार रद्द करा

Asaduddin Owaisi : एमआयएमचा स्वबळाचा नारा, नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी तयारी
4

Asaduddin Owaisi : एमआयएमचा स्वबळाचा नारा, नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.