कर्जत/संतोष पेरणे : मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे.त्यामुळे मुंबईच्या जवळ असलेले तालुक्यातील सकल मराठा समाज यांच्याकडून न्याहारीची सोय करण्यात आलेली आहे.कर्जत या मुंबईच्या जवळ असलेल्या सकल मराठा समाजाने चटणी भाकरी यांची मोठी जबाबदारी उचलली आहे.आज शनिवारी सायंकाळी कर्जत येथून चटणी भाकरी घेऊन पाच वाजताच्या सुमारास मराठा आंदोलक मुंबईकडे निघाले आहेत.
कर्जतमधून लोकलने मुंबईकडे मराठ्यांसाठी भाकरीचा भारा वाहण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका हा मुंबईच्या जवळ असल्याने, गेले अनेक वर्षे कर्जतकर बांधवांनी मराठा लढ्यात सातत्याने चांगला सहभाग घेतला आहे.या उपक्रमासाठी समन्वयकांनी सकाळी केलेल्या आवाहनाला कर्जतकरांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला. अवघ्या काही तासांतच क्यूआर कोडच्या माध्यमातून साधारण लाखभर आर्थिक मदतकाही वेळातच जमा झाली. मदतीचा ओघ अजूनही सुरू आहे.मराठा आरक्षणाच्या लढ्यात कर्जतकरांचा हातभार लावत आहेत.आज शनिवारी रोजी सकाळी मुंबईत उपासमार होऊ नये या हेतूने कर्जतमधील समाज बांधवांनी भाकरी एकत्रित करण्याचे नियोजन केले.
संध्याकाळी पाच वाजताच्यामुंबई कडे जाणाऱ्या उपनगरीय लोकलने हा चटणी आणि भाकरी मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. त्यावेळी उदय पाटील,अनिल भोसले,शंकर थोरवे,अनिल मोरे,प्रदीप ठाकरे,अरुण देशमुख, सागर शेळके, प्रथमेश मोरे, सुरेश बोराडे,प्रमिला बोराडे,विनोद पवाळी, सागर शेळके,बजरंग श्रीखंडे,मनोज लाड रोशन दगडे, कैलास म्हामले, अल्पेश मनवे, निलेश धारणे, रोहिदास बडेकर, गजानन बोराडे, जयंत पाटील, प्रविण ठाकरे,राजेश थोरवे आदी समाजबांधव कर्जत तालुक्याच्या वतीने भाकरी घेऊन मुंबई कडे सायंकाळच्या लोकलने रवाना झाले.कर्जत तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी पुन्हा एकदा आपल्या बांधिलकीचे दर्शन घडवले आहे. मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून कर्जत मधून भाकरीचा ओघ थेट मुंबईकडे केल्या आहेत.
सकल मराठा समाजाच्या आंदोलनात कर्जत तालुक्याची भूमिका महत्वाची
सकल मराठा आंदोलनाची सुरुवात झाल्यानंतर राज्यात मूक मोर्चांना सुरुवात होण्याआधी अंतरवाटी सराटी मध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठी चार्ज केल्यानंतर अगदी दुसऱ्याचं दिवशी कर्जत तालुक्यातील सकल मराठा समाज यांच्याकडून कर्जत चारफाटा येथे निदर्शने करण्यात आली.नंतर काही दिवसांनी मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आंदोलन करण्यासाठी मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग वरून येण्यास निघाले.त्यावेळी खोपोली येथे त्यांच्या स्वागतासाठी हजारोचे संख्येने मराठा समाज जमला होता.तर चटणी भाकरी यांची जोड तेंव्हापासून कर्जत सकल मराठा समाज यांच्याकडून दिली गेली.त्यावेळी खारघर येथे मोर्चा अडवण्यात आल्यावर देखील मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी रायगड जिल्हा सकल मराठा समाज मोठ्या ताकदीने उभा राहिला होता.त्यावेळी संपूर्ण रायगड जिल्ह्याने हजारोच्या संख्येने चटणी ठेचा भाकरी राज्यातून आलेल्या मराठा आंदोलक यांच्यासाठी पुरवल्या होत्या.
नंतरच्या काळात राज्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी लाक्षणिक साखळी उपोषण सुरू झाले त्यात कर्जत तालुका आघाडीवर राहिला आणि तब्बल 17 दिवस कर्जत तालुका सकल मराठा समाजाने साखळी उपोषण केले.कर्जत येथील काही समन्वयक मुख्य उपोषण सुरू असलेल्या अंतरवाटी सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटी साठी देखील पोहचले होते.कर्जत आणि खालापूर तालुक्याची ही ताकद लक्षात घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी खालापूर जवळ खोपोली येथे आरक्षण सभा घेतली होती.
कालच्या आंदोलनासाठी मुंबई जवळच्या तालुक्यातील मराठा समाजाने हजारो चे संख्येने यायला हवे असे राज्य समन्वयक यांच्याकडून सूचना आल्यानंतर 29ऑगस्ट रोजी भल्या पहाटे कर्जत सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते हजाराचे संख्येने मुंबईकडे निघाले होते.त्या ठिकाणी आंदोलन आणखी काही दिवस चालणार ही नक्की झाल्यानंतर मुंबई जवळच्या शहरे महानगरे तालुक्यातील मराठा समाजाने चटणी भाकरी अशी न्याहारीची व्यवस्था करण्याची भूमिका मांडली.त्यानुसार एक एक रुपया गोळा करून सकल मराठा समाजाने चटणी भाकरी ची व्यवस्था केली आहे.या चटणी भाकरी उपनगरीय लोकलने मुंबई कडे रवाना झाल्या आहेत.