Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Disha Salian Case : आदित्य ठाकरेंनी अखेर मौन सोडले; म्हणाले, ‘दिशा सालियनला मी कधीही…’

सीबीआयला दिलेल्या जबाबात दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मंगळवारी आदित्य ठाकरे यांच्यासह काही बॉलिवूड कलाकार आणि पोलिस अधिकाऱ्यांची नावे घेतली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 17, 2026 | 07:29 AM
दिशा सालियनला कधी भेटलोही नाही

दिशा सालियनला कधी भेटलोही नाही

Follow Us
Follow Us:

मुंबई : दिशा सालियन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एफआयआरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरेंचं नाव असल्याचा दावा सतिश सालियन यांनी केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू झाली आहे. यावर आता आदित्य ठाकरेंनी मोठं विधान केले आहे. ‘दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आपला काहीही संबंध नाही. मी दिशा सालियनला कधीही भेटलेलो नाही किंवा तिला ओळखतही नव्हतो, असे त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये स्पष्ट केले.

सीबीआयला दिलेल्या जबाबात दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मंगळवारी आदित्य ठाकरे यांच्यासह काही बॉलिवूड कलाकार आणि पोलिस अधिकाऱ्यांची नावे घेतली होती. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मोठमोठ्या दूरचित्रवाणीवरील आणि प्रसारमाध्यमांमधील खटले तथ्य बदलू शकत नाहीत. अधिकृत फेरतपासणीला राजकीय हेतूने केलेल्या दिशाभूल करणाऱ्या आरोपांपासून मुक्तपणे पुढे जाऊ दिले पाहिजे, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कुठलेही तथ्य आणि सत्य नसलेले हे सततचे खोटे कॅम्पेन दुर्दैवी आहे. बोंबाबोंब करुन केल्या जाणाऱ्या टिव्ही चॅनल्सवरच्या खोट्या चर्चा आणि मिडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत. अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करु द्या, असेही त्यांनी म्हटले आहे.

काय म्हटले पोस्टमध्ये?

अफवांचा धुरळा उडवणं बंद करण्यासाठी पुन्हा एकदा फक्त आणि फक्त तथ्य सांगतो! मी दिशा सालियन ह्यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती. राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या ६ वर्षांपासून वारंवार ह्या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही माझं नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरु आहे.

कुठलंही तथ्य आणि सत्य नसलेलं हे सततचं खोटं कॅंपेन दुर्दैवी आहे. बोंबाबोंब करुन केल्या जाणाऱ्या टिव्ही चॅनल्सवरच्या खोट्या चर्चा आणि मिडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत. अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करु द्या.

परत एकदा सांगतो, ज्यांना वाटत असेल की अश्या चारित्र्यहननाच्या आणि खोट्या प्रचाराच्या मार्गाने तुम्ही आम्हाला शांत बसवू शकाल तर तो तुमचा भ्रम आहे. सत्यासाठी, अन्यायाविरुद्ध, देशवासीयांना सोबत घेऊन आमचा लढा सुरुच राहील!

Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणावर सूरज पंचोलीने सोडलं मौन; लांबलचक पोस्ट करत आदित्य ठाकरेंवरही केलं भाष्य

Web Title: I never even met disha salian says aditya thackeray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 07:24 AM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • Disha Salian case
  • Mumbai News

संबंधित बातम्या

मोठी बातमी! राज्यातील तरुणांसाठी खूशखबर; ‘रोजगार महाकुंभ’द्वारे हजारो नोकऱ्यांची संधी
1

मोठी बातमी! राज्यातील तरुणांसाठी खूशखबर; ‘रोजगार महाकुंभ’द्वारे हजारो नोकऱ्यांची संधी

Tukaram Mundhe: महाराष्ट्रात मोठा घोळ! 11 रुपयांचा IV Set 325 ला विक्री, तुकाराम मुंडेंनी केंद्रीय हस्तक्षेपाची केली मागणी
2

Tukaram Mundhe: महाराष्ट्रात मोठा घोळ! 11 रुपयांचा IV Set 325 ला विक्री, तुकाराम मुंडेंनी केंद्रीय हस्तक्षेपाची केली मागणी

Manoj Jarange Patil : ‘समाजाच्या लेकरांसाठी लढून मरेन, आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही,’ जरांगे पाटील मुंबईकडे रवाना
3

Manoj Jarange Patil : ‘समाजाच्या लेकरांसाठी लढून मरेन, आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही,’ जरांगे पाटील मुंबईकडे रवाना

मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट! दहिसर – भाईंदर लिंक रोडच्या कामाला गती; कुठपर्यंत आलंय काम?
4

मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट! दहिसर – भाईंदर लिंक रोडच्या कामाला गती; कुठपर्यंत आलंय काम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.