प्रशांत कोरटकरचा जामिन अर्ज फेटाळला (फोटो -सोशल मिडिया )
कोल्हापूर: प्रशांत कोरटकर याच्या जामिन अर्जावर आज कोल्हापूर कोर्टात सुनावणी पार पडली. दरम्यान या झालेल्या सुनावणीत कोल्हापूर कोर्टाने प्रशंत कोरटकरचा जामिन अर्ज नाकारला आहे. म्हणजेच त्याला जामिन देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. प्रशांत कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान आज त्याच्या जामिन अर्जावर सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने कोरटकरचा जामिन अर्ज फेटाळून लावला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करून इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना त्याने धमकावलेही होते. याप्रकरणी प्रशांत कोरटकर याच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच नागपूर येथेही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी कोल्हापुरात प्रयत्न केला होता. दरम्यान, कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने त्याला काही अंशी दिलासा दिला होता. मात्र, विविध संघटनांच्या दबाव यामुळे त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्जासाठी प्रयत्न केले होते. त्याला तेलंगणामधून अटक करण्यात आली असून कोल्हापूर न्यायालयामध्ये दाखल करण्यात येत आहे. त्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे.
परिणय फुके यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी आणि इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्यामुळे प्रशांत कोरटकर याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कोल्हापूर कोर्टाकडून आधी त्याला अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. मात्र तो पोलिसांकडे कोणताही जबाब देण्यासाठी न आल्यामुळे त्याला अटक करण्याचे कोल्हापूर कोर्टाकडून आदेश देण्यात आले होते. कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून ताब्यात घेतले आहे. मात्र तो कॉंग्रेस नेत्याच्या घरी लपून बसला असल्याचा गंभीर आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.
Prashant Koratkar Case : प्रशांत कोरटकरची पाच तास कसून चौकशी; ‘ही’ माहिती आली समोर
यापूर्वी इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनीही प्रशांत कोरटकर हे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. पोलिस अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार कोरटकर यांनी त्यांच्या मोबाईल फोनमधील डेटा डिलीट केल्याचा आरोप सरोदे यांनी केला होता. याशिवाय, गेल्या १५ दिवसांपासून पोलीस प्रशांत कोरटकरचा शोध घेत होते. तो तपास यंत्रणांच्या रडारवर होता. असे असूनही, प्रशांत कोरटकर कोलकातासारख्या प्रमुख विमानतळावरून व्हिसाचा वापर करून दुबईला सहज प्रवास करेल, असे अनेकांना वाटले नव्हते. त्यानंतर आता त्याची अटक झाली आहे.