Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raju Shetti : ऊसदरासाठी पुणे-बंगळुरू महामार्गावर स्वाभिमानीचा दुहेरी एल्गार! राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर-सांगलीचे श

Raju Shetti : ऊसदराच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. ३ नोव्हेंबरला पुणे-बंगळुरू महामार्गावर किणी टोलनाका आणि नागठाणे येथे एकाच वेळी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.

  • By विवेक
Updated On: Nov 01, 2026 | 08:59 PM
Raju Shetti

Raju Shetti

Follow Us
Follow Us:
  • ऊसदरासाठी ३ नोव्हेंबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन
  • किणी टोलनाका आणि नागठाणे येथे एकाच वेळी चक्का जाम
  • राजू शेट्टी किणी टोलनाक्यावर आंदोलनाचं नेतृत्व करणार
 

टिटवेवाडी : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळावा, यंदाच्या हंगामातील पहिली उचल प्रतिटन ४५०० रुपये जाहीर करावी आणि शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी त्यांना मिळावे, या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आता आरपारच्या संघर्षाची भूमिका घेतली आहे. मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर एकाच दिवशी दोन ठिकाणी बेमुदत चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील शेतकरी किणी टोलनाका येथे आंदोलन करणार असून, सातारा जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ऊस उत्पादक शेतकरी नागठाणे (ता. सातारा) येथील उरमोडी नदी पुलाशेजारी महामार्गावर आंदोलन करणार आहेत. त्यामुळे ऊसदराच्या प्रश्नावर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात आंदोलनाची धग अधिक तीव्र होणार आहे. (Raju Shetti)

कारखानदारांच्या मनमानीविरोधात शेतकरी रस्त्यावर!

गेल्या अनेक दिवसांपासून ऊसदराच्या प्रश्नावर कारखानदारांना चर्चेतून मार्ग काढण्याची संधी देण्यात आली. मात्र, शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाचा विचार करून प्रतिटन ४५०० रुपयांची पहिली उचल जाहीर करण्याबाबत अपेक्षित सकारात्मक भूमिका घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील खटाव, कराड आणि कोरेगाव तालुक्यांत विविध ठिकाणी साखर कारखान्यांकडे जाणारी ऊस वाहतूक रोखण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शेतकरी आणि संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावरच मुक्काम करून आंदोलनाची धुरा सांभाळत आहेत. आता या संघर्षाची पुढील पायरी म्हणून नागठाणे येथे बेमुदत चक्का जाम आंदोलन पुकारण्यात आले आहे.

शेतकऱ्यांसाठी शरद पवार मैदानात! चार जिल्ह्यांत दुष्काळी दौरा सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार

राजू शेट्टी किणी टोलनाक्यावर, साताऱ्यात नागठाणे येथे संघर्षाची मशाल!

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी हे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन किणी टोलनाका येथे आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. त्याचवेळी सातारा जिल्ह्यातील स्वाभिमानीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ऊस उत्पादक शेतकरी एकजुटीने नागठाणे येथील उरमोडी नदी पुलाशेजारी महामार्गावर चक्का जाम आंदोलन करणार आहेत. त्यामुळे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर दोन ठिकाणी एकाच वेळी शेतकऱ्यांच्या हक्काचा आवाज बुलंद होणार आहे.

धरणात पाणी आहे, मग शेतकऱ्यांच्या शिवारात का नाही?

केवळ ऊसदराचा प्रश्नच नव्हे, तर कृष्णा, उरमोडी आणि तारळी नदीच्या पाण्याचा प्रश्नही या आंदोलनात प्रखरपणे उपस्थित केला जाणार आहे. धरणांमध्ये पाणीसाठा उपलब्ध असताना शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी देण्याची वेळ आली की नियम, कायदे आणि कालवा सल्लागार समितीच्या बैठकांचे कारण पुढे केले जाते. मात्र, शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी अन्यत्र वळविले जात असल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे.

शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी पळविताना नियमांची अडचण येत नाही; मग तेच पाणी शेतकऱ्यांना देताना कायद्याचे दाखले का दिले जातात? अधिकार आणि सत्तेचा गैरवापर करून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करायची, शेतकऱ्यांना पाण्याची भीती दाखवायची आणि त्यांचा ऊस कमी दरात कारखान्यांकडे वळवायचा, हा प्रकार आता खपवून घेतला जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका संघटनेने घेतली आहे. कृष्णा, उरमोडी आणि तारळी नदीतून शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी सोडावे, ही मागणीही नागठाणे येथील आंदोलनातून लावून धरली जाणार आहे.

हा लढा केवळ शेतकऱ्यांचा नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या अस्तित्वाचा!

ऊस उत्पादक शेतकरी जगला तरच गावातील बाजारपेठ, व्यापारी, दुकानदार, वाहतूकदार आणि ग्रामीण अर्थव्यवस्था टिकणार आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्व शेतकरी, व्यापारी, दुकानदार, तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांनी ३ नोव्हेंबर रोजी नागठाणे येथे होणाऱ्या आंदोलनात एक दिवस शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आता नाही तर कधीच नाही!

ऊसाला प्रतिटन ४५०० रुपये पहिली उचल आणि शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळविण्यासाठी आता निर्णायक संघर्षाची वेळ आली आहे. कोल्हापूर-सांगलीतील शेतकरी किणी टोलनाक्यावर, तर सातारा जिल्ह्यातील शेतकरी नागठाणे येथे एकाच वेळी रस्त्यावर उतरून आपली एकजूट दाखवणार आहेत. शेतकऱ्यांच्या घामाची किंमत आणि पाण्याचा हक्क मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार, असा ठाम निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने व्यक्त केला आहे.

‘शेतकऱ्यांना त्रास दिला तर आडवं करू!’ मायक्रो फायनान्स कंपन्यांना एकनाथ शिंदेंचा थेट इशारा

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ऊसदर आंदोलन कधी होणार आहे?

    Ans: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या घोषणेनुसार ३ नोव्हेंबर रोजी बेमुदत चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.

  • Que: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची प्रमुख मागणी काय आहे?

    Ans: यंदाच्या गळीत हंगामासाठी ऊसाला प्रतिटन ४५०० रुपये पहिली उचल मिळावी, ही संघटनेची प्रमुख मागणी आहे.

  • Que: आंदोलन कोणत्या ठिकाणी होणार आहे?

    Ans: कोल्हापूर-सांगलीतील शेतकरी किणी टोलनाका येथे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणार आहेत. तर सातारा जिल्ह्यातील शेतकरी नागठाणे येथील उरमोडी नदी पुलाजवळ आंदोलन करणार आहेत.

Web Title: Swabhimani shetkari sanghatana sugarcane rate protest raju shetti vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 08:57 PM

Topics:  

  • Raju Shetti
  • Satara News
  • Sugarcane Farmers
  • Swabhimani Shetkari Saghtana

संबंधित बातम्या

Satara News : भोसले की गाढवे, खंडाळ्यात कोण मारणार बाजी? जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तिरंगी लढत
1

Satara News : भोसले की गाढवे, खंडाळ्यात कोण मारणार बाजी? जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तिरंगी लढत

Satara News : महायुतीचा धर्म पाळण्यासाठी जागांवर पाणी सोडले; शिवेंद्रराजेंची कबुली
2

Satara News : महायुतीचा धर्म पाळण्यासाठी जागांवर पाणी सोडले; शिवेंद्रराजेंची कबुली

Raju Shetti: ऊसदरावरून संघर्ष पेटणार? राजू शेट्टींचा ३ नोव्हेंबरला महामार्ग रोखण्याचा इशारा
3

Raju Shetti: ऊसदरावरून संघर्ष पेटणार? राजू शेट्टींचा ३ नोव्हेंबरला महामार्ग रोखण्याचा इशारा

संजय गायकवाडांच्या पुतळ्याचे कुत्र्यांनी तोडले लचके! युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन, २४ तासांत माफीचा इशारा
4

संजय गायकवाडांच्या पुतळ्याचे कुत्र्यांनी तोडले लचके! युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन, २४ तासांत माफीचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.