Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जाणून घ्या कल्याण लोकसभा मतदार संघात मतांचं गणित, डॉ. श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर

कल्याण ग्रामीणमध्ये डॉ. श्रीकांत शिंदे यांना सर्वाधिक तर कळवा मुंबऱ्यात कमी मते, वैशाली दरेकर यांना मुंब्रा विधानसभेत सर्वाधिक मते

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 05, 2024 | 05:08 PM
जाणून घ्या कल्याण लोकसभा मतदार संघात मतांचं गणित, डॉ. श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या डॉ. श्रीकांत शिंदे यांचा 2 लाख 9 हजार 144 मतांनी विजय झाला. या लोकसभा निवडणुकीची विधानसभा निहाय आकडेवारी आता समोर आली असून डॉ. श्रीकांत शिंदे यांना कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मते तर कळवा मुंब्रा विधानसभा मतदार संघात कमी मते मिळाली आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे यांना कळवा मुंब्रा विधानसभेत सर्वात जास्त मते प्राप्त झाली आहेत.

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी संपन्न झाली. त्यामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. महाराष्ट्रात दोन वर्षांपूर्वी झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर होणाऱ्या या देशाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

[read_also content=”लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर श्रीकांत शिंदे यांनी मानले मतदारांचे आभार https://www.navarashtra.com/maharashtra/shrikant-shinde-thanked-the-voters-after-the-results-of-the-lok-sabha-elections-542806.html”]

कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे हे सलग तिसऱ्यांदा दणदणीत मतांनी विजयी झाले आहेत. या विजयामध्ये मनसे आमदार राजू पाटील यांच्या कल्याण ग्रामीण मतदारसंघाने डॉ. शिंदे यांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला आहे. तर त्याखालोखाल डोंबिवली, अंबरनाथ, कल्याण पूर्व, उल्हासनगर आणि कळवा, मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक लागत आहे.

डॉ श्रीकांत शिंदेंना मिळालेली मते

डॉ. श्रीकांत शिंदे यांना कल्याण ग्रामीण विधानसभेत 1 लाख 51 हजार 702 मते, डोंबिवली विधानसभेत 99 हजार 734 मते, अंबरनाथ विधानसभेत 93 हजार 670 मते, कल्याण पूर्व विधानसभेत 87 हजार 129 मते, उल्हासनगर विधानसभेत 85 हजार 698 मते तर मुंब्रा कळवा विधानसभेत 69 हजार 988 मते मिळाली आहेत.

वैशाली दरेकर यांना मिळालेली मते

महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे यांना कळवा मुंब्रा विधानसभेत सर्वाधिक जास्त 1 लाख 35 हजार 496 मते मिळाली आहेत. त्यापाठोपाठ कल्याण ग्रामीण विधानसभेत 65 हजार 407 मते, अंबरनाथ विधानसभेत 58 हजार 28 मते, कल्याण पूर्व विधानसभेत 54 हजार 533 मते, डोंबिवली विधानसभेत 34 हजार 531 मते तर उल्हासनगर विधानसभेत 31 हजार 241 मते मिळाली आहेत.

टपाली मतदान देखील निर्णायक ठरले असून डॉ. श्रीकांत शिंदे यांना 1 हजार 715 तर वैशाली दरकेर यांना 1 हजार 256 मते मिळाली आहेत. वरीलपैकी कोणीही नाही म्हणजेच नोटाला 11 हजार 686 मतदारांनी मतदान केले आहे. दरम्यान 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत डॉ. श्रीकांत शिंदे यांना 29 हजार 313 मते जास्त मिळाली असून त्यांचे मताधिक्य मात्र 1 लाख 35 हजार 199 मतांनी घटले आहे. 2019 च्या निवडणुकीत डॉ. श्रीकांत शिंदे यांना 5 लाख 59 हजार 723 मते मिळाली होती. तर तेव्हा राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या विरोधात 1 लाख 35 हजार 199 मतांचे मताधिक्य मिळाले होते.

Web Title: Know the calculation of votes in kalyan lok sabha constituency dr shrikant shinde vs vaishali darekar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2024 | 05:08 PM

Topics:  

  • Dr Shrikant shinde

संबंधित बातम्या

जागतिक कन्या दिनानिमित्त ‘आशा’ चित्रपटाची भव्य स्क्रीनिंग; डॉ. श्रीकांत शिंदे यांची खास उपस्थिती!
1

जागतिक कन्या दिनानिमित्त ‘आशा’ चित्रपटाची भव्य स्क्रीनिंग; डॉ. श्रीकांत शिंदे यांची खास उपस्थिती!

Thane News : अंबरनाथच्या नागरिकांसाठी सुसज्ज न्यायालय ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडले उद्घाटन
2

Thane News : अंबरनाथच्या नागरिकांसाठी सुसज्ज न्यायालय ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडले उद्घाटन

Operation Sindoor: “गल्लीत बसून जे बरळत आहेत…”; श्रीकांत शिंदेंचे ऑपरेशन सिंदूरवर टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
3

Operation Sindoor: “गल्लीत बसून जे बरळत आहेत…”; श्रीकांत शिंदेंचे ऑपरेशन सिंदूरवर टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर

ठाण्यात ‘Diplomacy by Doctor’ चे आयोजन; श्रीकांत शिंदे यांचा आंतरराष्ट्रीय अनुभव लोकांपर्यंत पोहचणार
4

ठाण्यात ‘Diplomacy by Doctor’ चे आयोजन; श्रीकांत शिंदे यांचा आंतरराष्ट्रीय अनुभव लोकांपर्यंत पोहचणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.