Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : स्थानिक आघाड्यांमुळे गुंतागुंत; कोल्हापूर जिल्ह्यात नगरपालिकेसाठी सत्ताधारी-विरोधकांची जय्यत तयारी

जिल्ह्यातील नऊ नगरपालिका आणि पाच नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वच ठिकाणी राजकीय घडामोडी वेगाने बदलू लागल्या आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 11, 2025 | 07:15 PM
Kolhapur News : स्थानिक आघाड्यांमुळे गुंतागुंत;  कोल्हापूर जिल्ह्यात नगरपालिकेसाठी सत्ताधारी-विरोधकांची जय्यत तयारी
Follow Us
Close
Follow Us:
  • स्थानिक आघाड्यांमुळे गुंतागुंत
  • कोल्हापूर जिल्ह्यात नगरपालिकेसाठी सत्ताधारी-विरोधकांची जय्यत तयारी
  • स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत चुरस

कोल्हापूर/ दीपक घाटगे : कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ नगरपालिका आणि पाच नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वच ठिकाणी राजकीय घडामोडी वेगाने बदलू लागल्या आहेत. सत्ताधारी, विरोधक, आणि स्थानिक गटांमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रत्येक नगरपरिषदेचे चित्र वेगळे असून स्थानिक आघाड्यांमुळे गुंतागुंतीचे चित्र दिसत आहे.कुरुंदवाड नगरपरिषदेवर गेल्या कार्यकाळात राष्ट्रवादीचा प्रभाव राहिला असला तरी शिंदे गटाने गेल्या दोन वर्षांत संघटनशक्ती वाढवली आहे. भाजपा आणि शिंदे गट एकत्र लढल्यास राष्ट्रवादीला मोठं आव्हान निर्माण होईल. या ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी लढतीची शक्यता आहे.मलकापूरमध्ये ठिकाणी जनसुराज्य शक्ती पक्ष, भाजपा, प्रभावळे, भोसले आघाडी, शिवसेना ठाकरे गट यांच्यात लढत होणार आहे. पन्हाळ्याचा पारंपरिक गड राखण्याची लढाई या ठिकाणी सुरू आहे. भाजप, जनसुराज्यशक्ती पक्ष मोकाशी गट, भोसले गट, गवंडी, सोरटे, कांबळे गट, अशा लढतीची शक्यता आहे.

KDMC News : केडीएमसी निवडणूकीसाठी प्रभागांचे आरक्षण जाहिर! पण अंतर्गत सीमा रेषा स्पष्ट नसल्याने इच्छुकांमध्ये गोंधळ

मलकापूरमध्ये ठिकाणी जनसुराज्य शक्ती पक्ष, भाजपा, प्रभावळे, भोसले आघाडी, शिवसेना ठाकरे गट यांच्यात लढत होणार आहे. पन्हाळ्याचा पारंपरिक गड राखण्याची लढाई या ठिकाणी सुरू आहे. भाजप, जनसुराज्यशक्ती पक्ष मोकाशी गट, भोसले गट, गवंडी, सोरटे, कांबळे गट, अशा लढतीची शक्यता आहे. गडहिंग्लजमध्ये जनता दल, राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात लढत होणार आहे. गडहिंग्लजमध्ये विनय कोरे यांच्या गटाची पकड मजबूत असून भाजप आणि राष्ट्रवादी यांचे स्थानिक नेते याठिकाणी आपापले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहेत.शिरोळमध्ये स्थानिक नेत्यांच्या प्रभावामुळे तिरंगी लढत अपेक्षित आहे. परंतु महायुती विरोधी महाविकास आघाडी लढतीची शक्यता आहे. हातकणंगलेत महाविकास आघाडी विरोधी शिवसेना शिंदे गट, भाजपा, शिवसेना ठाकरे गट यांच्यात लढतीची शक्यता आहे. हुपरीत श्री अंबाबाई विकास आघाडी, भाजपा, महाविकास आघाडी यांच्यात लढतीची शक्यता आहे. आजरा आणि चंदगड नगरपंचायतींत काँग्रेसचा प्रभाव दिसतोय. परंतु भाजपनो नव्या उमेदवारांसह प्रवेश करून या समीकरणात बदल घडविण्याची रणनीती आखली आहे.

या सर्व ठिकाणी उमेदवारी अर्ज, बंडखोरी, आणि स्थानिक आघाड्या यामुळे वातावरण रंगतदार होण्याची शक्यता आहे. जिल्ह्याच्या प्रत्येक कोपऱ्यातील मतदार आता ‘विकास की पक्षनिष्ठा? या द्वंद्वात आहेत. येत्या काही दिवसांत नेत्यांची प्रचारसभा, भेटीगाठी आणि विकासाच्या घोषणांनी कोल्हापूर जिल्हा निवडणुकीच्या रंगात नक्कीच न्हाऊन निघणार आहे.

Badlapur : अखेर भाकरी फिरवलीच; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘या’ बड्या नेत्याचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

पेठ वडगावमध्ये नव्या चेहऱ्यांचा शोध

पेठ वडगावमध्ये स्थानिक आघाड्यांच्यात रंगत होणार आहे. पारंपारिक स्वर्गीय विजयसिंह यादव यांच्या कन्या माजी नगराध्यक्षा विद्या पोळ यांची यादव आघाडी व युवकक्रांतीचे संस्थापक स्वर्गीय शिवाजीराव सालपे यांच्या पत्नी प्रविता सालपे यांची युवक क्रांती आघाडी यांच्यात लढत होणार आहे. पेठ वडगावमध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील गटाला लोकसमर्थन वाढत असून, पारंपरिक राजकारणाला पर्याय म्हणून नव्या चेहऱ्यांची चाचपणी सुरू आहे.

कागलमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता

कागलमध्ये समरजितसिंह घाटगे विरोधी मंत्री हसन मुश्रीफ गट यांच्यात लढतीची शक्यता आहे. हसन मुश्रीफ यांचा प्रभाव कायम आहे. तथापि, भाजप आणि शिंदे गट एकत्र आल्यास समीकरण बदलू शकते. मुरगूड स्थानिक आघाड्यांच्या गटातटात ही निवडणूक होणार आहे. स्थानिक पातळीवरील गटबाजीमुळे तिरंगी लढत अपेक्षित आहे.

Web Title: Kolhapur news complications due to local alliances ruling party opposition alliance preparing for municipal elections in kolhapur district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 07:13 PM

Topics:  

  • kolhapur
  • maharashtra poliotics

संबंधित बातम्या

KDMC News : केडीएमसी निवडणूकीसाठी प्रभागांचे आरक्षण जाहिर! पण अंतर्गत सीमा रेषा स्पष्ट नसल्याने इच्छुकांमध्ये गोंधळ
1

KDMC News : केडीएमसी निवडणूकीसाठी प्रभागांचे आरक्षण जाहिर! पण अंतर्गत सीमा रेषा स्पष्ट नसल्याने इच्छुकांमध्ये गोंधळ

Kolhapur : आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाचं महत्वपूर्ण पाऊल; इचलकरंजीमध्ये ईएसआय मल्टिस्पेशालिटी रुग्णालय
2

Kolhapur : आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाचं महत्वपूर्ण पाऊल; इचलकरंजीमध्ये ईएसआय मल्टिस्पेशालिटी रुग्णालय

Nandurbar : नंदुरबारात शिवसैनिकांचा उत्साह, निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले
3

Nandurbar : नंदुरबारात शिवसैनिकांचा उत्साह, निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले

Kolhapur News : 4 हजार दुबार मतदार उघडकीस, 13 नगरपालिका हद्दीत गंभीर प्रकार; जिल्हा प्रशासनासमोर मोठे आव्हान
4

Kolhapur News : 4 हजार दुबार मतदार उघडकीस, 13 नगरपालिका हद्दीत गंभीर प्रकार; जिल्हा प्रशासनासमोर मोठे आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.