Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: कांजूर डम्पिंग; विषारी विळखा! पालिकेच्या निष्क्रियतेबाबत नाराजी; जागतिक प्रदूषणात १२ व्या स्थानावर

जागतिक स्तरावर मुंबईची बदनामी झाल्याचे दिसून आले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे मुंबईतील कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंड. दर तासाला तब्बल ४.९ टन मिथेन वायूची गळती होत असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: May 30, 2026 | 09:19 AM
कांजूर डम्पिंग; विषारी विळखा! पालिकेच्या निष्क्रियतेबाबत नाराजी; जागतिक प्रदूषणात १२ व्या स्थानावर

कांजूर डम्पिंग; विषारी विळखा! पालिकेच्या निष्क्रियतेबाबत नाराजी; जागतिक प्रदूषणात १२ व्या स्थानावर

Follow Us
Follow Us:

मुंबईतील कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडनमुळे आता जागतिक स्तरावरही मुंबईची बदनामी झाल्याची नोंद समोर आली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, लॉस एंजेलिस यांच्या २०२६ च्या स्टॉप मिथेन प्रोजेक्ट अहवालानुसार कांजूरमार्ग लँडफिलला जगातील सर्वाधिक प्रदूषित लैंडफिल्समध्ये १२वा क्रमांक मिळाला आहे. दर तासाला तब्बल ४.९ टन मिथेन वायूची गळती होत असल्याचे या अहवालात स्पष्ट झाले असून, हे प्रदूषण जवळपास दहा लाख एस एसयुव्ही वाहनांच्या प्रदूषणाइतके धोकादायक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. इतक्या गंभीर परिस्थितीनंतरही मुंबई महापालिका आणि राज्य सरकार केवळ आश्वासनांची धूळफेक करत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कांजूर डम्पिंग ग्राऊंडमुळे कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड, विक्रोळी परिसरातील लाखो नागरिकांचे जीवन नरकयातना बनले आहे.(फोटो सौजन्य – AI)

इराण-अमेरिका युद्धाचा सर्वसामान्यांवर होतोय परिणाम; इंधनाच्या दरानंतर आता खाद्यतेलाचे दरही वाढले

केवळ कागदी घोषणा होत असल्याचा आरोप

मुंबईतील जवळपास ९० टक्के घनकचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या या कचराभूमीबाबत पालिका प्रशासनाची भूमिका मात्र पूर्णपणे बेजबाबदार असल्याचा आरोप होत आहे. उपाययोजना सुरू आहेत, वृक्षलागवड केली जाईल, पर्यायी जागेचा शोध सुरू आहे, अशी केवळ कागदी घोषणा करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. प्रत्यक्षात परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. १८५ लाख मेट्रिक टनांहून अधिक जुना कचरा या परिसरात साचलेला असून, त्यातून निर्माण होणारे मिथेन उत्सर्जन थांबविण्यासाठी कोणतीही ठोस व प्रभावी कृती करण्यात आलेली नाही.

खासदार पाटील यांनी मांडला सातत्याने मुद्दा

दुर्गंधी, प्रदूषित हवा, वारंवार लागणाऱ्या आगी व मिथेन वायूच्या वाढत्या प्रमाणामुळे नागरिकांना श्वसनाचे विकार, त्वचारोग, फुफ्फुसांचे आजार, दमा, एलर्जी यांसारख्या गंभीर आजारांनी ग्रासले आहे. विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य सर्वाधिक धोक्यात आले आहे.अनेक नागरिकांचे आयुष्य कमी होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी हा मुद्दा सातत्याने मांडला असून पालिका आयुक्तांसोबतच्या बैठका, डीपीडीसी बैठका तसेच दिल्लीतील लोकसभेतही त्यांनी ईशान्य मुंबईतील डम्पिंगमुळे नागरिकांच्या आरोग्यावर होत असलेल्या गंभीर परिणामांचा मुद्दा वारंवार उपस्थित केला आहे. याबाबत त्यांनी अनेकदा पत्रव्यवहार करून प्रशासनाला धारेवर धरले आहे. मुंबईकरांच्या जीवाशी खेळ थांबवा, कांजूर डम्पिंगला पर्याय द्या, अशी ठाम भूमिका घेण्यात आली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Kanjoor dumping poisonous weed resentment of municipal inaction ranked 12th in global pollution mumbai news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 09:18 AM

Topics:  

  • Air Pollution
  • Mumbai News
  • Solid Waste Management

संबंधित बातम्या

IIT Bombay Student Suicide : ‘अजून किती विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागणार?’ अभिजीत दीपके सरकारवर बरसले
1

IIT Bombay Student Suicide : ‘अजून किती विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागणार?’ अभिजीत दीपके सरकारवर बरसले

राज्यात पाणीटंचाईचे भीषण संकट? टंचाई कृती आराखडा तयार करण्याच्या प्रशासनाच्या सूचना
2

राज्यात पाणीटंचाईचे भीषण संकट? टंचाई कृती आराखडा तयार करण्याच्या प्रशासनाच्या सूचना

Disha Salian Case : आदित्य ठाकरेंनी अखेर मौन सोडले; म्हणाले, ‘दिशा सालियनला मी कधीही…’
3

Disha Salian Case : आदित्य ठाकरेंनी अखेर मौन सोडले; म्हणाले, ‘दिशा सालियनला मी कधीही…’

Air Pollution: प्रदूषणाचा ‘डिलेड अटॅक’! दिल्लीत हवामानातील बदलांचा फटका ५१ तासांनंतर; IITM चा नवा खुलासा
4

Air Pollution: प्रदूषणाचा ‘डिलेड अटॅक’! दिल्लीत हवामानातील बदलांचा फटका ५१ तासांनंतर; IITM चा नवा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.