Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

New Khambatki Tunnel: खंबाटकी बोगदा चाचणीसाठी खुला; पुणे–सातारा प्रवास होणार अधिक जलद आणि सुरक्षित

नव्या बोगद्यात आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. यात सुधारित प्रकाशयोजना, सीसीटीव्ही निगराणी, रुंद मार्गिका, परावर्तक चिन्हे आणि आपत्कालीन व्यवस्था यांचा समावेश आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 29, 2026 | 06:00 PM
कल्याण-लातूर प्रवास होणार आणखी गतिमान; माळशेज घाटात 8 किमी लांबीचा बोगदा

कल्याण-लातूर प्रवास होणार आणखी गतिमान; माळशेज घाटात 8 किमी लांबीचा बोगदा

Follow Us
Follow Us:
  • नवीन सहापदरी बोगद्यामुळे प्रवाशांचा किमान ३० मिनिटांचा वेळ वाचणार
  • साडेआठ किलोमीटरचा वळणावळणाचा घाट रस्ता टाळता येणार
  • गद्याचे सुमारे ८६ टक्के काम पूर्ण झाले असून सध्या चाचणी (Testing) सुरू
New Khambatki Tunnel: पुणे–बंगळुरू महामार्गावरील दुसरा खंबाटकी बोगदा चाचणीसाठी खुला करण्यात आला असून त्यामुळे पुणे–सातारा मार्गावरील प्रवाशांची वाहतूक अधिक सुखकर होणार आहे. लवकरच या बोगद्याचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) स्पष्ट करण्यात आले आहे.

या बोगद्यामुळे खंबाटकी घाटातील धोकादायक वळणे, वारंवार होणारी वाहतूक कोंडी, अपघात आणि वाहनांचे नुकसान यापासून प्रवाशांची मोठी सुटका होणार आहे. सुमारे साडेआठ किलोमीटरचा घाटरस्ता टाळता येणार असून, नव्या सहापदरी बोगद्यामुळे पुणे–सातारा प्रवासात किमान अर्धा तास वाचणार आहे. त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि गतिमान होईल.

Satara Census: साताऱ्यात आता पेपरलेस जनगणना! पहिल्या टप्प्यात १५ मे पर्यंत ‘स्व-नोंदणी’ करण्याची संधी

गेल्या काही वर्षांपासून खंबाटकी घाटातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी या सहापदरी बोगद्याचे काम सुरू होते. आता बोगद्याचे सुमारे ८६ टक्के काम पूर्ण झाले असून, मे २०२६ मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री Nitin Gadkari यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता आहे.

नव्या बोगद्यात आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. यात सुधारित प्रकाशयोजना, सीसीटीव्ही निगराणी, रुंद मार्गिका, परावर्तक चिन्हे आणि आपत्कालीन व्यवस्था यांचा समावेश आहे. जुन्या बोगद्याच्या तुलनेत हा बोगदा अधिक रुंद आणि सुरक्षित असल्याचेही एनएचएआयने स्पष्ट केले आहे.

या प्रकल्पामुळे पुणे आणि सातारा दरम्यान स्थानिक रहिवासी तसेच पर्यटकांना मोठा फायदा होणार आहे. यापूर्वी हा घाट पार करण्यासाठी १५ ते २० मिनिटे लागत होती, मात्र आता बोगद्यातून हा प्रवास अवघ्या ५ ते १० मिनिटांत पूर्ण होणार आहे.

Satara News: अध्यक्षांची कागदपत्रे तक्रारदाराच्या हाती! डॉ. प्रिया शिंदेंच्या वकिलांचा विरोध अमान्य; १९ मे रोजी होणार पुढचा फैसला

खंबाटकी घाट हा मुंबई–पुणे–बंगळुरू कॉरिडॉरमधील महत्त्वाचा दुवा आहे. हा मार्ग सातारा, कोल्हापूर आणि बेळगाव या शहरांना जोडतो. तसेच पाचगणी, महाबळेश्वर, कास पठार यांसारख्या पर्यटनस्थळांसाठी आणि सज्जनगड, मांढरदेव, गोंदवले येथे जाणाऱ्या भाविकांसाठीही हा मार्ग महत्त्वाचा आहे.

नव्या बोगद्याची वैशिष्ट्ये

दोन स्वतंत्र सहापदरी बोगदे

प्रत्येकी तीन मार्गिका

प्रवासाचा वेळ १५ ते २५ मिनिटांनी कमी

इंधन वापर, वाहन देखभाल खर्च आणि झीज कमी

अपघाताचा धोका घटणार

पुणे–बेळगाव, पाचगणी–महाबळेश्वर तसेच स्थानिक वाहतूक व पर्यटनासाठी उपयुक्त

 

Web Title: Khambatki tunnel open for testing pune satara journey to get faster and safer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 06:00 PM

Topics:  

  • Satara News

संबंधित बातम्या

Satara ZP Education Officer: सातारा जिल्हा परिषदेत खळबळ! शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे राज्य शासनाकडून निलंबित
1

Satara ZP Education Officer: सातारा जिल्हा परिषदेत खळबळ! शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे राज्य शासनाकडून निलंबित

Satara Voter Registration Camp 2026: सातारकरांसाठी महत्त्वाची बातमी! १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिर
2

Satara Voter Registration Camp 2026: सातारकरांसाठी महत्त्वाची बातमी! १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिर

घटत्या पटसंख्येमुळे शाळा बंद होण्याच्या मार्गावर; वसंतराव मानकुमरे यांचे विधान
3

घटत्या पटसंख्येमुळे शाळा बंद होण्याच्या मार्गावर; वसंतराव मानकुमरे यांचे विधान

Satara News : गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात घरगुती गणेशमूर्तींचे आगमन; सोमवारी दुपारपर्यंत घरोघरी प्रतिष्ठापना
4

Satara News : गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात घरगुती गणेशमूर्तींचे आगमन; सोमवारी दुपारपर्यंत घरोघरी प्रतिष्ठापना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.