Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्रीय मंत्री नारायण राणेंची कणकवली येथील निवासस्थानी किरण सामंत यांनी घेतली भेट

कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची शनिवारी किरण सामंत यांनी भेट घेतली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 04, 2024 | 11:01 AM
केंद्रीय मंत्री नारायण राणेंची कणकवली येथील निवासस्थानी किरण सामंत यांनी घेतली भेट
Follow Us
Follow Us:

केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची शिवसेनेचे सिंधुरत्न समृद्धी योजनेचे सदस्य उद्योजक किरण सामंत यांनी शनिवारी कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व प्राप्त झाले असून जिल्ह्यात त्याबाबत चर्चा रंगली आहे.

लोकसभा निवडणुकीला तळ कोकणात रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ महायुतीमध्ये नेमका कोणाच्या वाट्याला येणार? हे अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र, शिवसेनेकडून मागील वर्षभर लोकसभेसाठी किरण सामंत यांच्या उमेदवारीची प्रबळ दावेदारी केली जात आहे. खुद्द किरण सामंत यांनीही लोकसभा निवडणुक लढविण्याची इच्छा अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही शिवसेनेचा हा पारंपरिक मतदारसंघ असल्याने शिवसेनेचाच उमेदवार लोकसभेला असेल असे जाहीर केले आहे.

सोबतच किरण सामंत यांनी लोकसभा लढवावी असेही म्हटले होते. तर अलीकडेच केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी ट्विट करत हा मतदारसंघ भाजपाच लढवेल असे जाहीर केले. खुद्द नारायण राणे हेच लोकसभेचे महायुतीचे उमेदवार असतील अशी चर्चा केली जात आहे. दुसरीकडे भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांनीही लोकसभा निवडणूक लढविण्याची जाहीर इच्छा व्यक्त केली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत राणेंच्या ओम गणेश बंगल्यावर जाऊन किरण सामंत यांनी त्यांची भेट घेणे, त्यांना पुष्पगुच्छ देत त्यांच्या पाया पडणे, याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Web Title: Kiran samant met union minister narayan rane at his residence in kankavali maharashtra political party maharashtra government kankavali sindhudurg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2024 | 11:01 AM

Topics:  

  • Government of India
  • kankavali
  • lok sabha elections
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

दस्तांच्या प्रमाणित प्रती ‘ई-प्रमाण’वर; अकोला जिल्ह्यातील 9 कार्यालयांमार्फत विविध सेवा उपलब्ध
1

दस्तांच्या प्रमाणित प्रती ‘ई-प्रमाण’वर; अकोला जिल्ह्यातील 9 कार्यालयांमार्फत विविध सेवा उपलब्ध

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा
2

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा

राज्यात 30.82 लाखांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त; सणासुदीत भेसळखोरांवर FDA ची असणार नजर
3

राज्यात 30.82 लाखांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त; सणासुदीत भेसळखोरांवर FDA ची असणार नजर

Ajit Pawar Airplane Crash : अजित पवार विमान अपघाताचा अंतिम अहवाल एका महिन्यात? घातपाताच्या तक्रारीनंतर हालचालींना वेग
4

Ajit Pawar Airplane Crash : अजित पवार विमान अपघाताचा अंतिम अहवाल एका महिन्यात? घातपाताच्या तक्रारीनंतर हालचालींना वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.