Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! खासदार धनंजय महाडिकांविरुद्ध गुन्हा दाखल; ‘या’ वक्तव्यानं आणलं अडचणीत

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांच्या समर्थनार्थ प्रचारासाठी फुलेवाडी येथे झालेल्या जाहीर सभेत खासदार धनंजय महाडिक सहभागी झाले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 11, 2024 | 02:53 PM
मोठी बातमी! खासदार धनंजय महाडिकांविरुद्ध गुन्हा दाखल; 'या' वक्तव्यानं आणलं अडचणीत

मोठी बातमी! खासदार धनंजय महाडिकांविरुद्ध गुन्हा दाखल; 'या' वक्तव्यानं आणलं अडचणीत

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर: भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक  त्यांच्या वक्तव्यांमुळे अडचणीत आले आहेत. महाडिकांना केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे.  दोन दिवसांपूर्वी एका जाहीर सभेत बोलताना महाडिकांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला महाविकास आघाडीच्या रॅलीत दिसल्या तर त्यांचे फोटो काढा आणि त्यांची नावे मला पाठवा आपण त्यांना धडा शिकवू, असे विधान केले होते. त्यानंतर धनंजय महाडीक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

खासदार धनंजय महाडीक यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत निवडणूक आयोगाकडे खुलासा केला होता. मात्र निवडणूक आयोगाने त्यांचा खुलासा मान्य केला नाही. त्यानंतर आता खासदार धनंजय महाडीक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांचीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या सभेत महाडीक यांनी लाडकी बहिणीविरोधात वादग्रस्त विधान केल्याबद्दल महाविकास आघाडीतील नेत्यांनी त्यांच्याविरोधात आयोगाकडे तक्रार केली होती.

नेमकं काय म्हणाले होते धनंजय महाडिक?

“लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महीला महाविकास आघाडीच्या मेळाव्यात दिसल्याच त्याचा फोटो काढून व्हिडीओ बनवा, नंतर त्यांची नावे मला पाठवा, मग मी त्या महिलांना धडा शिकवेन,” असे वादग्रस्त वक्तव्य  धनंजय महाडिक यांनी केले होते. महाडिकांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीनेही त्यांना घेरण्याचा प्रयत्न करत त्यांच्यावर टीका केली. खासदार धनंजय महाडिक हे खुल्या व्यासपीठावरून महिलांना गुंडांप्रमाणे धमकावले जात आहे.  भाजपची खरी रणनीती, चारित्र्य आणि चेहरा याचाच हा पुरावा आहे. भाजप केवळ महिलांचा सन्मान करण्याचे नाटक करत आहे. महिलांना धडा शिकवणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता चोख प्रत्युत्तर देईल.  अशा शब्दांत काँग्रेसने धनंजय महाडिकांना प्रत्युत्तर दिले.

हेही वाचा:  लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना धमकी, नंतर घुमजाव; धनंजय महाडिक नेमकं काय म्हणाले?

विरोधकांनी घेरल्यानंतर महाडिकांंनी त्यांच्या या वक्तव्यावर स्पष्टीकरणही दिले. महाडिक म्हणाले, लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात  खूप लोकप्रिय आहे. 2 कोटी 30 लाख महिलांना त्याचा लाभ झाला आहे. माझे म्हणणे असे होते की जर काही महिला काँग्रेससोबत जात असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यांना लाभ मिळावा म्हणून त्यांची नावे आणि छायाचित्रे काढावीत अशी आमची इच्छा आहे. पण काँग्रेसने ते चुकीच्या पद्धतीने घेतले आणि त्याचा अपप्रचार करत आहे.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांच्या समर्थनार्थ प्रचारासाठी फुलेवाडी येथे झालेल्या जाहीर सभेत खासदार धनंजय महाडिक सहभागी झाले होते. यावेळी ते म्हणाले की, राज्यातील महायुतीच्या सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबविल्या आहेत. मात्र महाविकास आघाडीचे नेते या योजनांबाबत जनतेमध्ये गैरसमज पसरवत आहेत. या अफवांना सर्वसामान्य जनता विसरणार नाही.

हेही वाचा:  Dhananjay Mahdik News: धनंजय महाडिकांना ‘ते’ वक्तव्य महागात पडणार? निवडणूक आयोगाने धाडली नोटीस

खासदार महाडिक म्हणाले की, जाणाऱ्या आमदाराने गेल्या पाच वर्षांत कोणतेही ठोस काम केले नाही. काँग्रेस आमदाराने खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे बदलाची हीच वेळ आहे. त्यामुळे भाजप खासदार अमल महाडिक यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करून महायुतीचे सरकार स्थापन करा, असे आवाहनही यावेळी महाडिकांनी केले.

Web Title: A case file againsit mp dhananjay mahadik about controversial statement at kolhapur mahayuti rally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2024 | 02:52 PM

Topics:  

  • Dhananjay Mahadik
  • Election Comission
  • kolhapur news

संबंधित बातम्या

Kolhapur News : शिवरायांच्या विचारांनी भारावला उत्तराखंडचा छोरा ; थेट सायकलवरुन 315 किल्ल्यांना भेट देण्याचा संकल्प
1

Kolhapur News : शिवरायांच्या विचारांनी भारावला उत्तराखंडचा छोरा ; थेट सायकलवरुन 315 किल्ल्यांना भेट देण्याचा संकल्प

Kolhapur News : कडाक्याच्या उन्हाळ्य़ात दरवाढीचा चटका ; आवक घटल्याने लिंबू महागला
2

Kolhapur News : कडाक्याच्या उन्हाळ्य़ात दरवाढीचा चटका ; आवक घटल्याने लिंबू महागला

Sangali News : लिंगायत समाजाचं प्रशासनाला निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचा दिला इशारा
3

Sangali News : लिंगायत समाजाचं प्रशासनाला निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचा दिला इशारा

Kolhapur News : आरोग्य यंत्रणेचे निघाले धिंडवडे;आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात डॉक्टरच मद्यधुंद
4

Kolhapur News : आरोग्य यंत्रणेचे निघाले धिंडवडे;आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात डॉक्टरच मद्यधुंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.