Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कणकवलीतील मराठा सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन कधी होणार? पालकमंत्री नितेश राणेंनी तारीखच सांगितली

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कणकवली शहरात मराठा सांस्कृतिक भवन, कलादालन व उद्यान प्रकल्पाचे भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 20, 2026 | 02:55 PM
कणकवलीतील मराठा सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन कधी होणार? पालकमंत्री नितेश राणेंनी तारीखच सांगितली

कणकवलीतील मराठा सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन कधी होणार? पालकमंत्री नितेश राणेंनी तारीखच सांगितली

Follow Us
Close
Follow Us:
  • कणकवलीतील मराठा सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन कधी होणार?
  • पालकमंत्री नितेश राणे यांची मोठी घोषणा
  • सकल मराठा समाजाच्या वतीने राणेंचा सत्कार
कणकवली : राज्य शासनाच्या माध्यमातून कणकवलीत मराठा सांस्कृतिक भवन उभारले जात आहे. या भवनाच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील सांस्कृतिक चळवळीला हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. राणे कुटुंबाचा शब्द म्हणजे बंदुकीतील गोळी असते, तो कधीही चुकत नाही. आज या वास्तूचे भूमिपूजन झाले असून, पुढील वर्षी १९ फेब्रुवारी २०२७ रोजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत या वास्तूचे दिमाखात उद्घाटन होईल, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कणकवली शहरात मराठा सांस्कृतिक भवन, कलादालन व उद्यान प्रकल्पाचे भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी मंत्री राणे बोलत होते.

शिवरायांनी अन्याय आणि दडपशाहीविरुद्ध लढायला शिकवले

मंत्री राणे म्हणाले, शिवरायांनी आपल्याला अन्याय आणि दडपशाहीविरुद्ध लढायला शिकवले. त्यांनी स्वराज्य स्थापन केले आणि हिंदू धर्माचे रक्षण केले. आज काही लोक महाराजांची तुलना टिपू सुलतानाशी करतात, पण ती कधीच होऊ शकत नाही. ज्याने ८००० हिंदूंची कत्तल केली, तो टिपू महाराजांच्या नखाचीही सर धरू शकत नाही. महाराजांनी कधीही कोणत्याही मशिदीकडे वाकड्या नजरेने पाहिले नाही, त्यांनी न्यायाचे राज्य चालवले. स्वराज्यात जसे पारदर्शक प्रशासन होते, तसेच आमचे प्रशासन गतीने काम करत आहे.

सकल मराठा समाजाच्या वतीने पालकमंत्र्यांचा सत्कार

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, शासनाच्या वतीने आम्ही पूर्ण ताकदीने हे सांस्कृतिक भवनाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. यावेळी अ‍ॅड. उमेश सावंत, सतीश सावंत, भाई परब यांनी मनोगत व्यक्त केले. संतोष राऊळ यांनी मराठा सांस्कृतिक भवन उभारण्यामागील भूमिका मांडली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पालकमंत्र्यांचा सत्कार केला. सकल मराठा समाजाच्यावतीने पालकमंत्री राणे यांचा सत्कार करण्यात आला.

हे सुद्धा वाचा : भाजपला मोठा धक्का! भिवंडी महापौरपदी नारायण चौधरी विराजमान

राणे कुटुंबाचे नाते निवडणुकांपुरते नाही

सिंधुदुर्ग आणि राणे कुटुंबाचे नाते केवळ निवडणुकांपुरते नाही. २०१४ ते २०१९ या काळात आम्ही सत्तेत नव्हतो, पराभूत होतो, तरीही जिल्ह्यासाठी मेडिकल कॉलेज उभे केले. त्या विचारातूनच आम्ही घडलो आहोत. ही वास्तू उभी करताना सकल मराठा समाजाने आपल्या सूचना द्याव्यात, कारण ही वास्तू सांभाळण्याची सामूहिक जबाबदारी तुमची आणि आमची आहे. सकल मराठा समाजातील ज्येष्ठ मराठा नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी अक्षरसिंधू कलामंचतर्फे पालकमंत्र्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

Web Title: Nitesh rane has announced the date of inauguration of the maratha cultural bhavan in kankavali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • kankavali
  • Narayan Rane
  • Nitesh Rane

संबंधित बातम्या

“मत्स्यव्यवसायात महाराष्ट्र ‘नंबर वन’ करणार”; मंत्री नितेश राणेंचे प्रतिपादन
1

“मत्स्यव्यवसायात महाराष्ट्र ‘नंबर वन’ करणार”; मंत्री नितेश राणेंचे प्रतिपादन

“हा तर ‘कॉर्पोरेट जिहाद’…”; IT कंपन्यांतील महिलांच्या लैंगिक शोषणावरून नितेश राणे संतापले; म्हणाले…
2

“हा तर ‘कॉर्पोरेट जिहाद’…”; IT कंपन्यांतील महिलांच्या लैंगिक शोषणावरून नितेश राणे संतापले; म्हणाले…

“सागरी सुरक्षेच्या दृष्टीने ड्रोनद्वारे…”; मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेंचे स्पष्ट निर्देश
3

“सागरी सुरक्षेच्या दृष्टीने ड्रोनद्वारे…”; मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेंचे स्पष्ट निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.