Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : टाटा पॉवर कंपनीमधील नवीन प्रकल्पाचे सुरुंग स्फोट; आदिवासी ग्रामस्थ जगतायच भितीच्या छायेत

तालुक्यातील भिवपुरी ग्रामपंचायत हद्दीत टाटा कंपनी कडून धरण बांधले जात आहे.या धरणाचे कामासाठी गेली वर्षभर दररोज सुरुंग स्फोट केले जात असून त्या स्फोटामुळे येथील आदिवासी लोकांच्या घरांना तडे गेले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 05, 2026 | 05:06 PM
Karjat News : टाटा पॉवर कंपनीमधील नवीन प्रकल्पाचे सुरुंग स्फोट; आदिवासी ग्रामस्थ जगतायच भितीच्या छायेत
Follow Us
Follow Us:
  • टाटा पॉवर कंपनीमधील नवीन प्रकल्पाचे सुरुंग स्फोट
  • आदिवासी ग्रामस्थ जगतायच भितीच्या छायेत
कर्जत/ संतोष पेरणे :  तालुक्यातील भिवपुरी ग्रामपंचायत हद्दीत टाटा कंपनी कडून धरण बांधले जात आहे.या धरणाचे कामासाठी गेली वर्षभर दररोज सुरुंग स्फोट केले जात असून त्या स्फोटामुळे येथील आदिवासी लोकांच्या घरांना तडे गेले आहेत. दरम्यान,तडे जाण्याचे तसेच सुरुंग स्फोट झाल्यानंतर घरावर अंगणात दगड येण्याचे प्रकार कायम सुरू असल्याने आदिवासी लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

100 वर्षापूर्वी कर्जत येथे टाटा कंपनी कडून पुणे जिल्ह्यात बांधलेल्या धरणाचे पाणी कर्जत तालुक्यात आणण्यात आले.त्या पाण्यावर वीज निर्मिती करून सदर वीज मुंबई पर्यंत नेण्यात आली.आता याच वीज निर्मिती केंद्राच्या बाजूला असलेल्या ओसाड जमिनीवर खोल खड्डा खोदून पाणी साठवण करणारे धरण बांधले जात आहे.या धरणाचे साठवण बंधाऱ्या साठी तब्बल 65 एकर जमिनीमध्ये खोल खड्डा बनविला जात आहे.65 एकर मध्ये खड्डा खोदण्यासाठी अनेक प्रोक्लेम मशीन वापरल्या जात आहेत.येथील दगड फोडण्यासाठी मे 2025 पासून दररोज सुरुंग स्फोट केले जात आहेत.या कामाच्या अगदी बाजूला तापकीरवाडीची आदिवासी वाडी बसली आहे.या गाडीमध्ये 22 कुटुंब राहत असून या ठिकाणी वस्ती करून राहणाऱ्या लोकांना तेथे राहणे कठीण होऊन बसले आहे.त्यामुळे येथील सर्व आदिवासी लोक भीतीच्या छायेत असून घरावर पडणारे दगड आणि घरांना पडलेल्या भेगा यामुळे आदिवासी मरणयातना सहन करून राहत आहे.

पर्यटकांची वाढती गर्दी, पण सुविधा अपुऱ्या! नागाव समुद्र किनाऱ्यावर अंधार, स्वच्छता आणि सुरक्षेचा प्रश्न गंभीर

टाटा कंपनी कडून सुरुंग स्फोट करताना काहीवेळा आदिवासी वाडीमध्ये येऊन आगाऊ सूचना देण्यात येत असतात.मात्र याचे प्रमाण जेमतेम 5 टक्के असून सातत्याने होणारे सुरुंग स्फोट यामुळे येथील आदिवासी लोकांना अनेकदा टाटा कंपनी मध्ये घुसून जाब विचारला आहे.अनेकदा येथील आदिवासी लोकांनी रात्र सुरुंग स्फोट होतात त्या भागात काढली आहे.त्या वेळी कंपनी कडून केवळ आता सुरुंग स्फोट करणार नाहीत असे सांगण्यात येत असते.मात्र पुन्हा सुरुंग स्फोट सुरू होतात असा आरोप गुलाब वाघमारे यांनी केला आहे.टाटा कंपनी आपले शब्द पाळण्याचे काम करीत नसल्याने आदिवासी लोक संतप्त आहेत.दुसरीकडे या ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच कुंदा मोरमारे यांच्या घरावर भलामोठा दगड येऊन पडला तसेच त्यांची मुलगी जखमी झाली.मात्र मुलीला वैद्यकीय मदत करायला देखील टाटा कंपनी कडून कोणी आले नाही.तसेच आता त्या 65 एकरातील पाणी साठवण तलाव बनविण्याचे काम जेमतेम 25-30 टक्के झाले आहे. त्यामुळे आणखी वर्षभर तेथे सुरुंग स्फोट होणार आहेत ही बाब लक्षात घेऊन या वाडीचे अन्य सुरक्षित ठिकाणी पुनवर्सन करावे अशी मागणी आदिवासी लोक सातत्याने करीत आहेत.मात्र आदिवासी लोकांच्या मागणीला केवळ वाटण्याच्या अक्षता दाखवण्याचे काम कंपनी प्रशासन करीत आहेत.

Raigad News: जमीन दिली पण पैसे नाहीत! मुरुड-जंजिरा पुलाचे काम ठप्प; शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्याने आंदोलन

आकाश हिलम.. ग्रामस्थ
सतत होणारे सुरुंग स्फोट आणि रात्रभर चालणाऱ्या अवजड गाड्या यामुळे झोप येत नाही.त्यामुळे आमच्या गावाला धोका असून आमचे तत्काळ सुरक्षित जागी पुनर्सवन करावे..

कंपनीचे आश्वासन हवेत..
आतापर्यंत कंपनीने आमच्या घरांची मोजदाद घेतली आहे,घरांवर नंबर टाकले आहेत.पण एक एकर जमीन घेऊन आमच्या सर्व ग्रामस्थांना घरे बांधून देण्याचे आश्वासन दिले आहे.आम्ही उपोषणात भाग घेतला पण आम्हाला घरे काही बांधून मिळाली नाहीत.अब्जावधीचे व्यवहार करणाऱ्या टाटा कंपनीला आदिवासी लोकांच्या घरासाठी एक एकर जमीन घेता येत नसल्याने सर्वांनी नाराजी व्यक्त केली आहे.

घरांना तडे आणि घरांवर दगड येत असून येथे राहणारे आदिवासी कुटुंब धारक..
आकाश हिलम, संतोष शिद, दत्ता हिलम,मंगेश शीद, विलास शिद, दक्षता शिद,गुलाब वाघमारे,लहू शीद,अंकुश वाघमारे,रमेश शीद,विजय वाघमारे,महादू शीद,भगवान शीद,गंगाराम वाघमारे आदी.

Web Title: Karjat news tunnel blast at new project in tata power company tribal villagers live in fear

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 05:06 PM

Topics:  

  • karjat news
  • Marathi News
  • Raigad News

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.