Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : व्यवसाय परवाना नसलेली दुकाने सील करा; अतिक्रणाविरोधात स्थायी समितीकडे मागणी

तावडे हॉटेल ते गांधीनगर परिसरातील महापालिकेच्या हद्दीत आलेल्या जागेवरील बांधकामांना पुन्हा नोटीसा द्यायची काय गरज आहे. यापूर्वी नोटीसा दिल्या आहेत ना? या ठिकाणी व्यवसाय सुरु आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 09, 2026 | 08:14 PM
Kolhapur News :  व्यवसाय परवाना नसलेली दुकाने सील करा; अतिक्रणाविरोधात स्थायी समितीकडे मागणी
Follow Us
Follow Us:
  • व्यवसाय परवाना नसलेली दुकाने सील करा;
  • अतिक्रणाविरोधात नागरिक आक्रमक
कोल्हापूर : तावडे हॉटेल ते गांधीनगर परिसरातील महापालिकेच्या हद्दीत आलेल्या जागेवरील बांधकामांना पुन्हा नोटीसा द्यायची काय गरज आहे. यापूर्वी नोटीसा दिल्या आहेत ना? या ठिकाणी व्यवसाय सुरु आहेत. मग परवाना विभागाने त्याच्यावर काय कारवाई केली. परवाना नसेल तर तत्काळ सर्व व्यवसायधारकांची दुकाने सील करा. परवाना विभागामार्फत आतापर्यंत का कारवाई केली नाही. तातडीने सर्व दुकाने सील करा. तसेच महापालिकेचा रीतसर परवाना द्या, अशी मागणी इंद्रजीत बोंद्रे, आदिल फरास, प्रवीण सोनवणे, अमर समर्थ यांनी केली. व्यवसाय परवाना विषयावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. विशेष म्हणजे पहिल्यांदाच स्थायी समितीची सभा शांततेत झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये आठ विषयांवर चर्चा झाली.

प्रशासनाने दिली माहिती
आयआरबीचे ४५ किलोमीटरचे रस्ते स्वच्छतेसाठी महापालिकेकडे मनुष्यबळ कमी असलेने स्वतंत्र एजन्सीमार्फत हे रस्ते स्वच्छ करता येते का याची पडताळणी करु नवीन स्विपी गमशीन चालविण् यचे स्वतंत्र प्रशिक्षीत ड्रायव्हर घेणे आवश्यक आहे. आहे त्या ड्रायव्हरकडून काम केलेस मशनरी खराब होऊ शकते. महापालिकेला ८ स्विपीग मशीन प्राप्त होत आहेत. सदरची कंपनी महापालिकेच्या चालकाला प्रशिक्षण देणार आहेत. तरीही देखभाल दुरुस्तीच्या ड्रायव्हरसह देखभालीचा प्रस्ताव कंपनीकडून मागणी केलेला आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.

Kolhapur News : वादळी वाऱ्यामुळे लग्न मंडप तुटला; अवकाळी पावसाने कोल्हापुरकरांची तारांबळ

स्थायी समिती सभेमध्ये विविध विषयांवर झाली चर्चा
सीएसआरच्या माध्यमातून नागरी सुविधा केंद्रात एचडीएफसी बँकेमार्फत मनुष्यबळ नियुक्ती करुन देणेव्या प्रस्तावावर चर्चा होऊन इतर बँकाकडूनाही तसा प्रस्ताव मागवून फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अमर समर्थ यांनी नाल्यातील गाळ काढल्यानंतर तो काठावर ठेवल्यानंतर तो उठाव केला जात नाही, गाळ उठाव करण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा भाड्याने घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. पावसाळा सुरू होण्यासाठी अवघे पंधरा दिवस उरले आहेत. हे काम दोन महिने अगोदर का केले नाही.

असा जाब हे नगरसेवकांनी प्रशासनाला विचारला. त्याला प्रज्ञा उत्तुरे यांनी समर्थन दिले. महापालिकेमार्फत मनुष्यबळाद्वारे व दोन पोकलॅन्ड मशिनमार्फत २० मार्च पासून नाले सफाई सुरु आहे. ४० कर्मचा-यांमार्फत कर्मचा-यांमार्फ लहान मोठे नाल्यांची स्वच्छता सुरु आहे. शहरातील मुख्य रस्त्याचे गटर्स, स्ट्रॉम वॉटर, पेव्हिंग ब्लॉक खराब झाले आहे. काही ठिकाणी गटर्स आहे परंतू पुढे पाणी जाण्यासाठी मार्ग नाही. त्यासाठी ज्या त्या विभागाने पाहिले पाहिजे आदी विसयांवर चर्चा झाली.

दुधाळी शूटिंग रेंज येथे रात्री गार्डन नेमावेत
महापालिका विभागीय कार्यालयामार्फत दुधाळी येथे सुरक्षेचे नियोजन करावे. दुधाळी शुटिंग रेंज येथे रेंजचे साहित्य आहे. याठिकाणी रात्रीचे बरेचसे अवैध धंदे सुरु असतात. त्यामुळे या ठिकाणी स्वतंत्र गार्ड नेमावा, अशी मागणी प्रतापसिंह जाधव यांनी केली. यावर गार्ड नेमण्याची व्यवस्था करू, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अतिक्रमण काढल्यानंतर पुन्हा परवानगी देतात का?
शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण काढले जाते. त्याठिकाणी परत लावण्यासाठी परवानगी दिली जाते का? असा सवाल अनुराधा खेडकर यांनी विचारला. यावर चारही विभागीय कार्यालयामार्फत स्वतंत्र अतिक्रमणची पथके करण्यात येत आहे. ही पथके सहाय्यक आयुक्तांच्या नियंत्रणाखाली त्या त्या विभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात कारवाई करतील.

Gokul Dudh Mahasangh: ‘गोकुळ’वर प्रशासक येणार! हायकोर्टाने मुदतवाढ नाकारल्याने विद्यमान संचालक मंडळाला मोठा धक्का

 

Web Title: Kolhapur news seal shops without business licenses demand to the standing committee against over selling

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 08:14 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.