Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : ग्रामसभेवर आक्षेप घेणारे स्वतः कर थकवतात, संरपंचांनी केला धक्कादायक आरोप

वाई ग्रामपंचायतीतील नवा वाद समोर आला आहे. ग्रामपंचयातीतील कराची थकबाकी करणारेच सगळ्यावर आक्षेप घेत आहेत असा गंभीर आरोप सरपंचांनी केला आहे, नेमकं प्रकरण काय, जाणून घ्या.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 23, 2025 | 01:12 PM
Satara News : ग्रामसभेवर आक्षेप घेणारे स्वतः कर थकवतात, संरपंचांनी केला धक्कादायक आरोप
Follow Us
Close
Follow Us:
  • ग्रामसभेवर आक्षेप घेणारे स्वतः कर थकवतात,
  • संरपंचांचा धक्कादायक आरोप
वाई : ग्रामपंचायतीने नियमानुसार नोटीस, फलकावर प्रसिद्धी करून, दवंडी देऊन घेतलेल्या ग्रामसभेवर आक्षेप घेणारे स्वतः ग्रामपंचायत करांचे थकबाकीदार आहेत. ग्रामसभा नियमानुसारच झालेली आहे. थकबाकी सवलतीबाबतचा ठराव ग्रामसभेत बहुमताने नामंजूर केल्याची माहिती सरपंच मेघा सचिन सावंत, उपसरपंच शामराव गाडे यांनी पत्रकारांना दिली.

विरोधकांनी केलेल्या आरोपाबाबत खुलासा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेस सदस्य कौशल्या घाटे, कोंडीबा सावंत, लक्ष्मी लंकेश्वर, प्रदीप सावंत, शैला मालुसरे, रोहित सावंत, शोभा साळी, पायल चव्हाण, नीलम साठे, ज्ञानदेव लोणकर आदी सदस्य उपस्थित होते. थकबाकीत 50 टक्के सूट द्यावी, अशी मागणी करणाऱ्यांनी, वाणिज्य व रहिवासी करांची स्वतःच लाखो रुपयांची थकबाकी केली आहे. त्यामध्ये तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष, भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आदींचा समावेश आहे. नेहमीच ग्रामसभेत, ग्रामपंचायतीत येऊन गोंधळ घालणाऱ्यांच्या उपस्थितीतच ग्रामसभेने थकबाकीधारकांना 50 टक्के सूट न देण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीची करांची वसुली चांगली असून थकबाकीदारच या विषयासाठी पुन्हा दुसऱ्यांदा ग्रामसभेची हास्यास्पद मागणी करीत आहेत.

वैयक्तिक करांच्या सवलतींचा लाभघेण्यासाठी खोटे आरोप करून दबाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. ग्रामपंचायतीकडे कर वसुलीची कायदेशीर जबाबदारी आहे. थकबाकीदारांविरुद्ध नियमाप्रमाणे कारवाई सुरु आहे. मागील आर्थिक वर्षांत आम्ही 70 टक्केपेक्षा जास्त वसुली केली असून, अशा प्रकारची सूट दिल्याने नियमित करांचा भरणा करणाऱ्यांच्यावर अन्याय होणार आहे. अधिनियम कलम 7नुसार प्रत्येक आर्थिक वर्षात किमान चार ग्रामसभा घेणे आवश्यक असून सरपंच, उपसरपंच यांनी ठरविलेल्या तारीख, वेळ व दिवशी ग्रामसभा घेणे अपेक्षित आहे; ग्रामसभा ही ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्यात आली होती. नोटीस ७ दिवस आधी प्रसिद्ध करून ग्रामपंचायत कार्यालय व गावातील नोटीस बोर्डवर चिकटविण्यात आली. तसेच रिक्षाद्वारे दवंडी देऊन जाहीरात करण्यात आली होती. आवश्यक कोरम पूर्ण न झाल्याने सभा तहकूब करून ती नियमाप्रमाणे नंतर घेण्यात आली.

Kolhapur Nagar parishad Result : कोल्हापूरात नगरपालिका नगरपंचायतींवर महायुतीची सत्ता; भाजप – शिंदेसेना ठरले ‘किंगमेकर’

सवलत देण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने स्वतः घ्यावा

सर्वसाधारण सूट दिल्यास प्रामाणिक करदात्यांवर अन्याय होईल व भविष्यात थकबाकीदारीला प्रोत्साहन मिळून थकबाकी वाढण्याचा धोका निर्माण होईल. सवलत देण्याचा निर्णय ग्रामपंचायतींनी स्वेच्छेने घ्यायचा आहे. कर आकारणी व वसुलीत थकबाकी माफीसारखे निर्णय घेताना ग्रामपंचायतीच्या आर्थिक शिस्तीवर विपरीत परिणाम होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे, असेही सावंत व गाडे यांनी स्पष्ट केले. सूट दिल्याने ग्रामपंचायतीचे नुकसान झाल्यास शासनामार्फत कोणताही मोबदला मिळणार नाही, वसुलीसाठी चांगल्या उपाययोजना करून आम्ही करांची वसुली करीत असतो. विरोधकांपैकी अनेकजण बांधकाम परवाना, नगर नियोजन विभागाची मान्यता न घेता बांधकामे करतात, त्यामुळे त्यांच्या मिळकतींच्या नोंदी करता येत नसल्याचे सरपंचांनी स्पष्ट केले.

Kolhapur News : निवडणुकीत गाजणार हद्दवाढीचा विषय ; कोल्हापूर शहरातील रस्त्यांचा दर्जा ठरणार वादाचं कारण ?

Web Title: Satara news vai those who object to the gram sabha pay taxes themselves the sarpanch made a shocking allegation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 01:12 PM

Topics:  

  • Satara

संबंधित बातम्या

Amol Mohite Satara Election Result: सातारकरांचा कौल भाजपाला! ४२,०३२ मतांच्या फरकाने अमोल मोहितेंनी गुलाल उधळला
1

Amol Mohite Satara Election Result: सातारकरांचा कौल भाजपाला! ४२,०३२ मतांच्या फरकाने अमोल मोहितेंनी गुलाल उधळला

Shalinitai Patil: ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन, 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2

Shalinitai Patil: ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन, 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Satara drug factory : सावरी ड्रग्स प्रकरणात नवा ट्विस्ट! पुन्हा घटनास्थळी अतिरिक्त मुद्देमाल जप्त; जावळी तालुक्यात नक्की काय सुरू
3

Satara drug factory : सावरी ड्रग्स प्रकरणात नवा ट्विस्ट! पुन्हा घटनास्थळी अतिरिक्त मुद्देमाल जप्त; जावळी तालुक्यात नक्की काय सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.