Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : भोसले की गाढवे, खंडाळ्यात कोण मारणार बाजी? जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तिरंगी लढत

Satara News : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खंडाळा विकास सेवा सोसायटी मतदारसंघात अजय भोसले, अनिरुद्ध गाढवे आणि शामराव गाढवे यांच्यात तिरंगी लढत झाली. ८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मकरंद पाटील आणि जयकुमार गोरे यांची प्रतिष्ठाही पणाला लागल्याने निकालाकडे लक्ष लागले आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 01, 2026 | 08:41 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • भोसले-गाढवे यांच्यात प्रतिष्ठेची लढाई
  • मकरंद पाटील आणि जयकुमार गोरेंची ताकद पणाला
  • ८८ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
Satara News : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत खंडाळा तालुक्यातील विकास सेवा सोसायटी मतदारसंघाची लढत चांगलीच रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजय भोसले, भाजपचे अनिरुद्ध गाढवे आणि अपक्ष उमेदवार ॲड. शामराव गाढवे यांच्यात तिरंगी सामना रंगला. मतदान शांततेत पार पडले असले, तरी या निवडणुकीत नेमका कोण बाजी मारणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे.

भोसले-गाढवे यांच्यात प्रतिष्ठेची लढाई

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत खंडाळा तालुक्यातील विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वतीने अजय भोसले, भाजपकडून अनिरुद्ध गाढवे, तर अपक्ष म्हणून ॲड. शामराव गाढवे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तिन्ही उमेदवारांमध्ये लढत असली, तरी मुख्य सामना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातच असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

सहकार क्षेत्रातील प्रतिनिधित्व मिळवण्याबरोबरच या निवडणुकीत स्थानिक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठाही पणाला लागली होती. त्यामुळे मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले.

Satara News: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विक्रमी मतदान;२८ उमेदवारांचे भवितव्य बंदिस्त; ९७.९२ टक्के मतदानाचा उच्चांक

मकरंद पाटील आणि जयकुमार गोरेंची ताकद पणाला

या निवडणुकीच्या निमित्ताने मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे या दोघांचीही राजकीय ताकद पणाला लागली. आपल्या समर्थित उमेदवाराला विजय मिळवून देण्यासाठी दोन्ही नेत्यांनी स्थानिक पातळीवर मोठी मोर्चेबांधणी केली होती.

मतदानाच्या दिवशी राजकीय हालचालींनाही वेग आला. सहलीवर गेलेल्या मतदारांसह मंत्री मकरंद पाटील यांनी सकाळी साडेअकराच्या सुमारास खंडाळ्यात प्रवेश केला. दुसरीकडे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचेही मतदारांसह छत्रपती शिवाजी महाराज चौकात आगमन झाले. दोन्ही बाजूंच्या नेत्यांच्या उपस्थितीमुळे परिसरात राजकीय वातावरण तापले. राष्ट्रवादी आणि भाजपकडून शक्तिप्रदर्शन झाल्याची चर्चा सुरू झाली.

मोठी बातमी ! खर्च तिप्पट झाल्यास मंत्रिमंडळ मंजुरी बंधनकारक; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीही महत्त्वपूर्ण

८८ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

खंडाळ्यात दिवसभर मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. सोसायटीसह अन्य संस्थांमधील एकूण ८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिन्ही उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांकडून विजयाचे दावे केले जात आहेत. मात्र, मतदारांनी नेमका कोणाच्या बाजूने कौल दिला आहे, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. अजय भोसले आपले वर्चस्व सिद्ध करणार की अनिरुद्ध गाढवे बाजी मारणार, की अपक्ष शामराव गाढवे निकालात अनपेक्षित उलटफेर घडवणार, याकडे आता खंडाळा तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: Satara khandala district bank election bhosale vs gadhave cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 08:41 PM

Topics:  

  • District Bank Election
  • Marathi News
  • Satara News

संबंधित बातम्या

Israel News : इस्रायलमध्ये अमेरिकेच्या टँकर विमानांची मोठी जमवाजमव; इराणविरोधातील संभाव्य लष्करी कारवाईच्या चर्चेला वेग
1

Israel News : इस्रायलमध्ये अमेरिकेच्या टँकर विमानांची मोठी जमवाजमव; इराणविरोधातील संभाव्य लष्करी कारवाईच्या चर्चेला वेग

Raju Shetti : ऊसदरासाठी पुणे-बंगळुरू महामार्गावर स्वाभिमानीचा दुहेरी एल्गार! राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर-सांगलीचे श
2

Raju Shetti : ऊसदरासाठी पुणे-बंगळुरू महामार्गावर स्वाभिमानीचा दुहेरी एल्गार! राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर-सांगलीचे श

Italy News : बालविवाहाचे समर्थन करणाऱ्या पाकिस्तानी इमामला इटलीतून दिले हाकलून
3

Italy News : बालविवाहाचे समर्थन करणाऱ्या पाकिस्तानी इमामला इटलीतून दिले हाकलून

Satara News : महायुतीचा धर्म पाळण्यासाठी जागांवर पाणी सोडले; शिवेंद्रराजेंची कबुली
4

Satara News : महायुतीचा धर्म पाळण्यासाठी जागांवर पाणी सोडले; शिवेंद्रराजेंची कबुली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.