Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या मुलाचा दारुण पराभव; पाडळी खुर्दमधून राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी

कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे चिरंजीव सचिन पाटील यांना पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातून दारूण पराभवाला सामोरे जावं लागलं आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 09, 2026 | 03:56 PM
गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या मुलाचा दारुण पराभव; पाडळी खुर्दमधून राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी

गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या मुलाचा दारुण पराभव; पाडळी खुर्दमधून राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी

Follow Us
Follow Us:
  • विश्वास पाटील यांच्या मुलाचा दारुण पराभव
  • ऐन निवडणुकीत शिंदे गटात केला होता प्रवेश
  • पाडळी खुर्दमधून राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे चिरंजीव सचिन पाटील यांना पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातून दारूण पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. विशेष म्हणजे विश्वास आबाजी पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला रामराम करत ऐन निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे आमदार सतेज पाटील यांना सुद्धा झटका बसला होता. मात्र, आता त्यांच्या पक्षांतरानंतर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळवता आलेलं नाही. त्यामुळे त्यांनी केलेलं पक्षांतर हे रुचलेलं नाही का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र सूर्यवंशी यांनी सचिन पाटील यांचा पराभव केला.

 

गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या मुलीने विजय मिळवला. अमृता डोंगळे यांनी कसबा तारळे मतदार संघातून विजय मिळवला आहे. त्यामुळे एकाच्या मुलाचा पराभव आणि एकाच्या मुलीच्या विजयाचा आनंद अशी स्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अनेक धक्कादायक निकालांची सुद्धा नोंद झाली आहे. कागल तालुक्यामध्ये संजय मंडलिक गटाचे पानिपत झालं आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे समरजितसिंह घाटगे यांच्या आघाडीने सर्वच्या सर्व जागा पटकावल्या आहेत. करवीर तालुक्यात लक्षवेधी असलेल्या पाचगाव जिल्हा परिषद मतदार संघामध्ये काँग्रेसच्या संग्राम पाटील यांनी विजय मिळवला. उचगाव मतदारसंघांमध्ये भाजपच्या नामदेव वाईंगडे यांनी विजय मिळवला. गोकुळ शिरगावमधून काँग्रेसच्या सूदर्शन खोत यांनी विजय मिळवला. दुसरीकडे भर निवडणुकीत हसन मुश्रीफ यांना झटका देत राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता. मात्र शीतल फराकटे यांना सुद्धा पराभवाचा धक्का बसला आहे. त्यांचा राष्ट्रवादीच्या शोभाताई फराकटे यांनी पराभव केला आहे.

हे सुद्धा वाचा : वाळव्यात जयंत पाटलांनी केला विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम; भाजप अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का

भाजप नेते सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबाचा पराभव

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांनी अनेक राजकीय नेत्यांची झोप उडवली आहे. परभणी जिल्ह्यातून एक धक्कादायक निकाल समोर आला आहे. परभणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदारांनी प्रमुख भाजप नेते आणि माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबाला पूर्णपणे नाकारल्याचे चित्र आहे. परभणी जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व असलेल्या वरपुडकर कुटुंबासाठी ही निवडणूक एका मोठ्या राजकीय झटकाच मानली जात आहे. याचे कारण म्हणजे, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वरपुडकर यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांपैकी चार जणांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Web Title: Former gokul president vishwas patils son has been defeated in the zilla parishad elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • Election Result
  • kolhapur
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

Kolhapur Crime: फोन लागत नव्हता, रूम उघडताच धक्का; BCA विद्यार्थिनीची हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या
1

Kolhapur Crime: फोन लागत नव्हता, रूम उघडताच धक्का; BCA विद्यार्थिनीची हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

Kolhapur Crime: ऊसाच्या शेतात विधवा महिलेचा विवस्त्रावस्थेत सापडला मृतदेह; काय घडलं नेमकं?
2

Kolhapur Crime: ऊसाच्या शेतात विधवा महिलेचा विवस्त्रावस्थेत सापडला मृतदेह; काय घडलं नेमकं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.