Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्हापुरात पाच लाखांच्या साड्या जप्त; ZP निवडणुकीत महिला मतदारांना आमिष?

कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणा सतर्क झाली असून, करवीर तालुक्यातील वाशी गावात भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 27, 2026 | 01:44 PM
कोल्हापुरात पाच लाखांच्या साड्या जप्त; ZP निवडणुकीत महिला मतदारांना आमिष?

कोल्हापुरात पाच लाखांच्या साड्या जप्त; ZP निवडणुकीत महिला मतदारांना आमिष?

Follow Us
Close
Follow Us:
  • कोल्हापुरात पाच लाखांच्या साड्या जप्त
  • मतदारांना वाटपासाठी आणल्याचा संशय
  • ZP निवडणुकीत महिला मतदारांना आमिष?
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणा सतर्क झाली असून, करवीर तालुक्यातील वाशी गावात भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. जावळाच्या कार्यक्रमाच्या नावाखाली आणण्यात आलेल्या तब्बल पाच लाख रुपयांच्या साड्या पथकाने जप्त केल्या आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, वाशी येथे संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने तात्काळ धाड टाकली. पथकाची गाडी येत असल्याचे लक्षात येताच साड्यांनी भरलेला टेम्पो चालक पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र सतर्क पथकाने पाठलाग करून वाहनासह चालकाला ताब्यात घेतले.

टेम्पोची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणावर साड्यांचा साठा आढळून आला. प्राथमिक अंदाजानुसार या साड्यांची किंमत सुमारे पाच लाख रुपये आहे. या साड्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना वाटप करण्यासाठी आणल्या असाव्यात, असा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

ही कारवाई भरारी पथकाचे प्रमुख प्रवीण कोडोलीकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली असून, पंचनामा करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, साड्या कुठून आणल्या, कोणासाठी होत्या आणि यामागे कोणाचा संबंध आहे, याचा तपास सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पुढील काळात निवडणूक आयोगाच्या पथकांकडून आणखी धाडी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महापौर पदासाठी टोकाची स्पर्धा

महापौर पदासाठी आता टोकाची स्पर्धा पाहायला मिळत असून, महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर कोल्हापूर शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. महापौरपदावर नेमकी कोणाची वर्णी लागणार, याबाबत कोल्हापूरवासीयांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यातच महापौर पदावर भाजप आणि शिंदेसेना या दोन्ही पक्षांकडून जोरदार दावा करण्यात आल्याने ही लढत अधिकच रंगतदार बनली आहे. कोल्हापूर महापालिकेतील सत्तासंघर्ष आता केवळ स्थानिक राजकारणापुरता मर्यादित न राहता, थेट राज्यस्तरीय समीकरणांशी जोडला गेला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाचा निर्णय भाजप की शिंदेसेना यांच्यापैकी कोणाच्या वाट्याला जाणार, यावरच कोल्हापूरच्या महापौर पदाचा तिढा सुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांचे लक्षही मुंबईकडे लागले आहे.

Web Title: The team has taken a major action in kolhapur and seized sarees worth five lakhs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 01:44 PM

Topics:  

  • crime news
  • kolhapur
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

राजकीय घडामोडींना वेग, महापौर पदासाठी टोकाची स्पर्धा; कोल्हापूरकरांचे लक्ष मुंबईकडे
1

राजकीय घडामोडींना वेग, महापौर पदासाठी टोकाची स्पर्धा; कोल्हापूरकरांचे लक्ष मुंबईकडे

ऑनलाईन गेमिंगचे व्यसन बेतले जीवावर; आर्थिक अडचण आल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
2

ऑनलाईन गेमिंगचे व्यसन बेतले जीवावर; आर्थिक अडचण आल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली संगणक अभियंत्याची फसवणूक; तब्बल 43 लाखांना घातला गंडा
3

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली संगणक अभियंत्याची फसवणूक; तब्बल 43 लाखांना घातला गंडा

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; उद्योजक दाम्पत्याचा मृत्यू, कारमधील एअरबॅग उघडूनही…
4

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; उद्योजक दाम्पत्याचा मृत्यू, कारमधील एअरबॅग उघडूनही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.