Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हवामानातील बदल सर्वस्वी सूर्यावरच अवलंबून : डॉ. राजमल जैन कोठारी

हवामानातील कोणताही होणारा बदल हा सर्वस्वी सूर्यावरच अवलंबून असतो. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधील असणाऱ्या वातावरणातील विविध थरावर सूर्याचा परिणाम दिसून येतो.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 10, 2022 | 08:20 PM
हवामानातील बदल सर्वस्वी सूर्यावरच अवलंबून : डॉ. राजमल जैन कोठारी
Follow Us
Close
Follow Us:

शिरोली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : हवामानातील कोणताही होणारा बदल हा सर्वस्वी सूर्यावरच अवलंबून असतो. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधील असणाऱ्या वातावरणातील विविध थरावर सूर्याचा परिणाम दिसून येतो. वातावरणामध्ये अचानक होणाऱ्या या बदलांचे रूपांतर नैसर्गिक आपत्तीमध्ये होते यासोबतच मानवाने केलेले प्रदूषण, अतिक्रमण सुद्धा नैसर्गिक आपत्तीस कारणीभूत आहे. म्हणून नैसर्गिक आपत्ती टाळायची असेल तर आपणास सूर्याच्या हालचालींचा सखोल अभ्यास करून पर्यावरणाचा समतोल राखणे काळाची गरज आहे असे ठाम प्रतिपादन इस्रोचे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ डॉ. राजमल जैन कोठारी यांनी केले.

येथील भारती विद्यापीठाचे डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी विभाग व भौतिक शास्त्र विभाग यांच्यावतीने आयोजित केलेल्या व्याख्यानप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, मानवाने आपल्या स्वार्थासाठी बेसुमार वृक्षतोड, पशुहत्या केल्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. त्यामुळे भूकंप,दुष्काळ , त्सुनामी, महापूर अशा अनेक नैसर्गिक आपत्तींचा आपणाला सामना करावा लागत आहे.यातून आपली सुटका करायची असेल तर आपण निसर्गाचा समतोल राखला पाहिजे.

महाविद्यालयाचे प्राचार्य आणि शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.डी.जी.कणसे आपल्या संदेशात म्हणाले की, निसर्गाला वाचवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. ती आपण योग्य रितीने पार पाडली पाहिजे आणि निसर्गाचे संवर्धन केले पाहिजे.

या प्रसंगी कला व वाणिज्य विभाग प्रमुख टी. आर. सावंत , अंतर्गत गुणवत्ता हमी विभाग समन्वयक डॉ. ए.आर. सुपले, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. डी.पी.नाडे, प्रा. वाय. सी. धुळगंड,प्रा. एन. एन. नाटके तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.दादा नाडे यांनी केले व आभार डॉ. ए.आर सुपले यांनी मानले.

Web Title: Climate change is only depends upon sun says dr rajmal kothari nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2022 | 08:20 PM

Topics:  

  • kolhapur
  • Shiroli

संबंधित बातम्या

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! आधी डोळ्यात चटणी टाकली, नंतर कोयत्याने गळ्यावर सपासप वार; पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या
1

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! आधी डोळ्यात चटणी टाकली, नंतर कोयत्याने गळ्यावर सपासप वार; पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

“मराठ्यांचे भवन दिल्लीत व्हावे…; अखिल भारतीय मराठा महासंघाचा राज्यस्तरीय मेळाव्यात खासदार छत्रपती शाहू महाराजांचे प्रतिपादन
2

“मराठ्यांचे भवन दिल्लीत व्हावे…; अखिल भारतीय मराठा महासंघाचा राज्यस्तरीय मेळाव्यात खासदार छत्रपती शाहू महाराजांचे प्रतिपादन

माधुरी हत्तीण नांदणी मठात परतणार; ‘या’ तारखेपर्यंत संयुक्त आराखडा सादर करण्याचे आदेश
3

माधुरी हत्तीण नांदणी मठात परतणार; ‘या’ तारखेपर्यंत संयुक्त आराखडा सादर करण्याचे आदेश

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरात भिकाऱ्यांची दादागिरी; भाविकांना सहन करावा लागतोय त्रास
4

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरात भिकाऱ्यांची दादागिरी; भाविकांना सहन करावा लागतोय त्रास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.