कर्जत/ संतोष पेरणे : तालुक्यात सलग दोन दिवस पावसाची संततधार सुरू आहे.मात्र तरीदेखील कर्जत तालुक्यातील तिन्ही नद्या आणि नाले या धोक्याच्या पातळीवर जाऊन वाहत नाहीत.परंतु या सततच्या पावसामुळे दोन शेतकऱ्यांच्या घराच्या भिंती कोसळल्याने त्या कुटुंबांचे नुकसान झाले आहे.दरम्यान कर्जत तालुका प्रशासनाने अद्याप कोणत्याही दरडग्रस्त कुटुंबाला स्थलांतरित केलेले नाही.
कर्जत तालुक्यात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत असल्यातरी तालुक्यातील तीन प्रमुख नद्या या धोक्याच्या पातळीच्या खाली आहेत.उल्हास नदीचा कर्जत येथील बंधारा हा दोन मीटर खाली असून उल्हास नदीवर असलेल्या कोणत्याही पुलावरून पाणी वाहत नाही. त्यामुळे संततधार पावसानंतर देखील तालुक्यातील उल्हास, पोश्री आणि चिल्हार तसेच पेज या नद्यांपासून अजूनतरी कोणताही धोका नाही .
मात्र मुसळधार पावसाने कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या घराच्या भिंती कोसळून नुकसान झाले आहे.मौजे सावेळे येथील मंगेश सोनवणे यांचे घराची भिंत कोसळली असून कोणतीही जीवित हानी झालेली नाही,मात्र महसूल खात्याने तत्काळ पंचनामा करून नुकसानी माहिती महसूल विभागाला दिली आहे.तर तलाठी सजा गौरकामत मौजे बारणे येथील एका घराची रात्री 11ते 12 च्या सुमारास भिंत कोसळून नुकसान झाले मात्र यासगळ्यात कोणतीही जीवित हानी नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या घराची पाहणी करत आज सकाळी महसूल कर्मचारी यांनी पंचनामा केला आहे.
कर्जत तालुक्यात कर्जत शहरातील मुद्रा गाव,खांडपे सांगवी,उमरोली पाली वसाहत,नेरळ आंबे वाडी या दरड ग्रस्त गावातील लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.मात्र त्यातील कोणत्याही कुटुंबाचे स्थलांतरण प्रशासनाने केलेले नाही. पळस दरी भागातील ठाकूरवाडी ही देखील दरडीचे छायेत असून तेथील आदिवासी लोक देखील सलग पावसामुळे भीतीमय वातावरणात आहेत.मात्र प्रशासनाने कोणत्याही कुटुंबाचे स्थलांतरण केले नाही अशी माहिती तहसीलदार डॉ धनजंय जाधव यांनी दिली आहे.