Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : तपोवन वृक्षतोडप्रकरणी उच्च न्यायालयात जाणार; सह्याद्री वाचवा मोहिमेतंर्गत पर्यावरण प्रेमींनी दिला इशारा

नाशिकमधील पंचवटी-तपोवान येथील साधू ग्रामा प्रकल्पासाठी १८२५ वृक्ष तोड थांबवणे आवश्यक आहे जर ती नाही थांबवली तर मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा सह्याद्री वाचवा मोहीमेचे पर्यावरणप्रेमींनी दिला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 15, 2025 | 08:46 PM
Satara News : तपोवन वृक्षतोडप्रकरणी उच्च न्यायालयात जाणार; सह्याद्री वाचवा मोहिमेतंर्गत पर्यावरण प्रेमींनी दिला इशारा
Follow Us
Close
Follow Us:
  • तपोवन वृक्षतोडप्रकरणी उच्च न्यायालयात जाणार
  • सह्याद्री वाचवा मोहिमेतंर्गत पर्यावरण प्रेमींनी दिला इशारा
सातारा :  नाशिकमधील पंचवटी-तपोवान येथील साधू ग्रामा प्रकल्पासाठी १८२५ वृक्ष तोड थांबवणे आवश्यक आहे जर ती नाही थांबवली तर मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा सह्याद्री वाचवा मोहीमेचे पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केंद्रीय वन पर्यावरण व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाव्दारे दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे, महाराष्ट्रात याआधी अनेक कुंभमेळे पार पडले. तेव्हा कुठल्याही प्रशासकीय संस्थेला हजारो झाडांची कत्तल करण्याची गरज भासली नाही. उलट, त्या नियोजनाची जागतिक पातळीवर प्रशंसा झाली. मग आता अचानक तपोवनच का? जेव्हा नाशिकमध्ये हजारो एकर रिकाम्या किंवा उपलब्ध जागा आहेत, तेव्हा तपोवनच्या हृदयातच साधूग्राम उभारण्याचा हट्ट का? याबाबत प्रशासनाकडून कोणताही तर्कसंगत आधार दिला जात नाही. झाडतोडीसाठी वेगवेगळे टेंडर साधूग्रामसाठी वेगळे टेंडर, आणि एका झाडाच्या बदल्यात दहा झाडे लावण्याचे स्वतंत्र टेंडर हा सर्व प्रकार सार्वजनिक निधीचा अपव्यय, कुंभमेळ्याच्या नावाखाली तिजोरी भरण्याचा संशय, आणि निसर्गाची हानी करण्याची वृत्ती दर्शवतो.सह्याद्री वाचवा मोहिमेअंतर्गत नाशिकमधील पंचवटी-तपोवन हे धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे.

येथील कुंभमेळ्यासाठी साधू ग्राम प्रकल्पासाठी सुमारे १८२५ प्रौढ झाडे तोडण्याचा प्रस्ताव आहे. तो तत्काळ रद्द करावा. इतक्या मोठ्या संख्येने झाडे कापल्याने हवेची गुणवत्ता, स्थानिक जैवविविधता, तापमान नियमन आणि एकूणच पर्यावरणीय संतुलनावर गंभीर परिणाम होईल. ही झाडे देखील महत्त्वपूर्ण अधिवास म्हणून काम करतात. प्रकल्पासाठी कोणतेही झाड तोडू नये. या निवेदनाच्या प्रती राज्यपाल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक, मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) महाराष्ट्र राज्य, प्रधान मुख्य वनसंरक्षक, नागपूर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, पश्चिम प्रदेश बोरिवली मुंबई, जिल्हाधिकारी, नाशिक यांना पाठवण्यात आल्या आहेत.

Kolhapur News : शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारी मंडळे बरखास्त; माजी खासदार राजू शेट्टी यांची टीका म्हणाले….

टेंडर प्रक्रियेतील संभाव्य गैरव्यवहार तपासावेत
या संपूर्ण प्रक्रियेची स्वायत्त चौकशी करून टेंडर प्रक्रियेतील संभाव्य गैरव्यवहार तपासावेत. निसर्ग, धार्मिक वारसा आणि पर्यावरणीय संतुलन जपणारे नियोजन पुन्हा तयार करावे. कुंभमेळा आयोजनात पारदर्शकतेसाठी आपण स्वतः लक्ष घालावे, अशा मागण्या मोरे यांनी केल्या आहेत. नाशिकच्या पर्यावरणीय वारशाचे आणि त्याच्या आध्यात्मिक पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपला वेळेवर हस्तक्षेप व आपली पर्यावरणीय हिताची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अन्यथा महाराष्ट्र राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात मला सह्याद्री वाचवा मोहिमेअंतर्गत मुंबई उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागेल, असा इशाराही मोरे यानी निवेदनाव्दारे दिला आहे.

Satara News : विविध मागण्यांसाठी प्रहार क्रांतीचे आंदोलन ; दिव्यांग बांधवांनी रोखला मार्ग

Web Title: Satara news tapovan will go to the high court in the tree cutting case environmentalists warned under the save sahyadri campaign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 08:46 PM

Topics:  

  • Marathi News
  • Satara News

संबंधित बातम्या

Ratnagiri : डॉ. ओमप्रकाश शेटये यांची दापोली उपजिल्हा रुग्णालयाला भेट
1

Ratnagiri : डॉ. ओमप्रकाश शेटये यांची दापोली उपजिल्हा रुग्णालयाला भेट

Alibaug News : अलिबागमध्ये अनधिकृत बांधकाम? माजी आमदार पंडित पाटील यांची प्रशासनावर टीका
2

Alibaug News : अलिबागमध्ये अनधिकृत बांधकाम? माजी आमदार पंडित पाटील यांची प्रशासनावर टीका

Chandrapur News: मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला! गुंजेवाहीत महिला तर कन्हाळगावात गुराखी ठार
3

Chandrapur News: मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला! गुंजेवाहीत महिला तर कन्हाळगावात गुराखी ठार

Karjat News : “आधी गावांचं पुनर्वसन करा मग…,” टाटा जलविद्युत प्रकल्पाच्या खोदकामाला सुरुंग, राष्ट्रवादी काँग्रेसचं उपोषण’
4

Karjat News : “आधी गावांचं पुनर्वसन करा मग…,” टाटा जलविद्युत प्रकल्पाच्या खोदकामाला सुरुंग, राष्ट्रवादी काँग्रेसचं उपोषण’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.