Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘The Kerala Story 2 – Go Beyond’ चित्रपटाला नितेश राणेंचा जाहीर पाठिंबा, ट्रेलर शेअर करत लिहिले, ‘या जिहाद्यांना घरात…’

‘द केरळ स्टोरी २: गोज बियॉन्' चा दमदार ट्रेलर प्रदर्शित होताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. आता या चित्रपटाला नितेश राणे हे देखील जाहीर पाठिंबा देताना दिसले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 18, 2026 | 10:50 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘द केरळ स्टोरी २’ चित्रपटाला नितेश राणेंचा जाहीर पाठिंबा
  • ट्रेलर शेअर करत चाहत्यांना केले चित्रपट पाहण्याचे आवाहन
  • नितेश राणे यांनी चित्रपटाबद्दल काय म्हटले?
 

आज ‘द केरळ स्टोरी २: गोज बियॉन्’ या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर ट्रेलरची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून अनेकांनी चित्रपटाविषयी उत्सुकता व्यक्त केली आहे. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’ या गाजलेल्या चित्रपटाचा हा पुढील भाग असल्याने प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच या चित्रपटाची कथा जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

व्हेंटिलेटरवर Salim Khan ! वडिलांसोबत रात्रभर थांबला सलमान; भाईजानला भावुक पाहून चाहते चिंतेत

नितेश राणे यांचा चित्रपटाला पाठिंबा

भारतीय जनता पक्षाचे नेते नितेश राणे यांनी चित्रपटाला खुला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आणि प्रेक्षकांना तो पाहण्याचे आवाहन केले. ट्रेलर शेअर करताना त्यांनी चित्रपटातील विषय महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. समाजासमोर वास्तव मांडणाऱ्या आणि संवेदनशील मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या कलाकृतींना पाठिंबा देणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे समर्थकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया उमटत असून अनेकांनी त्यांच्या पोस्टवर कमेंट करत चित्रपटाला समर्थन दर्शवले आहे.

ट्रेलर शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, ‘या जिहाद्यांना आपल्या घरात घुसण्यापूर्वी वेळीच रोखा. “लव्ह जिहाद”च्या नावाखाली 2047 पर्यंत आपल्या हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न हाणून पाडा!” असे लिहून त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

 

‘मुंबईत राहतो मराठी तर येणारच…’, हास्यजत्रेच्या कलाकारांसमोर रोहित शर्माने मारल्या गप्पा, Video Viral

दमदार सिक्वेलची मांडणी

निर्माते विपुल अमृतलाल शहा आणि त्यांच्या बॅनर सनशाईन पिक्चर्स यांच्या पाठिंब्याने तयार झालेल्या या चित्रपटाचा ट्रेलर अधिक गडद आणि व्यापक कथा मांडण्याचे संकेत देतो. 2022 मधील चित्रपटाच्या प्रभावानंतर हा सिक्वेल अधिक तीव्र आणि व्यापक पातळीवर कथानक मांडणार असल्याचे दिसते आहे. कामाक्षी नारायण सिंह यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या चित्रपटात उल्का गुप्ता, अदिती भाटिया आणि ऐश्वर्या ओझा यांच्या व्यक्तिरेखा केंद्रस्थानी आहेत. कथानकात तीन तरुणींच्या आयुष्यातील नाट्यमय वळण आणि त्यांच्या नात्यांमागील कथित कटकारस्थानाचा मागोवा घेतला जातो, असे ट्रेलरमधून सूचित होते.

अशिन ए. शाह सहनिर्मित हा चित्रपट येत्या 27 फेब्रुवारी 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरनंतर चित्रपटाबद्दलची चर्चा अधिकच रंगली असून, प्रदर्शनानंतर त्याला कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच हा चित्रपट किती कमाई करतो हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: The kerala story 2 go beyond trailer nitesh rane support

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 10:50 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Nitesh Rane

संबंधित बातम्या

KGF Star Yash : ‘आई-वडिलांसोबत पाहू शकत नाही असा रोमँटिक सीन…’, ‘टॉक्सिक’ वादात KGF स्टार यशचा जुना व्हिडिओ व्हायरल
1

KGF Star Yash : ‘आई-वडिलांसोबत पाहू शकत नाही असा रोमँटिक सीन…’, ‘टॉक्सिक’ वादात KGF स्टार यशचा जुना व्हिडिओ व्हायरल

‘मातृभूमी’ चित्रपटाच्या सेन्सॉर वादाच्या बातम्या खोट्या! सलमान खान फिल्म्सचे मोठं स्पष्टीकरण
2

‘मातृभूमी’ चित्रपटाच्या सेन्सॉर वादाच्या बातम्या खोट्या! सलमान खान फिल्म्सचे मोठं स्पष्टीकरण

OTT प्रेमींसाठी मेजवानी! ‘या’ आठवड्यात OTT वर मनोरंजनाचा डबल धमाका; ‘कॉकटेल 2’सह ६ चित्रपट पाहण्यासाठी सज्ज
3

OTT प्रेमींसाठी मेजवानी! ‘या’ आठवड्यात OTT वर मनोरंजनाचा डबल धमाका; ‘कॉकटेल 2’सह ६ चित्रपट पाहण्यासाठी सज्ज

Aamir Khan आणि गौरी स्प्रॅट यांच्या लग्नाची उत्सुकता शिगेला! ‘हे’ सेलिब्रिटी लावणार हजेरी; शाही मेजवानीचा मेन्यू चर्चेत
4

Aamir Khan आणि गौरी स्प्रॅट यांच्या लग्नाची उत्सुकता शिगेला! ‘हे’ सेलिब्रिटी लावणार हजेरी; शाही मेजवानीचा मेन्यू चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.