Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News: इथे माणुसकी जिंकली! मुस्लिम बालकावरील उपचारासाठी हिंदू तरुणाचा पुढाकार…

हिंदू तरुण मुस्लिम बालकाचे प्राण वाचावे म्हणून प्रयत्न करीत आहेत. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत एका नऊ वर्षीय बालकाला अशी मदत मिळत असल्याने मोरे यांचे कौतुक होत आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 05, 2026 | 02:56 PM
Karjat News: इथे माणुसकी जिंकली! मुस्लिम बालकावरील उपचारासाठी हिंदू तरुणाचा पुढाकार…
Follow Us
Follow Us:
  • मुस्लिम बालकाच्या उपचारासाठी  हिंदू तरुणांचा पुढाकार
  • जीवापाड प्रयत्न आणि सामाजिक बांधिलकी
  • नेरळमधील माणुसकीच्या परंपरेची आठवण करून देते
Karjat News: नेरळ जवळील दामत येथील नऊ वर्षाच्या मुस्लिम बालकावर सामाजिक बांधिलकी जपत प्रथमेश मोरे यांनी वाचवले मुस्लिम बालकाचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. हिंदू तरुण मुस्लिम बालकाचे प्राण वाचावे म्हणून प्रयत्न करीत आहेत. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत एका नऊ वर्षीय बालकाला अशी मदत मिळत असल्याने मोरे यांचे कौतुक होत आहे. या प्रकारातून ‘हिंदू-मुस्लिम एकते’ची दृश्य दिसून आले असून नेरळ गावातील कुंभार आळी भागातील शालेय विद्यार्थी दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्यानंतर त्या मुलीच्या उपचारासाठी मुस्लिम तरुणांनी नेरळ गावात शुक्रवारचे नमाज अदान नंतर आर्थिक मदत गोळा करण्यासाठी आवाहन केले होते याची आठवण दामत येथील प्रकाराने समोर आली आहे.

Mamata Banerjee on SIR : धक्कादायक! SIR प्रत्येकमध्ये 107 लोकांचा अंत? बंगालच्या विधानसभेमध्ये मोठा दावा

नेरळ शहरात आजही माणुसकीचा धर्म सर्वात मोठा असल्याचे जिवंत उदाहरण समोर आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत नेरळ शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेना तालुका अधिकारी प्रथमेश मोरे यांनी दामत गावातील एका मुस्लिम बालकाला जीवन-मरणाच्या संघर्षातून बाहेर काढत खरी मानवता काय असते, हे कृतीतून दाखवून दिले.नेरळ जवळील दामत येथील अवघा नऊ वर्षांचा मुलगा हृदयविकाराच्या दुर्धर आजाराने त्रस्त होता. कुटुंबाने अनेक रुग्णालयांचे उंबरठे झिजवले, विविध तपासण्या केल्या, मात्र आजाराचे अचूक निदान होत नव्हते.त्या बालकाच्या आजारासाठी आर्थिक, मानसिक आणि शारीरिक अशा तिहेरी संकटात सापडलेल्या कुटुंबासाठी ही परिस्थिती अत्यंत वेदनादायी ठरत होती.

Maharashtra Politics: शिवसेनेची ताकद वाढणार; माजी आमदारासह आख्खा पक्ष शिवसेनेत विलीन होणार

अशा वेळी प्रथमेश मोरे पुढे आले आणि त्यांनी मुंबई येथील कोकिलाबेन अंबानी रिलायन्स रुग्णालयातील ओळखीच्या डॉक्टरांशी तातडीने संपर्क साधत उपचारासाठी प्रयत्न सुरू केले.त्यानंतर मुंबई येथे त्या मुलाला उपचारासाठी नेण्यात. आली उपचार सुरू झाले.या प्रयत्नांमुळे मुलाची प्रकृती आता स्थिर झाली असून तो वेळेवर जेवण करू लागला आहे. मुलाच्या कुटुंबियांनी भावुक होत मोरे यांचे आभार मानताना आमच्यासाठी देव भेटल्यासारखे झाले अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली. संकटाच्या क्षणी दिलेला हात त्यांच्या कुटुंबासाठी नवजीवनाची परतफेड ठरली आहे.

या घटनेनंतर दामत गावातील मुस्लिम समाजानेही सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले. मदतीच्या बदल्यात समाजाने दिलेला विश्वास हा केवळ माणुसकीच्या नात्याची परतफेड असल्याची भावना व्यक्त होत आहे.नेरळ शहरात आजही एखाद्या पीडित व्यक्तीसाठी हिंदू असो वा मुस्लिम — दोन्ही समाज एकत्र धावून येतात, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले. भिंती नव्हे तर पूल बांधणारी ही कृती ‘एक समाज, एक माणुसकी’चा संदेश देत आहे.
@santosh perne Karjat raigad

Web Title: Karjat news humanity triumphed here a hindu youth takes the initiative to provide treatment for a muslim child

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • hindu-muslim politics
  • Maharashtra Politics
  • Mumbai Politics

संबंधित बातम्या

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी
1

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
2

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

Maharashtra Politics: मुंबईच्या चर्चेवेळी अधिकारी गायब; विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांची नगरविकास सचिवांना नोटीस
3

Maharashtra Politics: मुंबईच्या चर्चेवेळी अधिकारी गायब; विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांची नगरविकास सचिवांना नोटीस

Amol Kolhe News:  सत्ताधाऱ्यांकडून सोबत येण्याची ऑफर आली का? अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं
4

Amol Kolhe News: सत्ताधाऱ्यांकडून सोबत येण्याची ऑफर आली का? अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.