
Latur ZP Election 2026:
याप्रकरणी काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन अपहरणाबाबत लेखी निवेदन दिले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे अर्ज मागे घेण्यास केवळ दोन दिवस शिल्लक असताना ही घटना घडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विविध तर्कवितर्क लावले जात होते. अशातच एक महत्त्वाची अपडेट मोर आली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी त्या अचानक परतल्या. धक्कादायक बाब म्हणजे २० गाड्यांच्या ताफ्यांसह पोलीस बंदोबस्तात दाखल होत त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे काँग्रेसच्या वर्तुळातच एकच खळबळ उडाली आहे.
Pune Crime: मन सुन्न करणारी घटना! वाघोलीत आईकडून ११ वर्षीय मुलाची हत्या; मुलीवरही जीवघेणा हल्ला
अंजना चौधरी यांनी माघार घेतल्यानंतर त्या प्रवर्गातून भाजप भाजपचे पर्यायी दोन उमेदवार शिल्लक राहिले आहेत. पर्यायी उमेदवारही सध्या गायब असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार की लढत होणार, हे दुपारनंतर स्पष्ट होईल. अंजना चौधरी या अनुसूचित जमातील महिला गटासाठी राखीव जागेसाठी अर्ज भरला होता. पण त्यांचे अपहरण झाल्याची तक्रार जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. या घटनेमागे काही राजकारण आहे की अन्य काही कारण याचा पोलिस तपास घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी शनिवारी (२४ जानेवारी) सायंकाळी ५ वाजता अंजना चौधरी अंजना चौधरी उदगीर येथील बिदर रोडवर एका मैत्रिणीच्या घरी हळदीकुंकवाच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. कार्यक्रमानंतर त्या काँग्रेसचे स्थानिक नेते रणजीत कोकणे यांच्यासोबत प्रचारासाठी जाणार होत्या. कोकणे त्यांना घेण्यासाठी तेथे पोहोचलेही होते.
मात्र, हळदीकुंकवाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर काही वेळासाठी बाहेर गेलेले कोकणे जेव्हा परतले, तेव्हा अंजना चौधरी तेथे नव्हत्या. उपस्थित नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, काही अज्ञात गुंडांनी त्यांना जबरदस्तीने एका वाहनातून पळवून नेले. या घटनेनंतर कोकणे, पक्षाचे कार्यकर्ते आणि कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, परंतु त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.
BMC Election 2026: मुंबई महापौरपदावरून महायुतीत धुसफूस वाढली; एकनाथ शिंदे पुन्हा ‘दरे’ मुक्कामी
अंजना चौधरी यांच्या निवासस्थानी चौकशी करता त्यांचे पतीही त्यावेळी घरी नसल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांचेही अपहरण झाल्याची शंका वाढली. यासंदर्भात काँग्रेस नेत्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. लातूर जिल्ह्यात अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी हा एकमेव राखीव विधानसभा मतदारसंघ असून, जातपडताळणी पूर्ण झालेले उमेदवार मिळवणे सर्वच पक्षांसाठी आव्हानात्मक असते. अशा स्थितीत अधिकृत उमेदवाराचे अपहरण होणे हे लोकशाहीसाठी घातक असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणी काँग्रेस नेते अभय साळुंके व ॲड. किरण जाधव यांनी पोलीस अधीक्षक, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे निवेदन देऊन अंजना चौधरी यांचा तात्काळ शोध घेण्याची मागणी केली होती.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नेमके काय होणार, याबाबत मोठी उत्सुकता होती. मात्र, सकाळी साडेअकराच्या सुमारास २० ते २५ गाड्यांच्या ताफ्यासह येत अंजना चौधरी यांनी स्वतःचा अर्ज मागे घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे आता त्या ठिकाणी भाजपकडून महानंदा तुमकुटे आणि पर्यायी उमेदवार मीरा तुबाकले हे रिंगणात उरले आहेत.
या सगळ्या घडामोडींनंतर अंजना चौधरी यांनी अचानक माघार घेतल्याने याठिकाणी बिनविरोध निवडणूक होम्याची शक्यता वर्तवली जात आहे. लक्षणीय बाब म्हणजे या निवडणुकीच्या रिंगणातील आणखी एक उमेदवार गायब असल्याची चर्चा आहे. ज्यावेळी अंजना चौधरी यांनी अर्ज मागे घेतला त्यावेळी गावातील काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते त्याठिकाणी उपस्थित होते. पण चौधरी मोठा ताफा घेऊन आल्या आणि अर्ज मागे घेतला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही नाराजी आणि संतापाची वातावरण होते.