Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विमान सेवा बंद पडल्यापासून राणेंनी काय केले? चाकरमान्यांना खड्ड्यातून प्रवास करावा लागला हे सत्ताधाऱ्यांचे अपयश – परशुराम उपरकर

ज्या नेत्यांनी एसटी मोफत सेवा दिली, मात्र जाताना चाकरमान्यांना दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. जाताना प्रवास करताना रस्त्याची दुरावस्था व रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांचे हाल दिसत आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 25, 2023 | 05:04 PM
विमान सेवा बंद पडल्यापासून राणेंनी काय केले? चाकरमान्यांना खड्ड्यातून प्रवास करावा लागला हे सत्ताधाऱ्यांचे अपयश – परशुराम उपरकर
Follow Us
Close
Follow Us:

कणकवली : कणकवलीच्या आमदारांनी मनसेला सल्ला देऊ नये. महामार्गावर अद्यापही वस्तुस्थिती खड्डेमय रस्ते आहेत. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना भेटून विमानसेवा सुरू करणार, अशी कामे श्रेयासाठी करु नका. कारण विमान सेवा बंद पडल्यापासून केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी काय केले? पालकमंत्र्यांनी रेल्वे स्थानक मार्गासाठी मॅनेज करुन टेंडर काढली, मात्र कोणतीही कामे झालेली नाहीत. ग्रामीण, राज्य आणि महामार्गावर चाकरमान्यांना खड्ड्यातून प्रवास करावा लागला हे सत्ताधाऱ्यांचे अपयश आहे अशी टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली.

चाकरमानी मोठ्या उत्साहाने, भक्तीभावाने आले होते. धोकादायक प्रवासातच त्यांचा उत्साह निघून गेला. जाताना प्रवास करताना मोठ्या अडचणी निर्माण होतील या भीतीपोटी ५ दिवसाने परत गणपतीचे विसर्जन चाकरमान्यांनी केले. बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी महामार्ग गणपतीपूर्वी सुरक्षित बनवला जाईल अशी घोषणा करून जनतेची दिशाभूल केली. हा रस्ता सुरळीत करण्याचा आव आणला. पण चाकरमान्यांना येताना प्रवासाला वेळ गेला, रस्ते खड्डेमय आहेत.

टेंडर मॅनेज करुन ४ स्टेशनचे निविदा काढण्यात आली. त्या ठिकाणी पण कोणतेही काम केलं जातं नाही. रेल्वे स्टेशन मार्गावर खड्डे असल्याने त्या खड्ड्यातून चाकरमान्यांना जावे लागले. या जिल्ह्यातील नागरिकांना खड्डे असलेल्या रस्त्याने प्रवास करावा लागला. ज्या नेत्यांनी एसटी मोफत सेवा दिली, मात्र जाताना चाकरमान्यांना दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. जाताना प्रवास करताना रस्त्याची दुरावस्था व रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांचे हाल दिसत आहेत. ते चाकरमान्यांचे हाल पालकमंत्र्यांनी पाहण्याची गरज असल्याचे मत श्री. उपरकर यांनी व्यक्त केले.

कोकणी माणसांसाठी मनसे रस्त्यावर उतरून काम करत राहणार आहे. कणकवलीच्या आमदाराने पहिल्यांदा कणकवली, देवगड, वैभववाडी या तीन तालुक्यातील आरोग्य सेवा कोलमडली आहे, त्याबाबत केंद्रीय आरोग्य मत्र्यांशी ना.राणेंना बोलायला सांगावे. जनतेला पहिल्यांदा चांगली आरोग्य सेवा द्यावी. आरोग्य व्यवस्था काय आहे? हे पहिल्यांदा आमदारांनी पहावे, असा टोला श्री. उपरकर यांनी लगावला.

कणकवलीचे आमदार मनसेला सल्ला देत आहेत, मनसेने किती सबुरी घ्यावी? तुम्ही खोटी आश्वासने दिली आहेत त्याचे काय? आज हायवे बाबत उच्च न्यायालयात २१ डिसेंबरला रस्ता पूर्ण करु असे सांगितले. त्याला अडीज वर्षे झाली आहेत, तरी रस्ता सत्ताधारी पूर्ण करू शकले नाहीत. चीपी विमानतळावर विमान सेवेबाबत नारायण राणे हे केद्रीय मंत्री असूनही सेवा ठप्प आहे, हे अपयश आहे. आता आमदार सांगत आहेत की, ना.राणे केंद्रीय विमान उड्डाण मंत्र्यांशी बोलून प्रश्न मार्गी लावणार, हे चुकीचे आहे. ज्यावेळी विमानतळ सुरु झाले त्यावेळी श्रेयाची लढाई लागली होती. आता इतके काळ विमानतळ बंद आहे, त्याबाबत राणेंना बोलू नये असे सांगितले होते का? श्रेयासाठी करत असाल तर जनतेला नको. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला शाश्वत विकासाची हमी असावी, असा टोला परशुराम उपरकर यांनी लगावला.

Web Title: Kankavali union minister narayan rane sindhudurg parashuram uparkar mns maharashtra government political party devgad vaibhavwadi politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2023 | 05:04 PM

Topics:  

  • Devgad
  • kankavali
  • maharashtra
  • Maharashtra Government
  • political party
  • Vaibhavwadi

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.