Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prashant Koratkar: प्रशांत कोरटकरच्या जामिन अर्जावर पार पडली सुनावणी; कोर्टाने दिला ‘हा’ निर्णय

प्रशांत कोरटकर सध्या न्यायालयीन कोठडीत असून सब जेलमध्ये त्याला ठेवण्यात आले आहे. आपल्याला जामीन मिळावा यासाठी त्याने जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 07, 2025 | 05:55 PM
Prashant Koratkar: प्रशांत कोरटकरच्या जामिन अर्जावर पार पडली सुनावणी; कोर्टाने दिला ‘हा’ निर्णय
Follow Us
Follow Us:

कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करून इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली.  आज जिल्हा न्यायालयाने जामीन अर्जावर दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला.  मात्र पुढील सुनावणी नऊ एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे.

प्रशांत कोरटकर सध्या न्यायालयीन कोठडीत असून सब जेलमध्ये त्याला ठेवण्यात आले आहे. आपल्याला जामीन मिळावा यासाठी त्याने जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. मागील चार दिवसात याबाबत सुनावणी झाली. मात्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. पुन्हा याबाबत आज सोमवारी सुनावणी झाली. यामध्ये आरोपी व फिर्यादी यांच्या वकीलांचे म्हणणे न्यायालयाने ऐकून घेतले. मात्र याबाबत कुठलाही निर्णय दिला नाही या अर्जावर पुन्हा ९ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना त्याने धमकावलेही होते. याप्रकरणी प्रशांत कोरटकर याच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच नागपूर येथेही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी कोल्हापुरात प्रयत्न केला होता. दरम्यान, कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने त्याला काही अंशी दिलासा दिला होता. मात्र, विविध संघटनांच्या दबाव यामुळे त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्जासाठी प्रयत्न केले होते. त्याला तेलंगणामधून अटक करण्यात आली असून कोल्हापूर न्यायालयामध्ये दाखल करण्यात येत आहे. त्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे.

Prashant Koratkar: प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कोर्टाचा दणका; जामिन अर्ज फेटाळला

परिणय फुके यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी आणि इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्यामुळे प्रशांत कोरटकर याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कोल्हापूर कोर्टाकडून आधी त्याला अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. मात्र तो पोलिसांकडे कोणताही जबाब देण्यासाठी न आल्यामुळे त्याला अटक करण्याचे कोल्हापूर कोर्टाकडून आदेश देण्यात आले होते. कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून ताब्यात घेतले आहे. मात्र तो कॉंग्रेस नेत्याच्या घरी लपून बसला असल्याचा गंभीर आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.

इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनीही प्रशांत कोरटकर हे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. पोलिस अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार कोरटकर यांनी त्यांच्या मोबाईल फोनमधील डेटा डिलीट केल्याचा आरोप सरोदे यांनी केला होता.

Web Title: Kolhapur court hearing prashant koratkar bail application at 9 april about controversial statement on

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2025 | 05:55 PM

Topics:  

  • kolhapur
  • Prashant Koratkar

संबंधित बातम्या

Lotus Eletre चा कोल्हापुरात ग्रँड शो! लक्झरी इलेक्ट्रिक Hyper-SUV चे सादरीकरण; दोन दिवस रंगणार खास Brand Experience कार्यक्रम
1

Lotus Eletre चा कोल्हापुरात ग्रँड शो! लक्झरी इलेक्ट्रिक Hyper-SUV चे सादरीकरण; दोन दिवस रंगणार खास Brand Experience कार्यक्रम

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट
2

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट

Kolhapur Ganpati: कोल्हापुरातील ‘भू-अधिपती’ गणपती ठरतोय आकर्षण; मूर्तीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश
3

Kolhapur Ganpati: कोल्हापुरातील ‘भू-अधिपती’ गणपती ठरतोय आकर्षण; मूर्तीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश

Amit Shah Health Update: अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने दिल्लीकडे रवाना
4

Amit Shah Health Update: अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने दिल्लीकडे रवाना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.