Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Local Body Election: आचारसंहिता जाहीर होताच इच्छुकांची धावपळ सुरू; कोल्हापर, इचलकरंजी महापालिका निवडणुकीला येणार रंगत

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत ४ लाख ९४ हजार ७११ मतदारांना मतदान करण्याची संधी मिळणार आहे. त्यामध्ये महिलांची सर्वाधिक संख्या म्हणजे लाख तब्बल ४१ हजार ५०१ मतदार वाढले आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 16, 2025 | 10:34 AM
Local Body Election: आचारसंहिता जाहीर होताच इच्छुकांची धावपळ सुरू; कोल्हापर, इचलकरंजी महापालिका निवडणुकीला येणार रंगत
Follow Us
Close
Follow Us:
  • आचारसंहिता सोमवारी जाहीर होताच राजकीय वातावरण तापले
  • महाविकास आघाडी फारशी आक्रमक दिसत नसली, तरी प्रत्यक्ष निवडणूक रणांगणात उतरल्यावर चित्र बदलू शकते.
  • कोल्हापूर आणि इचलकरंजी दोन्ही महानगरपालिकांवर भाजपाचा महापौर असावा, असे चित्र महायुतीकडून उभे केले जात आहे
Kolhapur Municipal Election 2025:   कोल्हापूर, कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता सोमवारी जाहीर होताच राजकीय वातावरण तापले आहे. मागील काही दिवसांपासून इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रभागांमध्ये संपर्क दौरे, सामाजिक उपक्रम, विकासकामांचे फलक, बॅनर आदी माध्यमातून जोरदार तयारी सुरू केली होती. मात्र अचानक निवडणूक जाहीर झाल्याने आणि आचारसंहिता लागू झाल्याने या सर्व हालचालींना ब्रेक लागला असून, इच्छुकांची चांगलीच धांदल उडाल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, दोन्ही महानगरपालिकेत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) अशी थेट लढत होणार असली तरी स्थानिक आघाड्‌याही तयारीला लागल्या आहेत. उमेदवारी अर्ज दाखल होईपर्यंत अनेक राजकीय घडामोडी घडू शकतात.

इचलकरंजी महापालिकेच्या बाबतीत सध्या तरी महाविकास आघाडी फारशी आक्रमक दिसत नसली, तरी प्रत्यक्ष निवडणूक रणांगणात उतरल्यावर चित्र बदलू शकते. इचलकरंजीत स्थानिक नेतृत्व आणि विकासकामांवर आधारित राजकारण नेहमीच निर्णायक ठरले आहे. भाजपाचे माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे आणि त्यांना साथ देणारे सुरेश हळवणकर यांचे एकत्रित नेतृत्व पाहता ही निवडणूक त्यांच्यासाठी तुलनेने सोपी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरीही निवडणुकीच्या शेवटच्या टण्यात होणाऱ्या घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत. (Maharashtra Local body Ekection)

इस्रायली धमाक्यांनंतर निसर्गाचा कहर! गाझात मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती

कोल्हापूर दृष्टिक्षेपात

कोल्हापूर जिल्ह्यात नेहमीच पक्षापेक्षा स्थानिक नेत्यांचे वजन अधिक राहिले आहे. प्रभागनिहाय प्रभाव, जातीय-सामाजिक समीकरणे आणि स्थानिक प्रश्न यांवर निवडणूक निकाल ठरतात. आतापर्यंतही याच पद्धतीने महापालिका निवडणुका झाल्या आहेत.

यंदा मात्र केंद्र आणि राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपा प्रणीत युतीची एकहाती सत्ता असल्याने या निवडणुकीला वेगळीच रंगत येणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेत भाजप राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह विविध पक्षांचे नेते सक्रिय झाले आहेत.

या चौघांची स्वतंत्र राजकीय ताकद आणि कार्यकत्यांचे जाळे असल्याने कोल्हापूरची लढत अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. यातच काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून यंत्रणा अधिक सक्रीय केली आहे.

महायुती विरुद्ध महाविकास आघाडी या थेट लढतीबरोबरच स्थानिक आघाड्‌या, बंडखोरी आणि अपक्ष उमेदवारही निकालावर प्रभाव टाकू शकतात.

मेक्सिकोत भीषण दुर्घटना! इमरजन्सी लँडिंगदरम्यान इमारतीवर कोसळले विमान ; ७ जणांचा मृत्यू , VIDEO

कोल्हापूर, इचलकरंजी लक्षवेधी ठरणार

सध्या तरी कोल्हापूर (Kolhapur) आणि इचलकरंजी दोन्ही महानगरपालिकांवर भाजपाचा महापौर असावा, असे चित्र महायुतीकडून उभे केले जात आहे. त्यादृष्टीने संघटनात्मक तयारी, प्रभागनिहाय गणिते आणि संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीही योग्य रणनीती आखून मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. एकूणच या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्याबरोबरच स्थानिक आघाड्या, नेत्यांची प्रतिष्ठा आणि प्रभागातील स्थानिक प्रश्न हे सर्व घटक निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका निवडणूक जिल्ह्याच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाची आणि लक्षवेधी ठरणार, यात शंका नाही.

कोल्हापूर

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत ४ लाख ९४ हजार ७११ मतदारांना मतदान करण्याची संधी मिळणार आहे. त्यामध्ये महिलांची सर्वाधिक संख्या म्हणजे लाख तब्बल ४१ हजार ५०१ मतदार वाढले आहेत. २ लाख ४९ हजार ९४० तर पुरुष मतदारांची संख्या तर २ लाख ४४ हजार ७३४ इतकी आहे. ३७ मतदार है तृतीयपंथी आहेत.

इचलकरंजी

इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत २, लाख ४९ हजार, १२९ मतदारांना मतदान करण्याची संधी मिळणार आहे त्यामध्ये महिलांची संख्या ৭लाख २३ हजार २८७ तर १ लाख २५ हजार ७८७पुरुष मतदार असणार आहे ५५ तृतीयपंथी व इतर मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

 

Web Title: Kolhapur municipal corporation election 2025 ichalkaranji municipal election 2025 latest news update voter statistics maharashtra women voters outnumber men over 7 lakh electors eligible

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2025 | 10:34 AM

Topics:  

  • Kolhapur Politics
  • Local Body Election 2025

संबंधित बातम्या

महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार; काँग्रेसची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक
1

महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार; काँग्रेसची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक

उमेदवारांनो लक्ष द्या ! उमेदवारी अर्जाबाबत महत्त्वाची माहिती आली समोर; आता अर्ज भरताना…
2

उमेदवारांनो लक्ष द्या ! उमेदवारी अर्जाबाबत महत्त्वाची माहिती आली समोर; आता अर्ज भरताना…

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ऑफलाइन नामांकनांना परवानगी; निवडणूक आयोगाचा निर्णय
3

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ऑफलाइन नामांकनांना परवानगी; निवडणूक आयोगाचा निर्णय

Baramati News: बारामती येथील ‘त्या’ उमेदवारांना उच्च न्यायालयाचा दणका; अर्ज स्वीकारण्याचा निर्णय ठरविला रद्द
4

Baramati News: बारामती येथील ‘त्या’ उमेदवारांना उच्च न्यायालयाचा दणका; अर्ज स्वीकारण्याचा निर्णय ठरविला रद्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.