Bacchu Kadu On Farmers News: बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात नुकतीच राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद पार पडली. या परिषदेत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर, आमदार बच्चू कडू, तसेच ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे दीपक केदार यांचा प्रमुख सहभाग होता. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आयोजित ही परिषद शेतकऱ्यांच्या समस्या, आत्महत्यांचे वाढते प्रमाण आणि शासनाच्या धोरणांवरील नाराजी व्यक्त करण्यासाठी भरविण्यात आली होती.
Muralidhar Mohol NCP offer: मुरलीधर मोहोळांना कुणी दिली होती राष्ट्रवादी काँग्रेसची ऑफर..?
या सभेत बोलताना आमदार बच्चू कडू यांनी एक वादग्रस्त विधान करत शेतकऱ्यांच्या वेदना मांडल्या. त्यांनी म्हटलं की, “स्वतः आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांना कापून टाका.” त्यांच्या या वक्तव्याने सभागृहात क्षणभर शांतता पसरली, मात्र नंतर उपस्थित शेतकऱ्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, विरोधकांनी बच्चू कडूंवर टीकेची झोड उठवली आहे. दुसरीकडे, काही शेतकरी नेत्यांनी हे विधान शेतकऱ्यांच्या तीव्र संतापाचे प्रतीक असल्याचे सांगितले आहे.
या परिषदेत बोलताना बच्चू कडू म्हणाले, ही वेदनाची, दुःखाची परिषद आहे. दिवाळीच्या दिवशी ही परिषद घ्यावी लागत आहे. तुम्ही विचारांची लढाई सोडून जातीपातीची लढाई सुरू केली. त्यामुळे शेतकरी मागे राहिले. आता शेतकऱ्यांना कमी भावात सोयाबीन विकावे लागत आहे, राजकीय मोर्चे, मेळावे, प्रचाराला गर्दी असते ,पण शेतकरी परिषदेला गर्दी जमत नाही,अशी खंतही बच्चू कडू यांनी व्यक्त केली.
बच्चू कडू म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तलवारीने सुरू केलेली लढाई लेखणीने संपविली. शरद जोशी यांनी अडीच लाख रुपये पगाराची नोकरी सोडून आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी लढा दिला. पण या सरकारने शेतकऱ्यांना भगवा, हिरवा आणि निळ्या रंगात विभाजित केले. शेतकरी विभाजित झाला. शरद जोशी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मला सुध्दा शेवटी शेतकऱ्यांनीच साथ दिली — कारण मी जातीत बसलो नाही. तुम्ही असंच केलात तर तुमच्यासाठी कोणीही लढणार नाही.”
‘काही दिवसांआधीच मी भेटलो, माझ्याकडे शब्द नाहीत…’, असरानी यांच्या निधनाने अक्षय कुमार दुःखी; म्हणाला
तुमच्यापेक्षा तुमचा बैल बरा, त्याला लाथ तरी मारता येते. पण शेतकऱ्याला विचारले तू काय करतो तर त्याला काहीच येत नाही. शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाकावं. असा कार्यक्रम केला तर सरकारला गुडघ्यावर यायला वेळ लागणार नाही. पण हे करणार कोण. त्यामुळे शेतकऱ्यांनी मारण्यापेक्षा लढणे सुरू करा. आमच्या शेतमालाला भाव मिळाला नाही तर आम्ही लोकांना नोकरीवर ठेवू, आरक्षणामुळे एखादे कुटुंब किंवा समाज सुखी होऊ शकतो, पण शेतमालाला भाव मिळाल तर आख्ख गाव सुखी होईल, अशी भावनाही बच्चू कडू यांनी व्यक्त केली.
या परिषदेत बच्चू कडू यांनी येत्या 28 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे मोर्चा काढण्याची घोषणा केली. “पंजाबच्या शेतकऱ्यांनी 13 महिन्यांच्या संघर्षानंतर काळे कायदे रद्द करायला लावले, आणि आपण मात्र ‘बायकोची आठवण’ येते म्हणून घरी परततो! शेतात जशी मेहनत करता, तिच्या फक्त एका टक्क्याने आंदोलनात सहभाग घ्या, मग तुमचे हक्क मिळतील. जेव्हा सर्व रंगांचे झेंडे घेऊन शेतकरी एकत्र लढतील, तेव्हाच त्यांच्या सुखाचे दिवस येतील.” असही कडू यांनी नमुद केलं