Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Dictrict Bank Election : जावळीत शिवेंद्रराजेंच्या निष्ठावंताचा डंका! ज्ञानदेव रांजणे यांचा जिल्हा बँक निवडणुकीत दणदणीत विजय

Satara Dictrict Bank Election : जावळीच्या राजकारणात ज्ञानदेव रांजणे यांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सोसायटी मतदारसंघातून रांजणे यांनी विठ्ठल गोळे यांचा ३० मतांनी पराभव केला.

  • By विवेक
Updated On: Nov 03, 2026 | 04:12 PM
satara bank election victory

satara bank election victory

Follow Us
Follow Us:
  • जावळीत ज्ञानदेव रांजणे यांचा दणदणीत विजय
  • शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मायक्रो प्लॅनिंगचा विजयात मोठा वाटा
  • शशिकांत शिंदेंच्या गैरहजेरीची जावळीत चर्चा
 

मेढा, दत्तात्रय पवार : जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या राजकारणाची सुरुवात ही मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली, तर विठ्ठल गोळे हे प्रदेशअध्यक्ष शिंदेंचे निष्ठावंत मानले जातात.जिल्हा बँकेसाठी सोसायटी मतदारसंघातून रांजणे विरुद्ध गोळे अशी दुहेरी लढत झाली होती. यामध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निष्ठावंत ज्ञानदेव रांजणे यांनी गोळे यांच्या विरोधात तब्बल ३० मतांनी दणदणीत विजय मिळवला. (Satara Dictrict Bank Election)

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत कुसुंबी गटातून रांजणे यांच्या सुविद्य पत्नी अर्चना रांजणे या पराभूत झाल्यानंतर अनेकांनी या गटामध्ये आपली राजकीय ताकद अधिक असल्याचा दावा केला, मात्र ती केवळ सूज असल्याचे समोर आले आहे.केवळ गणपती उत्सवात आरतीला हजेरी लावून नेते म्हणून मिरवणाऱ्यांना सोसायटीचा साधा एक ठरावही घेता आला नाही.

जिल्हा बँकेसाठी रांजणे यांनी दुसऱ्यांदा उमेदवारी मिळवली व संपूर्ण निवडणुकीचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मायक्रो प्लानिंग केले. या मायक्रो प्लॅनिंग मुळेच आजच्या निकालात रांजणे यांनी ४७ पैकी ३८ मते मिळवली.तर गोळेंना ८ मते मिळाली.मालचौडी सोसायटी मतदारास नावातील बदलामुळे मतदानाचा हक्क बजावता आला नाही.

Satara District Bank Election: जिल्हा बँकेत भाजप सर्वात मोठा पक्ष; नऊ जागा पटकावून अध्यक्ष पदाची मोर्चेबांधणी

रांजणे यांच्या विरोधात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे निवडणूक रिंगणात उतरतील अशी दाट शक्यता असताना शिंदे यांनी ऐनवेळी आपले निष्ठावंत समर्थक माथाडी कामगार युनियनचे सरचिटणीस विठ्ठल गोळे यांना निवडणूक रिंगणात उतरवले.

विठ्ठल गोळे यांनी देखील आपल्या नेत्याचा आदेश मानून केवळ निष्ठेपाई निवडणूक रिंगणात उडी घेतली. मात्र या एकतर्फी झालेल्या निवडणुकीत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निष्ठावंत ज्ञानदेव रांजणे यांनी तब्बल ३० मतांनी विजय मिळवला.तर गोळे यांनी अवघी ८ मते मिळवता आली.

विजयानंतर रांजणे समर्थकांनी जावळी तालुक्यात गुलाल उधळत फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला.

शशिकांत शिंदेंची मतदानासाठीही गैरहजेरी चर्चेचा विषय

दरम्यान, आपल्या समर्थक उमेदवाराला निवडणूक रिंगणात उतरविल्यानंतर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे मतदानाच्या दिवशी उपस्थित राहतील आणि समर्थकांचा मनोबल वाढवतील, अशी अपेक्षा त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांमध्ये होती. मात्र ते मतदानासाठी उपस्थित राहिले नसल्याने तसेच त्यांनी मतदानाचा हक्क बजावला नसल्याचे सांगण्यात येत असल्याने हा मुद्दाही निकालानंतर चर्चेत आला आहे.आपला निष्ठावंत समर्थक निवडणूक मैदानात असताना नेत्याची प्रत्यक्ष उपस्थिती ही कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची असते. त्यामुळे शशिकांत शिंदे यांच्या गैरहजेरीबाबत जावळीतील राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

रांजणे यांच्या विजयाला सागर धनावडे जयदीप शिंदे, अत्तार यांच्या साथीची जोड

सोसायटीचे ठराव घेण्यापासून ते मतदारांना मतदान प्रक्रियेपर्यंत सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी युवा कार्यकर्ते सागर धनावडे, जयदीप शिंदे समीर आत्तार यांच्यावर सोपवण्यात आली होती. मतदार सहलीवर पाठवण्याच्या कारणावरून विरोधक एकीकडे राळ उठवत होते. मात्र निवडणूक प्रक्रियेचा हा एक भाग होता. तब्बल अडीच महिने सहलीवर नेलेल्या या मतदारांची कुटुंबाप्रमाणे काळजी घेण्याचे काम ज्ञानदेव रांजणे यांचे शिलेदार सागर धनवडे, जयदीप शिंदे, समीर अत्तार यांनी प्रामाणिकपणे केले. त्यामुळे त्यांच्या या भक्कम साथीमुळे रांजणे यांचा विजयाचा मार्ग आणखी सुकर झाला.

सांगली जिल्हा बँकेत रोहित पाटलांना धक्का; पडळकर, घोरपडे, संजयकाकांची बाजी !

💡

Frequently Asked Questions

  • Que: ज्ञानदेव रांजणे यांनी जिल्हा बँक निवडणुकीत किती मतांनी विजय मिळवला?

    Ans: ज्ञानदेव रांजणे यांनी विठ्ठल गोळे यांचा तब्बल ३० मतांनी पराभव केला. त्यांना ३८ मते मिळाली.

  • Que: ज्ञानदेव रांजणे यांचे राजकीय समर्थक कोण आहेत?

    Ans: ज्ञानदेव रांजणे हे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक मानले जातात. त्यांच्या राजकीय प्रवासात शिवेंद्रसिंहराजे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

  • Que: विठ्ठल गोळे यांना जिल्हा बँक निवडणुकीत किती मते मिळाली?

    Ans: विठ्ठल गोळे यांना या निवडणुकीत अवघी ८ मते मिळाली, तर ज्ञानदेव रांजणे यांनी ३८ मते मिळवत विजय मिळवला.

Web Title: Satara dictrict bank election dnyandev ranjane victory javali vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • Satara Bank
  • Satara News
  • Shashikant Shinde
  • Shivendra Raje Bhosale

संबंधित बातम्या

Satara Water Management : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनाचे मोठे निर्णय! मंत्री शंभूराज देसाईंचे महत्त्वाचे निर्देश
1

Satara Water Management : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनाचे मोठे निर्णय! मंत्री शंभूराज देसाईंचे महत्त्वाचे निर्देश

Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीतच संघर्ष; ३ नोव्हेंबरला सत्तेचा फैसला
2

Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीतच संघर्ष; ३ नोव्हेंबरला सत्तेचा फैसला

Raju Shetti : ऊसदरासाठी पुणे-बंगळुरू महामार्गावर स्वाभिमानीचा दुहेरी एल्गार! राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर-सांगलीचे श
3

Raju Shetti : ऊसदरासाठी पुणे-बंगळुरू महामार्गावर स्वाभिमानीचा दुहेरी एल्गार! राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर-सांगलीचे श

Satara News : भोसले की गाढवे, खंडाळ्यात कोण मारणार बाजी? जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तिरंगी लढत
4

Satara News : भोसले की गाढवे, खंडाळ्यात कोण मारणार बाजी? जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तिरंगी लढत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.