Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : शिवसेना- राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोपांची चिखलफेक; महेंद्र थोरवे म्हणजे …. ; सुधाकर घारे यांची जहरी टीका

कर्जत तालुक्याचे राजकारणात जोरदार चिखलफेक सुरू असून महायुती मधील ही वाद आता स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुकीत एकमेकांच्या उणी काढण्यापर्यंत पोहचले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 08, 2025 | 07:27 PM
Karjat News : शिवसेना- राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोपांची चिखलफेक; महेंद्र थोरवे म्हणजे …. ; सुधाकर घारे यांची जहरी टीका
Follow Us
Close
Follow Us:

कार्जत/ संतोष पेरणे : राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षातील सख्य आणखी ताणले जात आहे.कर्जत विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षाकडून टोकाला जाणारी टीका होत आहे.त्यात रायगडचा वाल्मीक कराड,देशाचे स्वातंत्र्य,पैशाची देवाणघेवाण आदी सर्व बाहेर येत आहे. दरम्यान,आमदार थोरवे यांनी तुमच्या नेत्यांचा राजीनामा द्या इकडे मी राजीनामा देतो असे खुले आव्हानं जाहीररित्या दिले आहे.त्यामुळे कर्जत तालुक्याचे राजकारणात जोरदार चिखलफेक सुरू असून महायुती मधील ही वाद आता स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुकीत एकमेकांच्या उणी काढण्यापर्यंत पोहचले आहेत.

कर्जत मतदारसंघाचे आमदार शिवसेनेचे महेंद्र थोरवे राष्ट्रवादी काँग्रेस सुनील तटकरे यांच्यावर आरोपांची राळ उठवली होती.त्यांनंतर रायगडचे राजकारणात त्यावर भरपूर चर्चा झाली आणि त्यानंतर अगदी तिसऱ्यांच दिवशी कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पत्रकार परिषद घेऊन जाहीर टीका करण्यात आली.त्यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर आरोपांची तोफ डागताना सुधाकर घारे म्हणाले की महेंद्र थोरवे म्हणजे वाल्मिकी कराड, असी टीका केली आहे.6 जून रोजी कर्जत विधानसभा मतदारसंघाचा आढावा बैठक शिवसेना पक्षाने आयोजित केली.निमित्त स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकीचे असलेतरी आमदार महेंद्र थोरवे यांच्या भाषणात त्यांच्या निशाणावर सुधाकर घारे,भरत भगत आणि सुनील तटकरे हेच राहणार होते.

शिवसैनिकांचे बैठकीत आमदार थोरवे यांनी यापुढील सर्व निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत असे सांगितले आणि नंतर दहा मिनिटांचे भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोपांची राळ उठवली.सुधाकर घारे यांच्यावर आपले भरपूर उपकार आहेत हे त्यांच्या वडिलांना विचारा पण तुम्ही माझ्यावर आरोप करताना परिसीमा बाळगली नसल्याने पराभव झाल्यावर तो पचवायचा असतो.आम्ही देखील पराभव पचवला असून पराभव का झाला यांचे आत्मचिंतन करा अशी सूचना केली.

मात्र त्यानंतर सुनील तटकरे यांच्याकडे मोर्चा वळविताना आमची मदत घेऊन सुनील तटकरे तुम्ही खासदार झाला आहात.तुम्हाला तुमच्या राजकीय ताकदीची एवढी खात्री आहे तर राजीनामा द्या मी देखील लगेच राजीनामा देतो.तुम्ही पुन्हा खासदार होऊन दाखवा असे आव्हान देताना मला माझ्या शिवसैनिक यांच्यावर विश्वास असल्याने कर्जत मधून पुन्हा निवडून येईल असा हल्ला चढवला.तर राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत भगत यांच्यावर एकेरी भाषेत हल्ला चढवताना आमदार थोरवे यांनी याला वाटते त्याच्यामुळे देश स्वतंत्र झाला अशी टीका असताना तू आधी माझ्याकडून घेतलेले पैसे परत दे नंतर बघू असे आव्हान दिले.मी फार वाईट असून मला तोंड उघडायला लावू नका असे आव्हान आमदार थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केला.तर शिवसेना विरुद्ध शिवसेना लढते त्यावेळी विरोधकांचा फायदा होतो,पण यावेळी महायुतीच्या घटक पक्षात अपक्ष बरोबर लढाई होती.या निवडणुकीत शिवसेना एकसंघ असती तर मला दीड लाख मते मिळाली असती आणि त्यामुळे शिवसेना एकसंघ ठेवण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार असे जाहीर केले.

आरोप अत्यारोपाचे राजकारण आणि चिखलफेक सुरू असताना लागलीच 7 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस भरत भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर जोरदार टीका केली. भगत यांनी देखील नेहमीप्रमाणे महेंद्र थोरवे यांच्यावर एकेरी भाषेत हल्ला चढवला. “तुझे मी पैसे कधीच घेतले नाहीत तर मी अडचणीत असताना माझ्या मुलाकडून अकरा लाख उकळले असा आरोप केला.तुमचे पैसे मी घेतले असतील तर कर्जत टिळक चौकात स्टेज बांधा मी सर्व बँक डिटेल घेऊन येतो तेथेच जनतेच्या समोर कोणी कोणाचे पैसे घेतले हे जाहीर करू असे आव्हानं भरत भगत यांनी आमदारांना दिले.

त्याचवेळी आपण स्वातंत्र्य सैनिक यांचे सुपुत्र असून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठी भूमिका घेतली होती याचा आपल्याला अभिमान आहे.माझ्या वडिलांनी भूमिहीन शेतकऱ्यांना जमिनी मिळवून देण्यासाठी लढा उभारला तर तुम्ही शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेण्याचे काम करीत आहात.देश स्वतंत्र झाला त्यावेळी झाला जन्म पण नव्हता आणि त्यामुळे देशाच्या स्वतंत्र्य लढ्यात माझा तसा काही संबंध नाही असे सांगताना आता हे दोन्ही शिवसेना एकसंघ करणार म्हणत आहेत,ते त्यांचे नेत्यांना पचणार आहे काय?असा प्रश्न भगत यांनी उपस्थित केला आहे.जे जाणार होते ते तुमच्या बरोबर गेले आहेत राहिले आहेत ते ठामपणे शिवसेना ठाकरे पक्ष ताकद बाळगून आहेत आणि त्यामुळे शिवसेना एकसंघ ठेवण्याचे विसरून जा असा सल्ला भगत यांनी दिला”.या राजकीय चिखलफेक यामुळे कर्जत तालुक्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.

Web Title: Karjat news shiv sena nationalist mudslinging of accusations and counter accusations mahendra thorve is valmiki karad sudhakar ghares venomous criticism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2025 | 07:27 PM

Topics:  

  • karjat news
  • Mahendra Thorve
  • Valmik karad

संबंधित बातम्या

Karjat News : मुसळधार पावसाने कर्जतला झोडपलं; शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान
1

Karjat News : मुसळधार पावसाने कर्जतला झोडपलं; शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान

Karjat News : अत्याधुनिक सेवा सुविधांनी नेरळ स्थानकाचं सुशोभिकरण, मात्र सुऱक्षेचा प्रश्न अद्याप अस्पष्ट
2

Karjat News : अत्याधुनिक सेवा सुविधांनी नेरळ स्थानकाचं सुशोभिकरण, मात्र सुऱक्षेचा प्रश्न अद्याप अस्पष्ट

Karjat News : स्थानिक पत्रकारावर केलेल्या हल्ल्या प्रकरणी पोलिसांच्या हाती यश; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
3

Karjat News : स्थानिक पत्रकारावर केलेल्या हल्ल्या प्रकरणी पोलिसांच्या हाती यश; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Karjat News : “धरण नको पण…”, ‘या’ प्रकल्पाला गावकऱ्यांचा तीव्र विरोध, न्यायलयाच्या निर्णयावर व्यक्त केला संताप
4

Karjat News : “धरण नको पण…”, ‘या’ प्रकल्पाला गावकऱ्यांचा तीव्र विरोध, न्यायलयाच्या निर्णयावर व्यक्त केला संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.