Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rabies Death: मला जेवायला द्या, पाणी द्या, मला घरी न्या… विलगीकरण कक्षातून चिमुकलीची आर्त हाक अन् अखेर मृत्यूशी झुंज अपयशी!

Rabies Death: "मला जेवायला द्या, पाणी द्या, मला घरी न्या..." विलगीकरण कक्षातून चिमुकलीची आर्त हाक! दसऱ्याला कुत्रा चावल्यानंतर रेबीजची लागण झालेली आठ वर्षांची रेवती मृत्यूशी झुंज देत अखेर रुग्णालयातच जग सोडून गेली; बोरिवडे येथे हळहळ

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 22, 2026 | 04:13 PM
Rabies Death: मला जेवायला द्या, पाणी द्या, मला घरी न्या... विलगीकरण कक्षातून चिमुकलीची आर्त हाक अन् अखेर मृत्यूशी झुंज अपयशी!

Rabies Death: मला जेवायला द्या, पाणी द्या, मला घरी न्या... विलगीकरण कक्षातून चिमुकलीची आर्त हाक अन् अखेर मृत्यूशी झुंज अपयशी!

Follow Us
Follow Us:
  • आठ वर्षांच्या रेवती चौगुले हिचा रेबीजची लागण झाल्याने रुग्णालयात मृत्यू
  • दसऱ्याला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर महिनाभराने तिला रेबीजची लक्षणे
  • विलगीकरण कक्षात आई-वडिलांच्या हतबल डोळ्यांसमोर तिची प्राणज्योत मालवली
Rabies Death: कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळा तालुक्यातील बोरिवडे येथे एक मन हेलावून टाकणारी आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. येथे एका आठ वर्षांच्या चिमुकलीचा अत्यंत करूण अंत झाला आहे. उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला. उपचार सुरू असताना ती विलगीकरण कक्षातून आपल्या आई-वडिलांना आर्त विनवणी करत होती. खाऊ आणि पाणी मागत होती. “मला घरी घेऊन चला…” असे सांगत होती. मात्र, अखेरपर्यंत या चिमुकलीची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही आणि रुग्णालयातच तिने अखेरचा श्वास घेतला.

हेही वाचा: Firing News: खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकाच्या कारवर गोळीबार! अवघ्या ८ तासांत गुन्ह्याचा उलगडा

आई-वडिलांना भेटण्यास मनाई; हतबलतेचा कळस

डॉक्टरांनी मुलीला भेटण्यास मज्जाव केला होता. त्याला कारणही तितकेच गंभीर होते. आठ वर्षांच्या या चिमुकलीला दसऱ्याच्या दिवशी कुत्र्याने चावा घेतला होता आणि तिला रेबीजची लागण झाली होती. या रोगाच्या संसर्गाची भीती असल्याने डॉक्टरांनी मुलीस भेटण्यावर निर्बंध लावले होते. त्यामुळे पोटच्या गोळ्याला जवळ घेण्याचीही हतबलता आई-वडिलांच्या वाट्याला आली. केवळ दुरूनच आपल्या लाडक्या लेकीचा मृत्यूशी सुरू असलेला जीवघेणा संघर्ष पाहण्याची दुर्दैवी वेळ बोरिवडे येथील संतोष आणि सुरेखा चौगुले या दाम्पत्यावर आली. अखेर शनिवारी (२१ नोव्हेंबर) पहाटे आठ वर्षांच्या चिमुकल्या रेवतीची मृत्यूशी सुरू असलेली ही झुंज अपयशी ठरली आणि तिने अखेरचा श्वास घेतला.

दसऱ्याला ‘सोनं’ वाटताना पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

बोरिवडे येथील रेवती संतोष चौगुले ही जवाहर विद्यामंदिर शाळेत इयत्ता दुसरीत शिकत होती. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने वडील संतोष सेंट्रिंगच्या कामाला जातात, तर आई सुरेखा मोलमजुरी करून संसार चालवतात. स्वभावाने अत्यंत हसतमुख आणि मनमिळाऊ असल्याने शाळेत आणि गल्लीत रेवतीचे अनेक मित्र-मैत्रिणी होते.

मात्र, २० ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी नियतीने मोठा घाला घातला. रेवती आनंदाने शेजाऱ्यापाजाऱ्यांना ‘सोनं’ (आपट्याची पानं) वाटत असताना अचानक एका पिसाळलेल्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. त्यावेळी घाबरलेली रेवती पळताना गटारीत पडली आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यावेळी तातडीने खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ती बरी झाली आणि पुन्हा नेहमीसारखी हसत-खेळत राहू लागली.

हेही वाचा: Baby Death: पोटाची खळगी भरण्यासाठी राबणाऱ्या कष्टकऱ्यांवर वज्राघात! ऊसतोडीच्या फडातून परतताच आईचा हंबरडा

महिनाभरानंतर लक्षणे; ‘मला घरी न्या’ म्हणत अखेरचा श्वास

मात्र, महिनाभरानंतर या कुटुंबाच्या आनंदाला दृष्ट लागली. १९ नोव्हेंबरपासून रेवतीला अचानक चक्कर येणे, डोळे पांढरे होणे आणि पाण्याची भीती वाटणे अशी रेबीजसदृश लक्षणे दिसू लागली. त्यामुळे २० नोव्हेंबर रोजी नातेवाईकांनी तिला कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल केले. रेबीजच्या तीव्र लक्षणांमुळे डॉक्टरांनी तिला विलगीकरण कक्षात ठेवून उपचार सुरू केले. संसर्गाचा धोका असल्याने नातेवाईकांना जवळ जाण्यास मनाई करण्यात आली होती.

विलगीकरण कक्षात वेदनेने तडफडणारी रेवती आपल्या आई-वडिलांना पाहून ‘मला जेवायला द्या, पाणी द्या, मला घरी न्या’ अशा आर्त हाका मारत होती. लेकीच्या या यातना पाहून हतबल आई-वडील ढसाढसा रडत होते, पण ते काहीच करू शकत नव्हते. अखेर शनिवारी पहाटे रेवतीची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे बोरिवडे गावासह संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोल्हापुरातील कोणत्या गावात ही दुर्दैवी घटना घडली?

    Ans: ही घटना कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळा तालुक्यातील बोरिवडे येथे घडली असून, आठ वर्षांच्या रेवती संतोष चौगुले हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

  • Que: रेवतीचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला?

    Ans: २० ऑक्टोबर रोजी दसऱ्याला शेजाऱ्यांना आपट्याची पाने वाटताना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर तिला रेबीजची लागण झाली होती आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

  • Que: रुग्णालयात आई-वडिलांना मुलीला भेटण्यास का मज्जाव करण्यात आला होता?

    Ans: रेबीजच्या तीव्र लक्षणांमुळे आणि रोगाचा संसर्ग होण्याचा धोका असल्याने डॉक्टरांनी तिला विलगीकरण कक्षात ठेवले होते व जवळ जाण्यास मनाई केली होती.

Web Title: Panhala borivade revati chougule rabies death cpr hospital kolhapur dog bite sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 04:13 PM

Topics:  

  • Dog
  • In Kolhapur
  • Panhala

संबंधित बातम्या

Baby Death: पोटाची खळगी भरण्यासाठी राबणाऱ्या कष्टकऱ्यांवर वज्राघात! ऊसतोडीच्या फडातून परतताच आईचा हंबरडा
1

Baby Death: पोटाची खळगी भरण्यासाठी राबणाऱ्या कष्टकऱ्यांवर वज्राघात! ऊसतोडीच्या फडातून परतताच आईचा हंबरडा

Theft Racket: गोव्यातील कॅसिनोची ‘हौस’ अन् इचलकरंजीच्या फळ विक्रेत्याची ‘चोरी’; कोल्हापूर पोलीस पथकाला २० हजारांचे बक्षीस!
2

Theft Racket: गोव्यातील कॅसिनोची ‘हौस’ अन् इचलकरंजीच्या फळ विक्रेत्याची ‘चोरी’; कोल्हापूर पोलीस पथकाला २० हजारांचे बक्षीस!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.