Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : अखेर उपोषण 12 तासांनी सुटलं; टाटा जलविद्युत प्रकल्प विरोधातील आंदोलनकर्त्यांची माघार

तालुक्यातील भिवपुरी येथे असलेल्या टाटा जलविद्युत प्रकल्पाच्या नवीन प्रकल्पाच्या कामात स्थानिकांवर अन्याय होत असल्याचे कारणाने राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना ठाकरे पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाने उपोषण सुरू केले होते.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 18, 2025 | 06:46 PM
Karjat News : अखेर उपोषण 12 तासांनी सुटलं; टाटा जलविद्युत प्रकल्प विरोधातील आंदोलनकर्त्यांची माघार
Follow Us
Close
Follow Us:
  • अखेर उपोषण 12 तासांनी सुटलं
  • टाटा जलविद्युत प्रकल्प विरोधातील आंदोलनकर्त्यांची माघार
 

कर्जत/ संतोष पेरणे :  तालुक्यातील भिवपुरी येथे असलेल्या टाटा जलविद्युत प्रकल्पाच्या नवीन प्रकल्पाच्या कामात स्थानिकांवर अन्याय होत असल्याचे कारणाने राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना ठाकरे पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाने उपोषण सुरू केले होते. त्या उपोषणाला स्थानिक आणि तालुक्यातील जनतेने मोठा पाठिंबा दिल्याने तणाव निर्माण झाला होता. शेवटी तब्बल 11 तासांनी टाटा कंपनी व्यवस्थापनाला उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्या लागल्या. दरम्यान या निमित्ताने तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

कर्जत तालुक्यातील टाटा पॉवर हाऊस येथे स्थानिक भूमिपुत्रांच्या अनेक मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उप जिल्हाप्रमुख नितीन सावंत,शेकापचे तालुका चिटणीस तानाजी मते आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती नारायण डामसे यांनी सकाळी उपोषणाला सुरुवात केली होती. 17 डिसेंबर रोजी उपोषणाला सुरुवात झाल्यानंतर उपोषणाला स्थानिक ग्रामस्थांनी मोठी उपस्थिती लावल्याने शेवटी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला होता.

उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सुरुंग स्फोटामुळे तपकीरवाडी आणि धनगर वाडा येथील घरांचे होत असलेले नुकसान आणि त्यामुळे निर्माण झालेली घबराट,सुरुंग स्फोटामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई,दगडखानी यांना लोकवस्ती जवळ दिलेली परवानगी,मोठ्या प्रमाणावर केलेली वृक्षतोड आणि स्थानिक भूमिपुत्र यांना नोकऱ्यांमध्ये सामावून घेण्याच्या मागण्यांसाठी उपोषण सुरू करण्यात आले होते. उपोषण सुरू झाल्यानंतर कर्जत तालुक्याचे प्रांत अधिकारी प्रकाश संकपाल,तालुक्याचे तहसीलदार डॉ धनंजय जाधव,टाटा अधिकारी टाटा कंपनीचे अधिकारी अभिजीत पाटील,सीबी सिंग,मुंबई ऑफिस वसंत पिंगळे,विवेक माटे यांनी दुपार एक वाजता,त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता आणि रात्री नऊ वाजता मध्यस्थी करण्यासाठी उपोषण स्थळी येऊन चर्चा केली. मात्र उपोषणकर्त्यांच्या मागण्या सुटत नाहीत तोवर उपोषण सुरूच ठेवले जाईल अशी भूमिका कायम ठेवली होती.

Raigad News: कळंबोलीत राजकीय वातावरण तापलं! प्रचाराचा बिगुल वाजला, मतदारांवर लक्ष

स्थानिकांना न्याय मिळवून देण्यासाठी उपोषणकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ नेते पुंडलिक पाटील,भगवान भोईर,दीपक श्रीखंडे,बाबू घारे,संतोष पाटील,पंढरीनाथ राऊत यांच्याकडून कंपनी व्यवस्थापन यांच्याशी बोलणी केली जात होती. शेवटी रात्री दहा वाजता उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने 12 तासांनी उपोषण स्थगित करण्यात आले. मात्र दुपारपासून असलेली गर्दी आणि अचानक रात्री नऊ नंतर वाढलेली गर्दी यामुळे पोलीस प्रशासनाने कंपनी व्यवस्थापन यांना निर्णायक भूमिका जाहीर करण्याची सूचना केली. त्यानंतर कंपनी व्यवस्थापन कडून अभिजित पाटील यांनी समजूतदार पणाची भूमिका घेऊन सर्व मागण्या मान्य करणारे पत्र मुंबईतून मंजूर करून घेतले आणि उपोषण स्थगित झाले.

कायदा सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित,पोलिस उप अधीक्षक राहुल गायकवाड आणि पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांच्याकडून वेळोवेळी पाहणी केली जात होती.रात्री नऊ नंतर सर्व बाजूंनी दबाव वाढू लागला आणि कार्यकर्ते स्थानिक ग्रामस्थ कंपनी गेटवर गोंधळ घालू लागल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

Karjat News : अनधिकृत बांधकामांना अभय कोणाचं ? आता कागद नको कारवाई हवी,अतिक्रमणावर गावकऱ्यांची नाराजी

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: भिवपुरी येथील टाटा जलविद्युत प्रकल्पाबाबत उपोषण का करण्यात आले होते?

    Ans: टाटा जलविद्युत प्रकल्पाच्या नवीन कामात स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि शेतकरी कामगार पक्षाने उपोषण सुरू केले होते.

  • Que: उपोषण कधी आणि कुठे सुरू झाले?

    Ans: 17 डिसेंबर रोजी कर्जत तालुक्यातील भिवपुरी येथील टाटा पॉवर हाऊस परिसरात उपोषणाला सुरुवात झाली.

  • Que: उपोषणाचे नेतृत्व कोणी केले?

    Ans: राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उप जिल्हाप्रमुख नितीन सावंत, शेकापचे तालुका चिटणीस तानाजी मते आणि माजी सभापती नारायण डामसे यांनी उपोषणाचे नेतृत्व केले.

Web Title: Karjat news fast finally ended after 12 hours protesters against tata hydropower project withdraw

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 06:46 PM

Topics:  

  • karjat news
  • Tata Group

संबंधित बातम्या

Karjat News : भव्य विज्ञान प्रदर्शन; आपत्कालीन यंत्रणेवर आधारित विद्यार्थ्यांचे सुचक प्रकल्प
1

Karjat News : भव्य विज्ञान प्रदर्शन; आपत्कालीन यंत्रणेवर आधारित विद्यार्थ्यांचे सुचक प्रकल्प

Raigad News : मूर्ती लहान पण किर्ती महान; जिल्हापरिषदेतील शाळकरी विद्यार्थ्याला 22 भाषा अवगत
2

Raigad News : मूर्ती लहान पण किर्ती महान; जिल्हापरिषदेतील शाळकरी विद्यार्थ्याला 22 भाषा अवगत

Karjat News : अनधिकृत बांधकामांना अभय कोणाचं ? आता कागद नको कारवाई हवी,अतिक्रमणावर गावकऱ्यांची नाराजी
3

Karjat News : अनधिकृत बांधकामांना अभय कोणाचं ? आता कागद नको कारवाई हवी,अतिक्रमणावर गावकऱ्यांची नाराजी

Karjat News : पटसंख्येअभावी शाळा होणार बंद; जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था
4

Karjat News : पटसंख्येअभावी शाळा होणार बंद; जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.