कर्जत /संतोष पेरणे : तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात मोठी प्रगती घेतली असून नाचणी सारखे पीक घेणारे शेतकरी तर राज्यात क्रमांक एक वर राहिले आहेत.या सर्व शेतकऱ्यांना प्रगत करण्यात राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी घडवलेली हरितक्रांती महत्वाची आहे मात्र तालुक्यातील शेतकरी अवकाळी पावसाने आर्म खचला असून त्यांना मदत मिळाली पाहिजे यासाठी आमदार महेंद्र थोरवे अध्यकतेखाली १५ दिवसात बैठक लावली जाईल असे आश्वासन कर्जत पंचायत समितीचे माजी उप सभापती मनोहर थोरवे यांनी मांडले.कृषी दिनाचे निमित्ताने कर्जत कृषी विभाग यांच्या वतीने शेतकऱ्यांना तूर बियाणे यांचे वाटप तसेच भाजीपाला कीट यांचे वाटप करण्यात आले.
कृषी दिनाच्या निमित्ताने शासनाचा कृषी विभाग आणि कर्जत पंचायत समिती कृषी विभाग यांच्या माध्यमातून कृषी दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.कृषी दिनाचे निमित्ताने रानभाज्या महोत्सवाचे आयोजन केले होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कर्जत पंचायत समितीचे माजी उप सभापती मनोहर थोरवे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील,तालुका कृषी अधिकारी राजाराम शिंदे,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सावळाराम जाधव, नागो गवळी,कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गजानन पेमारे,संचालक रवींद्र झांजे,चंद्रकांत मांडे,अजित पाटील,हभप शिवराम महाराज तुपे,नेरळ विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक शशिकांत मोहिते तसेच शेतकरी संघटना अध्यक्ष राणे,प्रगत शेतकरी अंकुश शेळके,बजरंग श्रीखंडे,मिलिंद विरले,संतोष वैखरे यशवंत भवारे,रेश्मा म्हात्रे,वैशाली ठाकरे,रेखा हिरेमठ,ज्योत्स्ना विरले, शिवाजी कराळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी शिंदे यांनी केले. कर्जत येथील भात संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ नामदेव म्हसकर यांनी शेती मधील एकात्मिक शेती करण्याचे आवाहन केले.तालुका पंचायत समितीचे कृषी अधिकारी अजय चव्हाण,विस्तार अधिकारी देविदास राठोड,मंडळ कृषी अधिकारी दिनेश कुमार कोळी,मंगेश गलांडे आदी उपस्थित होते.
माजी उप सभापती मनोहर थोरवे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अधिकारी वर्ग तीन वर्षाच्या कालावधीनंतर निघून जात असतो.शेतकरी हा अवकाळी पावसाने पूर्णपणे खचला असून शेतकऱ्यांना शासन कोणते मदत या ठिकाणी भाताच्या पिकाची नासधूस झाली आहे.यांचे काय झाले याबाबत आढावा घेण्यासाठी पुढील १५ दिवसात आमदारांचे नेतृत्वाखाली बैठक घेतली जाईल असे आश्वासन दिले.कृषी शास्त्रज्ञ मंच चे चंद्रकांत मांडे यांनी कर्जत भात शेती केंद्रातील कार्यक्रम यावर्षी रद्द केला आहे हे का झाले याचा अभ्यास केला पाहिजे.
कोकण कृषी विद्यापीठ मधील संशोधन केंद्रातील अधिकारी कर्मचारी यांना पगार सरकार देतो.त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचे कोणते नुकसान होते याचे काही देणेघेणे दिसत नाही असा आरोप केला.भात संशोधन केंद्राचे सहयोगी शास्त्रज्ञ डॉ वाघमोडे यांनी जाहीर केले पण भाताचे बियाणे का दिले नाही? असा प्रश्न मांडे यांनी उपस्थित केला.शासनाने विविध रंगाचा भाताचे पिक घेण्यासाठी २३ हेक्टर चे क्षेत्र दिले होते पण फक्त दोनच तालुक्यात ते क्षेत्र निवडले आहे हे जिल्हा कृषी अधिकारी यांचे मनमानी आहे असे आरोप केला.
राज्यस्तरीय नाचणी पीक स्पर्धा.. प्रथम क्रमांक मिळविणारे प्रकाश काळुराम निरगुडे,दुसरा क्रमांक मिळविणारे गणपत निरगुडा, तिसरा क्रमांक राजू सराई यांचा विशेष सन्मान करण्यात आला.तर शेतकऱ्यांना विशेष सहकार्य कर्मचारी कृषी विभाग मधील अनिल रूपनवर,तसेच रायगड जिल्हा प्रथम क्रमांक मिळविणारे सचिन केंद्रे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.तर भाताचे पेटंट मिळविणारे शेतकरी भाई नरेंद्र गंधे तर उसाची शेती करणारे मंगेश मिसाळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात आदिवासी शेतकरी यांना तूर लागवड करण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले.त्यात यशवंत कांबडी,सुनील पारधी,काळाराम निरगुडा,मधुकर शिंगवा,सदानंद शिंगवा,बुद्धीबाई दरवडा यांना देण्यात आले.
कर्जतमध्ये पावसाच्या निमित्ताने खास पावसाळी रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला. आदिवासी आणि बिगर आदिवासी शेतकरी यांनी मांडलेले रानभाज्या मांडल्या असून लोत,कुरडु,कावळा,शेवळे, करटोली,माठ,कुरडु,अळु,कवळा, टाकळा,शेवगा,तेलपट,भारंगी, कोळू,बाफळीची भाजी,अळु पपई,केळी,पेरू,हळद या पिकांचे उत्पादन घेतले आहे.