मुरलीधर मोहोळांना कुणी दिली होती राष्ट्रवादी काँग्रेसची ऑफर..?
आरआरबी एनटीपीसी पदभरती 2025: रेल्वे खात्यात मोठी भरती संधी!
यावेळी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, 2019च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपने सुनील शेळकेंना उमेदवारी नाकारली. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना उमेदवारी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसने शेळकेंची उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी मला पहिला फोन केला. भाजपमधून माझं तिकीट कट झालं आहे. मला राष्ट्रवादीतून तिकीट मिळालं आहे. तुझं पण तिकीट कट झालं आहे. असं त्यांनी सांगितलं.
कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटील आलेत तू माझ्याबरोबर चल त्यावेळी मी सुनील शेळके यांना स्पष्टपणे सांगितले की, मी दिल्या घरी सुखी आहे. तू पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ नकोस, तर शेळकेंनी, मी पर येणार नाही, मी परतीचे दोर कापले आहेत, असं सांगितले. सुनील शेळके त्या पक्षात गेले, त्यांच भलं झालं. मी माझ्या पक्षात राहिलो माझंही भलं झालं, कारण आमची मैत्री अशी आहे. त्या काळात देखील सुनील शेकळेंना माझी आठवण झाली. असं मुरलीधर मोहोळांनी सांगितलं.
दिवाळीत सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी टेस्टी पनीर टोस्ट, नोट करून घ्या रेसिपी
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावेळी राज्याचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, “राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारही मोठी मदत करत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भरीव मदत केली जाईल. संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे.” या कार्यक्रमाला केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, शंकर मांडेकर, माजी आमदार बाळा भेगडे तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक उपस्थित होते.
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या बेकायदेशीर विक्रीवरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीरआरोप करण्यात आले होते. या प्रकरणात जैन बोर्डिंग हाऊसची जमीन गोखले कन्स्ट्रक्शनला विकण्यात आली असून यात मुरलीधर मोहोळांचीही भागीदारी असल्याचा आरोप जैन समाजाकडून कऱण्यात आला आहे. मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या दोन सहकारी बिल्डरांना जैन समाजाची जागा हडपल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.






