
ग्राहकांना प्लास्टिक पिशव्या देण्याऐवजी देण्याची सवय लावणे ही काळाची गरज आहे. प्लास्टिकमुक्त शहर ही केवळ घोषणा नसून ती लोकसहभागातूनच यशस्वी होऊ शकते.
– मनीषा डांगे, नगराध्यक्षा
२५ हजार रुपयांपर्यंत दंड
यावेळी प्रशासकीय अधिकारी श्रद्धा वळवडे यांनी प्लास्टिकमुक्तीबाबतच्या कायदेशीर तरतुदींची माहिती देताना सांगितले की, कोणत्याही दुकानात प्लास्टिक पिशव्या आढळल्यास पहिल्यांदा ५ हजार रुपयापर्यंत दंड, तर पुन्हा प्लास्टिक आढळल्यास २५ हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी दुकानदारांनी स्वेच्छेने प्लास्टिक विक्री बंद करावी, असे सांगितले.
प्लॅस्टिकच्या अतिवापराला आळा घालणं हे सर्वात महत्वाचं असून त्यादृष्टीकोनातून पावलं उचलली जात आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास होण्यात सर्वात मोठा वाटा हा प्लॅस्टिकचा आहे. त्यामुळे काटेकोपणे प्लॅस्टिकवर बंदी आणलीच पाहिजे.