
हातकणंगलेत असेही एक देवेंद्र; 'या' हेतूने एकही सोडली नाही निवडणूक
जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक ते शिक्षण विस्तार अधिकारी असा त्यांचा प्रवास. नोकरीच्या निमीत्ताने त्यांनी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आपली सेवा दिली. मात्र लोक प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असल्यानेच २०१० मध्ये सेवा निवृत्त झाल्यापासून आपण ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंतच्या निवडणूका लढवत असल्याचे देवेंद्र मोहिते अगदी अवर्जुन सांगतात.
२०१० साली नेज ग्राम पंचायतीची निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली त्यात काय पण आतापर्यंत लढवलेल्या एकाही निवडणूकीत त्यांना यश आले नाही. ग्रामपंचयत झाली की, जिल्हा परिषद, ती झाली की विधानसभा आणि मग लोकसभा आताही ते आळते जिल्हा परिषद मतदार संघ अनु जाती महिलेसाठी राखीव असल्याने आपल्या पत्नीला त्यांनी निवडणूक रिंगणात उतरवले आहे.
ना कार्यकर्त्यांचा गराडा, ना कसला गाजावाजा स्वतच यायचं अर्ज भरायचा आणि मग सायकलीने प्रचार करत मतदारांपर्यंत पोहचायच हाच त्यांचा दिनक्रम. आता थोडी तब्येत थकल्याने त्यांनी एसटी बसचा वापर मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी केला आहे .
इतक्या वर्षातील महत्वाची बाब म्हणजे उमेद्वारी अर्जामध्ये कोणत्याही त्रुटी राहत नाहीत. त्यामुळे आतापर्यंत मोहिते दाम्पत्यांनी लढवलेल्या ग्रामपंचायती पासून ते लोकसभेच्या निवडणूकीपर्यंत एकदाही त्यांचा उमेदद्वारी अर्ज अवैद्य ठरलेला नाही. आजची राजकीय परस्तीती पाहता राजकीय पक्ष सर्वसामान्यांना, निष्टावंताना डावलत आले आहेत. सर्वसामान्य नागरीकांनाही लोकप्रतिनीधी म्हणून काम करण्याची संधी मिळवी आणि म्हणूनच आपणही अपक्ष उमेद्वार म्हणून निवडणूक लढवत असल्याचे मोहीते सांगतात.
ट्रक चिन्हालाच पसंती
मोहीते हे २०१० पासून ग्रामपंचायती पासून ते लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणूका लढवतात. सर्वच निवडनुकीत त्यांनी ट्रक या निवडणूक चिन्हाला पसंती दिली आहे . त्यामुळे सर्वच निवडणूकांमध्ये मोहितेंचा ट्रक पहायला मिळतो. द्रक म्हटल की देवेंद्र मोहिते हे जनु समिकरणच झालं आहे .
आजच्या गोंधळलेल्या राजकीय परस्तीतीत सर्वसामान्य नागरीकांना लोकप्रतिनीधी म्हणून काम करण्याची संधी मिळत नाही. आमच्या सारख्या सर्व सामान्यांना ही प्रतिनीधीत्व करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी इतर राजकीय पक्षाच्या उमेद्वारांनी विचार करून आम्हाला संधी द्यावी, आपल्या हातूनही देशाच्या विकासात हातभार लागला पाहिजे, हीच इच्छा आहे. म्हणूनच कोणत्यातरी निवडणुकीत मी जिंकेन याच आशेने मी लढतो. – देवेंद्र नाना मोहीते , सामाजिक कार्यकर्ते