सौजन्य फोटो: सोशल मिडीया
शनिवारी (२१ नोव्हेंबर २०२६) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही थरारक घटना घडली. फिर्यादी राजन धनंजय कोळेकर (वय ३५, रा. अनन्या व्हिला, शिवशंभो नगर, नक्षत्र गार्डनच्या पाठीमागे, बारामती) यांच्याकडे बंड्या उर्फ अक्षय काळे व त्याच्या दोन साथीदारांनी दोन लाख रुपयांची खंडणी मागितली होती. कोळेकर यांनी खंडणी देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या आरोपींनी त्यांच्या बंगल्याच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चारचाकी वाहनावर पिस्तुलातून गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०८(३), ३०८(४), ३(५) आणि भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३५ व २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी तातडीने पाच तपास पथके रवाना केली. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली दोन पिस्तुले पोलिसांनी जप्त केली आहेत.
या गोळीबाराच्या गुन्ह्यात बंड्या उर्फ अक्षय काळे याचाही थेट सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. बारामती तालुका पोलीस स्टेशन आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे खंडणीसाठी गोळीबार करणाऱ्या आरोपींना अवघ्या आठ तासांत जेरबंद करण्यात यश आले असून, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Ans: बंड्या उर्फ अक्षय काळे आणि त्याच्या साथीदारांनी बांधकाम व्यावसायिक राजन कोळेकर यांच्याकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागितली होती; ती देण्यास नकार दिल्याने त्यांच्या बंगल्याच्या पार्किंगमधील कारवर गोळीबार करण्यात आला.
Ans: बारामती तालुका पोलीस आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या आठ तासांत तपास पूर्ण करत दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आणि मुख्य आरोपी बंड्या उर्फ अक्षय काळे याला अटक केली.
Ans: ताब्यात घेतलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकांकडून या गोळीबाराच्या गुन्ह्यात वापरण्यात आलेली दोन पिस्तुले पोलिसांनी जप्त केली आहेत.






