Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सध्याच्या परिस्थितीवर शरद पवारांनी केलं मोठं विधान; म्हणाले, ‘राज्यात एकप्रकारे…’

हिंदू समाजाला सुद्धा शांत करून जलद गतीने दुसऱ्या दिवशी मुंबईतील जनजीवन सुरळीत केले. गुजरातमधील भूज येथे झालेल्या भूकंपानंतरची परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्यावर सोपवली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 24, 2025 | 07:55 AM
राज्यात एकप्रकारे संघर्षाची स्थिती : शरद पवार

राज्यात एकप्रकारे संघर्षाची स्थिती : शरद पवार

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : राज्यात येणाऱ्या आपात्कालीन परिस्थितीमुळे एकप्रकारे संघर्षाची स्थिती निर्माण झाली असून, अशा आपत्ती व्यवस्थापन काळात मदतीसाठी पुढे धावणाऱ्या संस्थांना बळ देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आली आहे, असे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सांगितले.

शिवाजी विद्यापीठात व्हाईट आर्मी संघटनेच्या वतीने शरद पवार यांना महायोद्धा हा पुरस्कार देऊन खासदार शाहू महाराज हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. व्हाईट आर्मी आणि शिवाजी विद्यापीठ, जिल्हा आपत्ती निवारण केंद्राच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

सत्काराला उत्तर देताना खासदार शरद पवार यांनी आपल्या मनोगतात आपत्ती व्यवस्थापनाचे अनेक पैलू उलगडले. लातूर जिल्ह्यातील किल्लारी भूकंपात हजारो घरं पडली. अनेक लोक मृत्युमुखी पडले. अशावेळी इतर जिल्ह्यांची मदत घेऊन तिथली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केला. तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव भूकंपग्रस्त ठिकाणी भेट देणार होते. मात्र, पंतप्रधान आल्यास शासकीय यंत्रणा यांच्या दीमतीला द्यावी लागेल, त्यातून मदत कार्यात विस्कळीतपणा येईल, ही बाब नरसिंहराव यांना पटवून दिली. भूकंपग्रस्त ठिकाणी सध्या तरी येऊ नये असं त्यांना स्पष्ट सांगितलं.

त्यानंतर १९९२ ला मुंबईतील दंगल वाढत चालल्याने केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देऊन महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची सूचना पंतप्रधान नरसिंहराव यांनी केली. त्यानुसार, केंद्रातून परत येऊन अवघ्या तीन-चार दिवसांत मुंबईतील कायदा सुव्यवस्था आपण रुळावर आणली. मुंबईत दहा ठिकाणी बॉम्बस्फोट झाले ही सर्व ठिकाणं हिंदू समाजाशी संबंधित होती. अशा कृत्यातून जातीय दंगल भडकवण्याचा प्रयत्न असल्याचा माझ्या निदर्शनास आल्यानंतर महंमद अली रोडवर बॉम्बस्फोट झाल्याचा आपण स्वतः आकाशवाणीवरून जाहीर केले.

अशा पद्धतीने हिंदू समाजाला सुद्धा शांत करून जलद गतीने दुसऱ्या दिवशी मुंबईतील जनजीवन सुरळीत केले. गुजरातमधील भूज येथे झालेल्या भूकंपानंतरची परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्यावर सोपवली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्षपद आपल्याला दिले. इतर देशातील आपत्ती संबंधातील मदत कार्ये आणि कायद्याचा अभ्यास करून भारतासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा तयार केला; हाच कायदा देशातील प्रत्येक संकटात जनतेच्या मदतीसाठी उपयुक्त ठरतोय. त्याचच आपल्याला समाधान असल्याचे खासदार शरद पवार यांनी नमूद केले.

आपत्तीच्या वेळी स्वयंसेवी संस्था करतात झोकून देऊन काम

शासकीय यंत्र आणि स्वयंसेवी संस्था आपत्तीच्या वेळी झोकून देऊन काम करतात. अशा संस्थांना नागरिक म्हणून पाठिंबा देण्याची जबाबदारी सर्वांची आहे. देशात आणि महाराष्ट्रात ज्या-ज्या वेळी भूकंप, बॉम्बस्फोट, जातीय दंगली घडल्या अशा आपत्ती त्या त्यावेळी अनेकदा आपण तेथे धावून गेलो आहे. यंत्रणा कामाला लावली आहे, ज्यामुळे आपत्ती व्यवस्थापन शक्य झाले.

संस्थांना बळ देण्याची जबाबदारी आपली

तसेच राज्यातील सर्वच आपत्ती काळात प्रशासकीय यंत्रणेने चांगले काम केले आहे. अनेक संस्था या अशावेळी कामासाठी पुढाकार घेतात. अशा संघटनाना, संस्थांना बळ देण्याची जबाबदारी आपली आहे.

पवारांनी आपत्तीमध्ये केलेले काम अतिशय चांगले

खासदार शाहू महाराज म्हणाले, खासदार शरद पवार यांनी भूकंप, बॉम्बस्फोट अशा अनेक आपत्तीमध्ये केलेले काम अतिशय चांगले आहे. देशात आणि महाराष्ट्रात अनेक प्रकारचे संकटे आली. अशावेळी योग्य निर्णय घेत त्यांनी त्यावेळी मदत पोहचवत सहकार्य केले. अतिशय योग्य व्यक्तीला हा पुरस्कार दिला आहे.

Web Title: Sharad pawar talked about current situation of maharashtra nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2025 | 07:55 AM

Topics:  

  • MP Sharad pawar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.