Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“दम नव्हता तर उभं रहायचं कशाला, मी पण दाखवली असती…, मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर सतेज पाटील चांगलेच भडकले

राजेश लाटकर अजूनही कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढवण्यावर ठाम होते. आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे लाटकर अज्ञातस्थळी पोहोचल्याने भूया उंचावल्या गेल्या होत्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 04, 2024 | 05:46 PM
"दम नव्हता तर उभं रहायचं कशाला, मी पण दाखवली..., मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर सतेज पाटील चांगलेच भडकले

"दम नव्हता तर उभं रहायचं कशाला, मी पण दाखवली..., मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर सतेज पाटील चांगलेच भडकले

Follow Us
Follow Us:

कोल्हापूर: ऐन विधानसभा निवडणुकीत राज्यात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत. आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असून कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांनी माघार न घेतल्याने मधुरिमाराजे यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांच्या या निर्णयाने चर्चांना उधाण आलं आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. महायुती आणि महाविकास आघाडीला बंडखोरी रोखण्यात थोडेफार यश मिळाले आहे. मात्र उत्तर कोल्हापूरमध्ये वेगळाच ट्विस्ट निर्माण झाला आहे. मधुरिमाराजे यांनी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सतेज पाटील चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

मधुरिमारजे या महाविकास आघाडीच्या उत्तर कोल्हापूरच्या अधिकृत उमेदवार होत्या. राजेश लाटकर यांना विरोध झाल्याने कॉँग्रेसने मधुरिमारजे यांना उमेदवारी दिली होती. मात्र आता त्यानीच अचानक अर्ज मागे घेतल्याने आमदार सतेज पाटील चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. मधुरिमाराजे यांनी अर्ज मागे घेतल्याने सतेज पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.

मधुरिमाराजे यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर सतेज पाटील हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. ‘दम नव्हता तर उभ राहायच नव्हतं ना मग, मी पण दाखवली असती माझी ताकद’ असे विधान करत सतेज पाटील यांनी आपला राग व्यक्त केला आहे. सुरुवातीला कॉँग्रेसने राजेश लाटकर यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र त्यान अंतर्गत विरोध झाल्याने कॉँग्रेसने मधुरिमाराजे यांना अधिकृत उमेदवारी दिली होती. मात्र आता त्यांनीच उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने कोल्हापूरमध्ये नव्या ट्विस्ट निर्माण झाला आहे.

दरम्यान, राजेश लाटकर अजूनही कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढवण्यावर ठाम होते. आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे लाटकर अज्ञातस्थळी पोहोचल्याने भूया उंचावल्या गेल्या.  रविवारी छत्रपती कुटुंबियांकडून राजेश लाटकर यांची भेट घेऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, यावेळी बोलताना राजेश लाटकर यांनी षड्यंत्र रचून आपली उमेदवारी रद्द करण्यात आली, असा थेट आरोप कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासमोर केला होता. लाटकर यांची समजूत काढण्यासाठी छत्रपती कुटुंबीयांकडून मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे, खासदार शाहू महाराज, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील आदी नेते त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. त्यांची उमेदवारी मागे घेतली जाईल, अशी चर्चा त्यानंतर रंगली होती. मात्र नाॅटरीचेबल झाल्याने एक प्रकारे काँग्रेसचं टेन्शन वाढलं होते. राजेश लाटकर हेच वेळ संपेपर्यंत अर्ज माघारी घेण्यास न आल्याने अखेर मधुरिमा राजे यांनी आपला अर्ज मागे घेतला.

Web Title: Kolhapur satej patil get angry after madhurimaraje withdraw our canidancy form

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2024 | 04:42 PM

Topics:  

  • Congress
  • kolhapur
  • Maharashtra Assembly election 2024
  • Satej Patil

संबंधित बातम्या

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
1

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल
2

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल

१२ ऑक्टोबरपर्यंतची मुदत अपुरी, हरकतींसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ द्या; सपकाळांचे निवडणूक आयुक्तांना पत्र
3

१२ ऑक्टोबरपर्यंतची मुदत अपुरी, हरकतींसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ द्या; सपकाळांचे निवडणूक आयुक्तांना पत्र

Maharashtra Drought : दुष्काळ जाहीर करण्यात सरकारकडून उशीर; सतेज पाटलांचा गंभीर आरोप, ‘विशेष अधिवेशन बोलवा’
4

Maharashtra Drought : दुष्काळ जाहीर करण्यात सरकारकडून उशीर; सतेज पाटलांचा गंभीर आरोप, ‘विशेष अधिवेशन बोलवा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.