बदलापूर :आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपने भाकरी फिरवली आहे. रविवारी शिवसेनेतून भाजपामध्ये महेश जाधव आणि प्रतिभा जाधव या दाम्पत्याने प्रवेश केला. यांच्या पक्षप्रवेशाला 24 तास होत नाही तोच प्रतिभा जाधव यांची बदलापूर पूर्व महिला शहर अध्यक्ष पदी महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांच्या हस्ते निवड करण्यात आली.आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्षपदासाठी असलेल्या दिग्गजांना टाळून पक्षाने प्रतिभा जाधव यांची नियुक्ती करून समन्वयाचा मार्ग स्वीकारला आहे. नवीन शहराध्यक्षांना भाजपची सत्ता आणण्याचे मोठे आव्हान असून ही जबाबदारी त्या यशस्वीपणे पार पडतील असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.
पक्षाने अध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. त्यामुळे संघटनेत सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी तसेच भाजपचा नगराध्यक्षा आणण्यासाठी प्रयत्न करू.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपने भाकरी फिरवली आहे. रविवारी सेनेतून भाजपा मध्ये महेश जाधव आणि प्रतिभा जाधव यांनी सपत्नीक प्रवेश करून 24तास होत नाही तोच प्रतिभा जाधव यांची बदलापूर पूर्व महिला शहर अध्यक्ष पदी महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांच्या हस्ते निवड करण्यात आली.

आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्षपदासाठी असलेल्या दिग्गजांना टाळून पक्षाने प्रतिभा जाधव यांची नियुक्ती करून समन्वयाचा मार्ग स्वीकारला आहे. नवीन शहराध्यक्षांना भाजपची सत्ता आणण्याचे मोठे आव्हान असून हि जबाबदारी त्या यशस्वीपणे पार पडतील असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे. पक्षाने अध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. त्यामुळे संघटनेत सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी तसेच भाजपचा नगराध्यक्ष आणण्यासाठी प्रयत्न करू, असं प्रतिभा जाधव यांनी सांगितलं आहे.






