Raigad News: कळंबोलीत राजकीय वातावरण तापलं! प्रचाराचा बिगुल वाजला, मतदारांवर लक्ष
Manikrao Kokate News: माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल?
प्रभाग क्रमांक दहामधील भारतीय जनता पक्षाच्या संभाव्य उमेदवार सरस्वती काथारा यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. काथारा या गेल्या अनेक वर्षांपासून कळंबोलीतील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असून, त्यांचा दांडगा जनसंपर्क, महिला कार्यकर्त्यांची मोठी फळी आणि घरोघरी असलेला परिचय ही त्यांची ओळख आहे. नागरी समस्या, मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेत सिडको व महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला आहे. २०१७ साली प्रभाग क्रमांक दहा मधून शेतकरी कामगार पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली होती. काही महिन्यांपूर्वी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या सोबत त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर या प्रभागात भाजपची ताकद वाढली असून, त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. (फोटो सौजन्य – facebook)
यावेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी जनसंपर्क कार्यालय आणि सरस्वती काथरा यांच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाला माध्यमातून नवी दिशा मिळेल आणि नागरिकांच्या समस्या अधिक प्रभावीपणे मांडल्या जातील, असा विश्वास व्यक्त केला. या उद्घाटनप्रसंगी भाजप जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, कळंबोली शहर मंडल अध्यक्ष अमर पाटील, माजी नगरसेवक रवींद्र भगत, रविनाथ पाटील, महिला मोर्चा अध्यक्ष मोनिका महानवर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
दरम्यान, प्रभाग क्रमांक सातमध्ये भाजपचे संभाव्य उमेदवार अमर ठाकूर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचेही उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्याचबरोबर कळंबोली परिसरात शिवसेनेच्या वतीनेही प्रचाराला सुरुवात झाली असून, शिवसेनेचे कळंबोली उपशहर प्रमुख आनंदा माने यांच्या कार्यालयाचे उद्घाटन प्रभाग क्रमांक दहा मध्ये जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या हस्ते पार पडले. पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून प्रचारयंत्रणा सक्रिय झाल्याचे चित्र असून, येत्या काळात राजकीय हालचालींना वेग आला आहे.






