
18 नोव्हेंबर रोजी एनक्लोजरचे दरवाजे उघडण्यात आले होते. मात्र दोन दिवस वाघीण आतच फिरत राहिली. तिने नैसर्गिक शिकार करून तीच खात, परिस्थितीचा सहज स्वीकार केल्याचे तज्ज्ञांनी निरीक्षणात पाहिले. गुरुवारी (दि. 20 नोव्हेंबर) सकाळी 8 वाजता ‘तारा’ने डौलदार पावलांनी एनक्लोजर सोडले आणि जंगलाच्या दिशेने मार्गक्रमण केले. चांदोलीत आगमनानंतर वाघीणीचा संपूर्ण अनुकूलन टप्पा वैज्ञानिक पद्धतीने राबविण्यात आला. तिची हालचाल, शिकार प्रवृत्ती, हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता, नैसर्गिक प्रतिक्रिया आणि क्षेत्रचिन्हीकरण यांचे वन्यजीव तज्ज्ञ व भारतीय वन्यजीव संस्थेच्या (डब्ल्यूआयआय) अधिकाऱ्यांनी सातत्याने निरीक्षण केले. नियमित तपासणीनंतर तिला पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे घोषित करण्यात आले.
तत्कालीन मुख्य वनसंरक्षक डॉ. कलेमेंट बेन, स्व. पापा पाटील, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे आणि नाना खामकर यांनी गेल्या आठ-दहा वर्षांपासून
व्याघ्र पुनर्वसनासाठी अक्षरशः अविरत प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यांच्या सातत्यपूर्ण धडपडीमुळे सह्याद्रीत व्याघ्रसंवर्धनाला नवी दिशा मिळाली असून, आगामी काळात येथे व्याघ्र पर्यटनात लक्षणीय वाढ होणार आहे.
वाघीणीच्या मानेवर रेडिओ कॉलर बसविण्यात आला असून सॅटेलाइट टेलीमेट्री व व्हीएचएफ ट्रेकिंगच्या माध्यमातून तिच्या हालचालीवर 24तास नजर ठेवली जाणार आहे. यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, चांदोली राष्ट्रीय उद्यान व भारतीय वन्यजीव संस्थेची विशेष प्रशिक्षित पथके कार्यरत आहेत.
तारा’ने एनक्लोजरमध्ये उत्कृष्ट जीवनासाठी पूर्णतः सिद्ध आहे. पुढील निरीक्षण प्रक्रिया वैज्ञानिक आणि जबाबदार पद्धतीने राबवली जाईल.
तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प
–
महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनाचा हा महत्वाचा टप्पा आहे. वाघीणीचे नैसर्गिक वर्तन व आरोग्य समाधानकारक असून तिचे सतत निरीक्षण सुरू आहे. या उपक्रमामुळे सह्याद्रीतील – व्याघ्र संवर्धनात मोठी भर पडेल.
– एम. एस. रेड्डी, प्रधान मुख्य वन्यजीव रक्षक, महाराष्ट्र राज्य
‘तारा’ वाघीणीच्या मुक्त विहारामुळे ● 66 सहगदी व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्र पर्यटनाला भविष्यात नवी दिशा मिळेल. – रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक
Ans: ‘तारा’ (एसटीआर T-04) ही सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील एक वाघीण आहे. नियंत्रित पिंजऱ्यात (एनक्लोजर) अनुकूलन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तिला चांदोली राष्ट्रीय उद्यानातील नैसर्गिक जंगलात मुक्त करण्यात आले.
Ans: 18 नोव्हेंबरला एनक्लोजरचे दरवाजे उघडले गेले, परंतु वाघीण दोन दिवस आतच राहिली. 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता तिने स्वतःच बाहेर येऊन जंगलाचा मार्ग धरला.
Ans: वाघीणीचे नैसर्गिक वातावरणात यशस्वी पुनर्वसन हे महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनासाठी मोठा टप्पा मानला जातो. यामुळे जैवविविधतेचे संरक्षण मजबूत होईल.