Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baby Death: पोटाची खळगी भरण्यासाठी राबणाऱ्या कष्टकऱ्यांवर वज्राघात! ऊसतोडीच्या फडातून परतताच आईचा हंबरडा

Baby Death: आई कामावर गेली अन् ३ महिन्यांच्या चिमुरडीचा श्वास गुदमरून अंत! कोल्हापुरात ऊसतोड मजुराच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू; बालिंगा येथील घटनेने हळहळ! पाहा सविस्तर बातमी!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 22, 2026 | 03:35 PM
Baby Death: पोटाची खळगी भरण्यासाठी राबणाऱ्या कष्टकऱ्यांवर वज्राघात! ऊसतोडीच्या फडातून परतताच आईचा हंबरडा

Baby Death: पोटाची खळगी भरण्यासाठी राबणाऱ्या कष्टकऱ्यांवर वज्राघात! ऊसतोडीच्या फडातून परतताच आईचा हंबरडा

Follow Us
Follow Us:
  • ऊसतोड कामगारांच्या तीन महिन्यांच्या मुलीचा श्वास गुदमरून मृत्यू
  • खोलीत झोपलेल्या बालिकेचा उलटीने श्वास कोंडला
  • सीपीआर रुग्णालयात तिला केले मृत घोषित 
Baby Death: पोटाची खळगी भरण्यासाठी रात्रंदिवस काबाडकष्ट करणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या जीवनातील भीषण आणि दुर्दैवी वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. कोल्हापूर जवळील बालिंगा परिसरात ऊसतोडीच्या फडात आई-वडील कामासाठी गेलेले असताना देखभालीसाठी कोणीही नसल्यामुळे, अवघ्या तीन महिन्यांच्या चिमुरडीचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. आरती सचिन जाधव (वय ३ महिने, मूळ रा. पेठवडगाव, सध्या रा. बालिंगा) असे या दुर्दैवी बालिकेचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा: Fire Case: डोंबिवलीत संतापजनक थरार! ब्रेकअपचा निर्णय घेताच प्रियकराने पेटवले प्रेयसीचे घर; तरुणी आणि आई-वडिलांचा जीव…

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे पेठवडगाव येथील रहिवासी असलेले सचिन जाधव आणि त्यांची पत्नी चंदा जाधव हे दोघेही पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोडणी मजूर म्हणून काम करतात. सध्या ते कोल्हापूर जवळील बालिंगा परिसरात वास्तव्यास असून, स्थानिक गावकऱ्यांनी त्यांना राहण्यासाठी एक खोली दिली आहे.

परिसरातील शेतांमध्ये रात्रीच्या वेळी ऊसतोडणीचे काम चालत असल्याने, दोघेही पती-पत्नी ऊसतोडीसाठी फडात गेले होते. रात्रीच्या वेळी कामाच्या धावपळीत तीन महिन्यांच्या चिमुरडीला सोबत नेणे शक्य नसल्याने, त्यांनी तिला तिच्या भावासह खोलीत झोपवले होते आणि शेजारील दोन मुलेही त्याच खोलीत झोपवून दोघेही कामावर निघून गेले होते.

रात्रीच्या अंधारात नियतीचा घाला

रात्रीच्या वेळी किंवा पहाटेच्या सुमारास बालिकेला अचानक उलटी झाली. यात तिचा श्वास कोंडल्याने व जीव गुदमरल्याने तिचे प्राण गेले असावेत, असे पोलिसांनी प्राथमिक अंदाजात सांगितले आहे. रात्रीचे काम संपवून जेव्हा आई-वडील पहाटेच्या सुमारास घरी परतले, तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपल्या चिमुकल्या मुलीची झालेली अस्वस्थ अवस्था पाहून दोघांनीही फोडलेला हंबरडा मन हेलावून टाकणारा होता. त्यांनी तत्काळ चिमुरडीला उपचारासाठी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय अर्थात सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच बालिकेचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

हेही वाचा: Suicide Twist: नाशिकमध्ये निवृत्त RTO अधिकाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! ‘ती शेवटची तारीख ठरेल’ अशी धमकी

कामगारांच्या मुलांच्या संगोपनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

या हृदयद्रावक दुर्घटनेने ऊसतोड कामगारांच्या अनिश्चित आणि संघर्षमय आयुष्याचे भयानक पडसाद पुन्हा एकदा उमटवले आहेत. ऊसतोडीच्या हंगामात रात्रंदिवस राबूनही या कामगारांच्या लहान मुलांच्या सुरक्षिततेची आणि संगोपनाची कोणतीही पुरेशी व्यवस्था उपलब्ध नसते. गरिबीमुळे आणि पोटाची खळगी भरण्यासाठी कामगारांना आपल्या चिमुकल्यांना अशा प्रकारे असुरक्षित सोडावे लागते, ज्यामुळे कष्टकऱ्यांच्या वेदना पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्या आहेत. या घटनेची सखोल चौकशी व्हावी आणि ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी पाळणाघरासारखी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोल्हापुरात कोणती दुर्दैवी घटना घडली?

    Ans: कोल्हापूर जवळील बालिंगा परिसरात ऊसतोड कामगाराची अवघ्या तीन महिन्यांची मुलगी आरती सचिन जाधव हिचा श्वास गुदमरून मृत्यू झाला.

  • Que: चिमुरडीचा मृत्यू कसा झाला?

    Ans: आई-वडील रात्री ऊसतोडीच्या कामासाठी गेले होते आणि देखभालीसाठी कोणीही नसल्यामुळे खोलीत झोपलेल्या बालिकेला उलटी होऊन श्वास कोंडल्याने तिचा मृत्यू झाला असावा, असे पोलिसांनी सांगितले आहे.

  • Que: या घटनेमुळे कोणता गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे?

    Ans: या घटनेमुळे कोणता गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे?

Web Title: Kolhapur sugarcane worker baby death balinga suffocation safety issue sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • Baby Death
  • In Kolhapur
  • sugarcane workers

संबंधित बातम्या

Rabies Death: मला जेवायला द्या, पाणी द्या, मला घरी न्या… विलगीकरण कक्षातून चिमुकलीची आर्त हाक अन् अखेर मृत्यूशी झुंज अपयशी!
1

Rabies Death: मला जेवायला द्या, पाणी द्या, मला घरी न्या… विलगीकरण कक्षातून चिमुकलीची आर्त हाक अन् अखेर मृत्यूशी झुंज अपयशी!

Ambulance Accident: रुग्णवाहिकेत एकही रुग्ण नव्हता अन्…चिमुकल्याचा जागीच मृत्यू, आई-वडिलांची प्रकृती चिंताजनक!
2

Ambulance Accident: रुग्णवाहिकेत एकही रुग्ण नव्हता अन्…चिमुकल्याचा जागीच मृत्यू, आई-वडिलांची प्रकृती चिंताजनक!

Theft Racket: गोव्यातील कॅसिनोची ‘हौस’ अन् इचलकरंजीच्या फळ विक्रेत्याची ‘चोरी’; कोल्हापूर पोलीस पथकाला २० हजारांचे बक्षीस!
3

Theft Racket: गोव्यातील कॅसिनोची ‘हौस’ अन् इचलकरंजीच्या फळ विक्रेत्याची ‘चोरी’; कोल्हापूर पोलीस पथकाला २० हजारांचे बक्षीस!

Raigad Traffic Jam: सायरन वाजत राहिला, आई-वडील आक्रोश करत राहिले, पण रस्ता मिळालाच नाही; अलिबागमध्ये चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
4

Raigad Traffic Jam: सायरन वाजत राहिला, आई-वडील आक्रोश करत राहिले, पण रस्ता मिळालाच नाही; अलिबागमध्ये चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.