Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan News : “भारतीय तरुणांकडे आज जग आदराने पाहत आहे” ; भाजप नेते माजी आमदार नरेंद्र पवार याचं वक्तव्य

जगभरात अनेक ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असली, तरी भारत आज सुरक्षित, सक्षम आणि प्रगत राष्ट्र म्हणून उभा आहे. भाजप नेते माजी आमदार नरेंद्र पवार यांनी वक्तव्य केलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 18, 2026 | 02:26 PM
Kalyan News : “भारतीय तरुणांकडे आज जग आदराने पाहत आहे” ; भाजप नेते माजी आमदार नरेंद्र पवार याचं वक्तव्य
Follow Us
Follow Us:
  • भारतीय तरुणांकडे आज जग आदराने पाहत आहे
  • भाजप नेते माजी आमदार नरेंद्र पवार याचं वक्तव्य
कल्याण : जगभरात अनेक ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असली, तरी भारत आज सुरक्षित, सक्षम आणि प्रगत राष्ट्र म्हणून उभा आहे. भारतीय तरुणांच्या कौशल्य, बुद्धिमत्ता आणि मेहनतीमुळे आज संपूर्ण जग भारताकडे आदराने पाहत असल्याचे गौरवोद्गार भाजप नेते तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले. कल्याण-मुरबाड महामार्गावरील इंदाला अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित पदवीप्रदान सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी नरेंद्र पवार यांनी पदवीधर विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची जागतिक प्रतिमा मोठ्या प्रमाणात उंचावली असून, पूर्वीचा नकारात्मक दृष्टिकोन आता सकारात्मकतेत बदलला आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना जगभरात मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत.तुम्ही मिळवलेल्या पदवीचा लाभ भविष्यात देश-विदेशात निश्चित होईल. मात्र कुठेही गेलात, कितीही मोठे झालात तरी मातृभूमी आणि संस्कार विसरू नका, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी केले.

Pratap Sarnaik : मीरा-भाईंदरचे राजकारण तापले; आरोप-प्रत्यारोपांची पातळी घसरली, सरनाईक-मेहता आमनेसामने

यावेळी त्यांनी मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा उल्लेख करत महाराष्ट्रात जन्म घेणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेल्या भूमीत आपण जन्मलो, ही आपली भाग्याची गोष्ट असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.स्वतःच्या जीवनप्रवासाचा उल्लेख करताना नरेंद्र पवार म्हणाले की, “मीही सिव्हिल इंजिनिअर आहे. माझे वडील कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत कामगार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या वरिष्ठ पदावर अभियंते कार्यरत असत. आपल्या मुलानेही एक दिवस अभियंता बनून मोठे व्हावे, अशी इच्छा होती. त्याच स्वप्नातून माझ्या आयुष्याला दिशा मिळाली.”

राजकारणातील प्रवेशामुळे शासकीय सेवेत रुजू होता आले नाही, मात्र नगरसेवक, उपमहापौर आणि आमदार अशा विविध जबाबदाऱ्या सक्षमपणे सांभाळण्याची संधी मिळाल्याचे ते म्हणाले. तर विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांच्या पालकांचे, शिक्षकांचे आणि स्वतःच्या मेहनतीचे मोठे योगदान असल्याचे सांगत इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करणे ही सोपी गोष्ट नसून सातत्य, जिद्द आणि परिश्रम यांच्या बळावरच हे यश संपादन करता येते, असे प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांनी केले.या पदवीप्रदान सोहळ्यास महाविद्यालयाचे पदाधिकारी, प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“जनाची नाही तर मनाची तरी ठेवा” ; लोकदरबारात MMRDA अधिकाऱ्यांवर मंत्री प्रताप सरनाईकांचा संताप

Web Title: Kalyan news the world today looks at indian youth with respect statement by bjp leader and former mla narendra pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • kalyan news
  • navrashtra news
  • political news

संबंधित बातम्या

‘कोणी कुठे जात नाही, ज्यांना जायचे ते गेले’; खासदार संजय राऊत यांचं मोठं विधान
1

‘कोणी कुठे जात नाही, ज्यांना जायचे ते गेले’; खासदार संजय राऊत यांचं मोठं विधान

Satara Political News: नगराध्यक्ष अमोल मोहिते यांचे पद धोक्यात, स्वत:चे घर पाडून रस्ता रुंद करुन दाखवा – सुशांत मोरे
2

Satara Political News: नगराध्यक्ष अमोल मोहिते यांचे पद धोक्यात, स्वत:चे घर पाडून रस्ता रुंद करुन दाखवा – सुशांत मोरे

‘गेल्या 12 वर्षांत भारताने अनेक बदल पाहिले’; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान
3

‘गेल्या 12 वर्षांत भारताने अनेक बदल पाहिले’; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान

ममता बॅनर्जी यांना ऑफर; सोनिया गांधींनी थेट ‘या’ पदाचाच दिला प्रस्ताव?
4

ममता बॅनर्जी यांना ऑफर; सोनिया गांधींनी थेट ‘या’ पदाचाच दिला प्रस्ताव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.