कल्याण : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. याचपार्श्वभूमीवर आता कल्याण डोंबिवली मनपाने देखील निवडणूकीसाठी प्रभागांचे आरक्षण जाहिर केले आहे. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूकीसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत जाहिर करण्यात आली आहे. मात्र प्रभागातील अ, ब, क आणि ड नुसार करण्यात त्याला ना देण्यात आलेले नाही. त्याच्या अंतर्गत सिमा रेषा निश्चित नसल्याने इच्छूकांमध्ये संभ्रमाची स्थिती कायम आहे.
महापालिकेची निवडणूक प्रथमच बहुसदस्यीय पद्धतीने होत आहे. त्यानुसार 122जागांकरीता ३१ पॅनलमध्ये अ, ब, क आणि ड नुसार आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी शिंदे सेनेच्या माजी महापौर वैजयंती घोलप यांनी सांगितले की, मी पॅनल क्रमांक सहामधून इच्छूक आहे. या पॅनलमध्ये चिकनघर गावठाण, रामबाग खडक, म्हसोबा मैदान आणि फ्ला’वर व्ह’ली असे चार प्रभागाचे मिळून एक पॅनल आहे. या प्रभाात अ नागरीकांचा मागास प्रवर्ग, ब आणि क सर्व साधारण महिला आणि ड हा सर्वसाधारण प्रवर्गाकरीता आरक्षित झाला आहे. मात्र अ, ब, क आणि ड याला प्रभागाचे नाव दिलेले नाही. याचा फायदा ज्यांचे पक्षात खूप वजन आहे. जे गडगंड श्रीमंत आहे त्यांना या आरक्षण सोडतीचा फायदा होणार आहे. ही मंडळी त्यांच्या घरातील दोन व्यक्तिंना उमेदवारी मागतील. त्यामुळे खरा कार्यकर्ता उमेदवारी मिळण्यापासून वंचितच राहणार आहे.
भाजपचे माजी नगरसेवक मंदार हळबे यांनी सांगितले की, महापालिकेने जाहिर केलेले प्रभागाचे आरक्षण हे कोणाच्या फायद्याचे आणि कोणाला नुकसानदायी हे तिकीट वाटपानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यावर आत्ताच भाष्य करणे योग्य ठरणार नाही.प्रभाग आरक्षणावर हरकती घेण्याची मुदत 17ते 24 नोव्हेंबरपर्यंत आहे. ज्या काही हरकती असलीत त्या घेऊ शकता. हरकती पश्चात निवडणूक आयोगाला अंतिम मान्यतेसाठी प्रभाग आरक्षणाचे प्रारुप पाठविले जाईल. आयोगाच्या अंतिम मान्यतेनंतर 2 डिसेंबर रोजी प्रभाग आरक्षणाचे अंतिम प्रारुप प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यानंतर पुढील निवडणूकीची प्रक्रिया पार पाडली जाईल अशी माहिती केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळीदिली आहे.






