Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : ‘….अन्यथा उपोषण करु’ ; नळजोडणी गैरप्रकरणाबाबत पंचायत समिती सदस्य आक्रमक

नेरळ ग्रामपंचायतमधील नळजोडणी गैरव्यवहार प्रकरणावर सखोल चौकशी व्हावी यासाठी पंचायय समितीच्या सदस्यांनी मागणी केली आहे. जर असं झालं नाही तर उपोषणाला बसू अशी ताकिद दिली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 27, 2026 | 12:46 PM
Karjat News : ‘….अन्यथा उपोषण करु’ ; नळजोडणी गैरप्रकरणाबाबत पंचायत समिती सदस्य आक्रमक
Follow Us
Follow Us:
  • ‘….अन्यथा उपोषण करु’ ;
  • नळजोडणी गैरप्रकरणाबाबत पंचायत समिती सदस्य आक्रमक
कर्जत/ संतोष पेरणे : नेरळ ग्रामपंचायतमधील नळजोडणी गैरव्यवहार तसेच प्रशासक यांचा कथित गैरकारभार आणि पाण्याच्या नियोजनातील भ्रष्टाचाराच्या विरोधात कर्जत पंचायत समितीचे सदस्य आणि माजी सरपंच भगवान बाळकृष्ण चंचे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या कारभाराची पक्षपातीपणे चौकशी न झाल्यास येत्या 6 एप्रिलपासून नेरळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात चंचे यांनी कर्जतचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांना लेखी निवेदन सादर केले आहे.

भगवान चंचे यांनी आपल्या निवेदनात प्रशासक काळातील अनेक गंभीर बाबींवर बोट ठेवले आहे. प्रशासक काळात अनेक ठिकाणी पाणी कनेक्शन देण्यात आले, ज्यातून लाखो रुपयांची उलाढाल झाली. मात्र, यातील एक रुपयाही ग्रामपंचायतीच्या तिजोरीत जमा झाला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच ग्रामसभेचा विरोध डावलून ममदापूर भागातील बिल्डरांना पाणी पुरवण्यात आले. संबंधित बिल्डर दोन एचपी च्या मोटारीने पाणी उपसा करत असतानाही ग्रामपंचायतीने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. आणि तुलसी बिल्डिंगला २५ कनेक्शन दिले असून त्याचे पैसे जमा नाहीत, तसेच घरपट्टीच्या नावाखाली घेतलेले लाखो रुपये नेमके गेले कुठे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

तसेच ग्रामपंचायतीकडे वीज बिल भरण्यास पैसे नसल्याने नेरळ शहराचा पाणीपुरवठा पाच दिवस खंडित झाला होता. या परिस्थितीला ग्रामपंचायत प्रशासनच जबाबदार असून, जनतेचा पैसा जनतेच्याच कामासाठी वापरला गेला पाहिजे, अशी आग्रही मागणी चंचे यांनी केली आहे.दरम्यान ग्रामपंचायतीच्या या गैरकारभाराची तात्काळ चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात यावी. जर ६ एप्रिलपर्यंत कारवाई झाली नाही, तर मी आमरण उपोषणाला बसणार असून, माझ्या जीवाचे काही बरे-वाईट झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा भगवान चंचे यांनी दिला आहे.

Karjat News : नव्या विकासकामामुळे रहिवाशांच्या घराला धोका; रेल्वे उड्डाण पुलाच्या विरोधात शेतकरी आक्रमक

काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या नेरळ ग्रामपंचायतमध्ये पाणी वितरण व्यवस्था करताना आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचे दिसून आले.ममदापूर ग्रामपंचायतीची स्वतंत्र नळपाणी योजना असताना तेथे नळजोडण्या देण्यात आल्या. अनेक बांधकाम व्यावसायिक यांना नळजोडण्या देऊन पाण्याचे वितरण केलं जात. मात्र त्याची कोणतीही नोंद नेरळ ग्रामपंचायत मध्ये दिसली नाही. दरम्यान या गैरव्यवहाराबाबत नेरळ ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि कर्जत पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य भगवान चंचे आणि ग्रामपंचायत माजी सदस्य प्रथमेश मोरे यांनी हा गैरव्यवहार उघडकीस आणला. ग्रामपंचायतीचं पाणी परस्पर बिल्डरांना दिला जात असल्याचा आरोप भगवान चंचे व नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रथमेश मोरे यांनी आरोप केला आहे.नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील पाणी प्रश्न मागील काही दिवसांपासून तापला आहे.

Matheran News: ‘ग्राउंड रियालिटी’ तपासा; माथेरानमधील ९४ हातरिक्षा चालकांचे उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर स्थगित!

Web Title: Karjat newspanchayat samiti members aggressive over illegal water connection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 12:46 PM

Topics:  

  • karjat news
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला
1

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार
2

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार

Germany News : माजी गुप्तचर प्रमुखाला अटक; हेरगिरी आणि देशद्रोहाच्या प्रयत्नाचा गंभीर आरोप!
3

Germany News : माजी गुप्तचर प्रमुखाला अटक; हेरगिरी आणि देशद्रोहाच्या प्रयत्नाचा गंभीर आरोप!

Israel News :युद्धाच्या राखेतून ‘टुरिझम शो’; इस्रायलच्या जाहिरातीने पॅलेस्टाइनचा वाद पुन्हा पेटवला!
4

Israel News :युद्धाच्या राखेतून ‘टुरिझम शो’; इस्रायलच्या जाहिरातीने पॅलेस्टाइनचा वाद पुन्हा पेटवला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.