मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याचा आज सर्वंच स्तरातून विरोध होताना दिसत आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.
असून माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही संताप व्यक्त केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे वादग्रस्त राज्यपाल म्हणून जगभरात प्रसिद्ध असून त्यांनी महाराष्ट्राचा अपमान करण्याची पुन्हा हिंमत करू नये असा इशारा त्यांनी दिला आहे.
[read_also content=”न्यायमूर्ती रणजित मोरे यांची ‘पॅट’च्या अध्यक्षपदी नियुक्ती https://www.navarashtra.com/maharashtra/justice-ranjit-vasantrao-more-has-been-appointed-as-the-chairman-of-pat-nrka-309793.html”]
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल म्हणून असलेली जबाबदारी कधीच पार पाडली नाही. राज्यपाल हे केवळ वादग्रस्त राज्यपाल म्हणूनच प्रसिद्ध आहेत. त्यांना कशीही प्रसिद्धी हवी असते. नकारात्मक प्रसिद्धी असली तरी चालते. राज्यपाल पदाचा मान सन्मान आम्ही ठेवतो. या पदाचा मान राखून सांगते की, यापुढे राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान करण्याची हिंमत करू नये, असा इशारा त्यांनी दिला. महाराष्ट्रातील मराठी माणसांचं योगदान कसं विसरता येईल. महाराष्ट्रात राहुनच मराठी लोकांचा विसर कसा पडतो असा सवालही पेडणेकर यांनी केला.
नितेश राणे यांनी राज्यपाल कोश्यारी यांची पाठराखण केली. राज्यपालांना विरोध करणाऱ्यांनी किती मराठी माणसांना मोठं, श्रीमंत केलं असा सवाल केला होता. किशोरी पेडणेकर यांनी नितेश राणेंवर पलटवार केला. नितेश राणे लहान असताना त्यांचे वडील नारायण राणे हे बेस्ट समितीचे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी कोणाला मोठं केले, याचे उत्तर शोधावे असे पेडणेकर यांनी सांगितले. राणे जिथे जातात, त्या पक्षाची सुपारी वाजवतात असा आरोपही किशोरी पेडणेकर यांनी केला. राणे कुटुंबीय हे सुपारी घेणारे कुटुंब असल्याची बोचरी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली.
[read_also content=”कोश्यारी नावाचं पार्सल घरी किंवा तुरुंगात पाठवा; उद्धव ठाकरेंची संतापले https://www.navarashtra.com/maharashtra/udhhav-thackeray-criticized-on-governer-bhagat-singh-koshyari-statement-nrps-309777.html”]