Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News :सहकारी संस्थांतील कारभाऱ्यांना दणका; रिझर्व्ह बँकेच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका कोल्हापूर सर्किट बेंचने फेटाळली

सहकारी संस्थांमध्ये वर्षानुवर्ष संचालक म्हणून ठाण मांडून बसणाऱ्या लोकप्रतिनिधींना कोल्हापूर सर्किट बेंचने दणका दिला आहे.संचालक म्हणून ठाण मांडून बसणाऱ्या लोकप्रतिनिधींना कोल्हापूर सर्किट बेंचने दणका दिला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 14, 2025 | 06:27 PM
Kolhapur News :सहकारी संस्थांतील कारभाऱ्यांना दणका; रिझर्व्ह बँकेच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका कोल्हापूर सर्किट बेंचने फेटाळली
Follow Us
Close
Follow Us:
  • सहकारी संस्थांतील कारभाऱ्यांना दणका
  • रिझर्व्ह बँकेच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका
  • नेमकं प्रकरण काय ?
कोल्हापूर : सहकारी संस्थांमध्ये वर्षानुवर्ष संचालक म्हणून ठाण मांडून बसणाऱ्या लोकप्रतिनिधींना कोल्हापूर सर्किट बेंचने दणका दिला आहे.संचालक म्हणून ठाण मांडून बसणाऱ्या लोकप्रतिनिधींना कोल्हापूर सर्किट बेंचने दणका दिला आहे. रिझर्व्ह बँकेने 2021 मध्ये दिलेल्या आदेशाला आव्हान देणारी याचिका कोल्हापूर सर्किट बेंचने फेटाळून लावली आहे. बँक्स असोसिएशनने ही याचिका दाखल केली होती. 2021 साली रिझव्ह बँकेने आदेश जारी करत सलग दहा वर्ष संचालक पद भूषवलेल्या व्यक्ती अगर लोकप्रतिनिधींना पुन्हा संचालक पदावर येता येणार नसल्याचं सांगितलं होतं. रिझर्व बँकेच्या या आदेशाला बँक असोसिएशनने आव्हान दिल्यानंतर याबाबतची सुनावणी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये झाली.

सर्किट बेंचने रिझर्व्ह बँकेचा आदेश अंतिम असल्याचं सांगत बँक्स असोसिएशनने केलेली याचिका फेटाळून लावली. कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेल्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील महत्त्वाच्या सहकारी संस्थांमधील कारभारी संचालकांचे धाबे दणाणले आहेत. याबाबतची अंतिम सुनावणी 15 जानेवारी रोजी होणार आहे.दरम्यान, सर्किट बेंचने दिलेल्या आदेशाने जिल्ह्यातील संस्थाचा कारभार घरातून करणाऱ्या कारभाऱ्यांनाच चांगलाच हादरा बसला आहे.

जिल्हा बँकांमधील संचालकांना झटका

अनेक संस्थांवर आपलीच पकड असावी, यासाठी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच नेत्यांच्या घरात पदाची खिराफत गेली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारातील कारभारांना या निर्णयाने झटका बसला, तरी बैंकअप प्लॅन म्हणून घरातील मंडळींना पुढे करून सत्ता आपल्याच हातात ठेवण्यास कोणतीही कसर ठेवली जाणार नाही, यात शंका नाही, न्यायालयाच्या आदेशाने राज्यातील भ्रष्टाचाराचे कुरण ठरलेल्या जिल्हा बँकांमधील शेकडी संचालकांना दणका बसणार आहे.

कोल्हापुरी चपलांची जागतिक कीर्ती! प्राडा, लिडकॉम आणि लिडकार यांच्यात सामंजस्य करार

राजकीय नियंत्रणामुळे संस्था अडचणीत

गैर-कार्यकारी संचालकांसाठी आरबीआयने योग्यता तपासणी आणि बोर्ड नूतनीकरणावर भर दिला. ज्याने 10 वर्षांपेक्षा जास्त काळ पदावर असलेल्यांना अप्रत्यक्षपणे दणका बसला, राजकीय व्यक्तीच्या सहकारी बँकांवरील नियंत्रणामुळे फसवणूक, खराब कर्जवाटप आणि पीएमसी बैंकसारख्या पतन झाले, ज्यामुळे ठेवीदारांचा विश्वास कमी झाला होता. त्यामुळे आरबीआयने कठोर पावले उचलत नियमांची अंमलबजावणी केली होती.

मुदतीवर मर्यादा; दीर्घकाळ सत्ताधारी होण्यास रोखले

2021मध्ये रिझव्हं बैंक ऑफ इंडियाने खासगी क्षेत्रातील बँकांसाठी कॉपोरेट गव्हर्नन्ससंबंधी एप्रिल परिपत्रक जारी केले. यात संचालकांच्या मुदतीवर मर्यादा घालून दीर्घकाळ सत्ताधारी होण्यास रोखले गेले. प्रमोटर किंवा मोठे शेअरधारक हे एमडी, सीईओ किंवा संपूर्णवेळ संचालक म्हणून सामान्यत:12 वर्ष (असाधारण प्रकरणात 15 वर्षांपर्यंत वाढवता येईल) पदावर राहू शकतात. 2021 व्या नियमानी सहकारी बँकांच्या नियमांना एकसारखे केले, ज्यात खासदार-आमदारांसारख्या निवडलेल्या नेत्यांना एमडी, डब्ल्यूटीडी पदांवरून दूर ठेवले आणि कार्यकारी मुदत एकूण 15 वर्षांपर्यंत मर्यादित केली.

‘राज्यात 604 ‘आपला दवाखाना’ सुरू, उर्वरित 96 दवाखाने…’; आरोग्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण माहिती

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोल्हापूर सर्किट बेंचने नेमका कोणता निर्णय दिला?

    Ans: कोल्हापूर सर्किट बेंचने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2021 मध्ये दिलेला आदेश वैध व अंतिम असल्याचं स्पष्ट करत, बँक्स असोसिएशनने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे.

  • Que: आरबीआयचा 2021 चा आदेश काय आहे?

    Ans: सलग 10 वर्षे संचालक पदावर असलेली व्यक्ती किंवा लोकप्रतिनिधी पुन्हा संचालक म्हणून निवडले जाऊ शकत नाहीत, असा आदेश आरबीआयने दिला होता.

  • Que: न्यायालयाने याचिका का फेटाळली?

    Ans: आरबीआयला बँकिंग क्षेत्रातील कॉर्पोरेट गव्हर्नन्स सुधारण्याचा अधिकार आहे, आणि हा आदेश ठेवीदारांच्या हितासाठी असल्याचे नमूद करत न्यायालयाने याचिका फेटाळली.

Web Title: A blow to the managers of cooperative societies kolhapur circuit bench dismissed the petition challenging the reserve bank order

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 06:27 PM

Topics:  

  • kolhapur
  • Marathi News

संबंधित बातम्या

Satara News : तपोवन वृक्षतोडप्रकरणी उच्च न्यायालयात जाणार; सह्याद्री वाचवा मोहिमेतंर्गत पर्यावरण प्रेमींनी दिला इशारा
1

Satara News : तपोवन वृक्षतोडप्रकरणी उच्च न्यायालयात जाणार; सह्याद्री वाचवा मोहिमेतंर्गत पर्यावरण प्रेमींनी दिला इशारा

Kolhapur News : शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारी मंडळे बरखास्त; माजी खासदार राजू शेट्टी यांची टीका म्हणाले….
2

Kolhapur News : शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारी मंडळे बरखास्त; माजी खासदार राजू शेट्टी यांची टीका म्हणाले….

Ratnagiri : डॉ. ओमप्रकाश शेटये यांची दापोली उपजिल्हा रुग्णालयाला भेट
3

Ratnagiri : डॉ. ओमप्रकाश शेटये यांची दापोली उपजिल्हा रुग्णालयाला भेट

Alibaug News : अलिबागमध्ये अनधिकृत बांधकाम? माजी आमदार पंडित पाटील यांची प्रशासनावर टीका
4

Alibaug News : अलिबागमध्ये अनधिकृत बांधकाम? माजी आमदार पंडित पाटील यांची प्रशासनावर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.